पोस्ट्स

आरोग्य विभागातील रिक्त पदे लवकरच भरणार !

इमेज
आरोग्य विभागातील रिक्त पदे लवकरच भरणार ! - सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉ.तानाजी सावंत               मुंबई ,  दि. 3 : राज्यातील आरोग्य सेवा – सुविधांच्या बळकटीकरणासाठी विभागातील रिक्त पदे लवकरच भरण्यात येतील. तसेच आरोग्य केंद्रातील बायोमेट्रिक हजेरी प्रणालीसाठी मुंबई ,  पुणे येथे मध्यवर्ती बायोमेट्रिक हजेरी पडताळणी यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार आहे, असे सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी विधानसभेत सांगितले.             पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्यात आरोग्य सेवा सुधारण्यासाठीच्या उपाययोजनांबाबत विधानसभा सदस्य सर्वश्री सुभाष थोपटे ,  राजेश टोपे ,  अनिल देशमुख ,  रवी राणा यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना ते बोलत होते.           आरोग्य मंत्री सावंत म्हणाले ,   हृदयविकाराने झटका येऊन मृत्यू होण्याचे प्रमाण वाढत आहे. अशा रुग्णांना गोल्डन अवरमध्ये आरोग्य सेवा - सुविधा तातडीने उपलब्ध व्हाव्यात  यासाठी  ‘ स्टेमी ’  प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचेही सावंत यांनी यावेळी सांगितले.      

२ मार्च काळाराम मंदिर सत्याग्रह दिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन

इमेज
२ मार्च काळाराम मंदिर सत्याग्रह दिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन              नाशिक (विमाका)::- भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दलितांना काळाराम मंदिरात प्रवेश मिळावा यासाठी जो लढा दिला त्यात काळाराम मंदिराच्या सत्याग्रहाला अभुतपूर्व स्थान आहे . २ मार्च १९३० ते १३ ऑक्टोबर १९३५ दरम्यान पाच वर्ष हा लढा सुरू होता. या घटनेला आज ९३ वर्ष पूर्ण झाली आहेत. या औचित्याने आज मान्यवरांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस व स्मृती स्तंभास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.             याप्रसंगी नाशिक महानगरपालिका आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार,  पोलीस आयुक्त अंकुश शिंदे , काळाराम मंदिर  ट्रस्टचे अध्यक्ष तथा १३ वे जिल्हा सत्र न्यायाधीश उमेशचंद्र मोरे, उपसंचालक (माहिती) ज्ञानेश्वर इगवे, ट्रस्टचे विश्वस्त शांताराम अवसरे, अॕड.अजय निकम, शुभम मंत्री, डॉ.एकनाथ कुलकर्णी, मंदार जानोरकर, मिलिंद तारे, धनंजय पुजारी, नरेश पुजारी  पंचवटी पोलीस स्टेशन वरिष्ठ अधिकारी डॉ.सिताराम कोल्हे उपस्थित होते.             उपस्थित अधिकाऱ्यांनी प्रभू श्रीरामाचे दर्शन घेऊन क

कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचा परीक्षांवरील बहिष्कार मागे !

इमेज
कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचा परीक्षांवरील बहिष्कार मागे शालेय शिक्षणमंत्री दीपक  केसरकर यांची पत्रकार परिषदेत माहिती               मुंबई ,  दि. २ : राज्यातील महाविद्यालयीन शिक्षकांच्या विविध मागण्यांबाबत आज सकारात्मक चर्चा झाली. यामुळे  महाविद्यालयीन शिक्षकांनी १२ वीच्या पेपर तपासणीवर टाकलेला बहिष्कार मागे घेतल्याने निकाल वेळेत लागणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आज मुंबई येथे पत्रकार परिषदेत दिली.             मंत्री श्री. केसरकर यांनी सांगितले की ,  कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या अडचणीबाबत व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाच्या पदाधिकाऱ्यांसोबत सकारात्मक चर्चा झाली होती. आज पुन्हा महासंघाच्या पदाधिकाऱ्यांसोबत झालेल्या चर्चेत शासनाने विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने सकारात्मक निर्णय घेतला आहे.  १ नोव्हेंबर २००५  पूर्वी विनाअनुदानित तसेच अंशत: अनुदानावरील नियुक्त शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत शासन सकारात्मक असून याबाबत उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त समिती योग्य निर्णय घेणार आहे. ज

वैयक्तिक लाभाच्या योजनेमध्ये अनियमितता आढळल्यास कारवाई करणार- महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

