वैयक्तिक लाभाच्या योजनेमध्ये अनियमितता आढळल्यास कारवाई करणार- महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

वैयक्तिक लाभाच्या योजनेमध्ये

अनियमितता आढळल्यास कारवाई करणार

- महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

 

            मुंबई दि. २ : राज्यात पशुसंवर्धन विभागामार्फत पशु वाटप वैयक्तिक लाभाच्या योजनेअंतर्गत लाभार्थींची निवड ऑनलाईन पद्धतीने केली जाते. नागपूर जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आचारसंहितेमुळे ही प्रक्रिया ऑफलाईन पद्धतीने राबविण्यात आली होती. यामध्ये अनियमितता झाल्याचे आढळल्यास संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्यात येईलअशी माहिती महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.


            नागपूर जिल्ह्यातील पशुसंवर्धन विभागाकडे वैयक्तिक लाभाच्या योजना राबविण्यासाठीचे अर्ज प्रलंबित असल्याबाबत सदस्य प्रवीण दटके यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री श्री. विखे पाटील बोलत होते.

            मंत्री श्री. विखे पाटील म्हणाले कीनागपूरवर्धापुणेसोलापूरमध्ये दुधाळ गायीम्हशींचे गट वाटप करणेशेळीमेंढी गट वाटप करणेएक हजार कुक्कुट मांसल पक्ष्यांच्या संगोपनासाठी निवारा शेड उभारण्यासाठी अर्थसाहाय्य देणे१०० कुक्कुट पिलांच्या वाटपासाठी ऑनलाइन पद्धतीने लाभार्थींची निवड करण्यात येते. मात्रऑफलाईन पद्धतीने झालेल्या पशुवाटपाबाबत अनियमितता झाली असल्यास सविस्तर चौकशीअंती कारवाई करूअसे त्यांनी सांगितले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

फ्युचर मेकर बद्दल वितरकांची कुठलीही तक्रार नाही-ट्रेनर महेंद्र सुर्यवंशी , फ्युचर मेकरचे व्यवहार पारदर्शक असुन लवकरच कंपनी आपले व्यवहार सुरू करणार-बापू ढोमसे, सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० मध्ये सुधारणा !अक्रियाशील सदस्याची तरतुद रद्द !!

,,,,,,, सावधान, नाशिकमधील किटल्या गरम होऊ लागल्या आहेत !