इमेज
वैयक्तिक लाभाच्या योजनेमध्ये अनियमितता आढळल्यास कारवाई करणार - महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील               मुंबई दि. २ : राज्यात पशुसंवर्धन विभागामार्फत पशु वाटप वैयक्तिक लाभाच्या योजनेअंतर्गत लाभार्थींची निवड ऑनलाईन पद्धतीने केली जाते. नागपूर जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आचारसंहितेमुळे ही प्रक्रिया ऑफलाईन पद्धतीने राबविण्यात आली होती. यामध्ये अनियमितता झाल्याचे आढळल्यास संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल ,  अशी माहिती महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.             नागपूर जिल्ह्यातील पशुसंवर्धन विभागाकडे वैयक्तिक लाभाच्या योजना राबविण्यासाठीचे अर्ज प्रलंबित असल्याबाबत सदस्य प्रवीण दटके यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री श्री. विखे पाटील बोलत होते.             मंत्री श्री. विखे पाटील म्हणाले की ,  नागपूर ,  वर्धा ,  पुणे ,  सोलापूरमध्ये दुधाळ गायी ,  म्हशींचे गट वाटप करणे ,  शेळी ,  मेंढी गट वाटप करणे ,  एक हजार कुक्कुट मांसल पक्ष्यांच्या संगोपनासाठी निवारा शेड उभारण्यासाठी अर्थसाहाय्य देणे ,  १०० कुक्कुट पिलांच्या वाटपासाठी

अंतराळ क्षेत्रात करिअर करण्याची संधी : -बाळासाहेब सोनवणे !

इमेज
अंतराळ क्षेत्रात करिअर करण्याची संधी : -बाळासाहेब सोनवणे ! डे केअरमध्ये विज्ञान दिनानिमित्त बालवैज्ञानिक क्रितिका व ऋतुजा यांचा सत्कार  नाशिक : (प्रतिनिधी) डॉ. एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशनने स्पेस झोन इंडिया व डॉ. मार्टिन इन्स्टिटयूट यांच्या सहकार्याने पिको सॅटेलाइट पाच हजार मुलांनी विकसित केलेल्या 150 पिको सॅटेलाइटचे हायब्रीड रॉकेटचे यशस्वीरित्या तामीळनाडू येथून अवकाशात प्रक्षेपण केले. त्यामुळे या क्षेत्रात करिअर करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. त्याचे सोने करावे, असे प्रतिपादन डॉ.एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशनचे जिल्हा समन्वयक बाळासाहेब सोनवणे यांनी केले.  ज्ञानवर्धिनी  विद्याप्रसारक मंडळ संचलित डे केअर सेंटर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे सचिव गोपाळ पाटील, बालवैज्ञानिक मा.गि. दे.पाटील माध्यमिक विद्यालय, महिरावणी येथील क्रितिका खांडबहाले, कु. ऋतुजा काशीद, पालक विलास काशीद होते. वसंतराव एकबोटे सेवानिवृत्त मायको कर्मचारी व ज्ञानवर्धिनी विद्याप्रसारक मंडळाचे सचिव गोपाळराव पाटील आ

काठमांडू येथील आयोजित विश्व साहित्य संमेलन ! "कवितेमुळे भारत-नेपाळ मैत्रीचे संबंध अधिक दृढ होतील"-साहित्यिक डॉ.ज्योती कदम

इमेज
काठमांडू येथील आयोजित विश्व साहित्य संमेलन ! "कवितेमुळे भारत नेपाळ मैत्रीचे संबंध अधिक दृढ होतील"-साहित्यिक डॉ.ज्योती कदम जागतिक मातृभाषा दिनानिमित्त नेपाळ येथे आयोजित बहुभाषिक विश्व साहित्य संमेलनातून !     काठमांडू (न्यूज मसाला वृत्तसेवा)::- अक्षरयात्री प्रतिष्ठान, विटा (भारत) आणि भारतीय राजदूतावास काठमांडू (नेपाळ) यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक मातृभाषा दिनाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या नेपाळ - भारत बहुभाषिक कवि संमेलनाच्या सहअध्यक्ष म्हणून नांदेडच्या साहित्यिक डॉ.ज्योती कदम या  आमंत्रित होत्या. बहुभाषिय संमेलनामुळे नेपाळ- भारत मैत्रीचे धागे अधिक घट्ट होतील असा विश्वास डॉ.ज्योती कदम यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केला.  डॉ.ज्योती कदम  यांच्या "आदिम जाणीव" या कवितेने उपस्थित रसिक - श्रोते यांना मंत्रमुग्ध करीत रसिकांची दाद मिळवली.       भारतीय दूतावास नेपाळ व अक्षरयात्री प्रतिष्ठान विटा जि . सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने काठमांडू येथे २१ फेब्रुवारी २०२३ रोजी नेपाळ -भारत बहुभाषिक साहित्य संमेलन मोठ्या दिमाखात संपन्न झाले . त्यानिमित्ताने मराठी, नेपाळी, मैथिली,

होळी सणानिमित्त मध्य रेल्वेकडून विशेष गाड्यांचे आयोजन !

इमेज
होळी सणानिमित्त मध्य रेल्वेकडून विशेष गाड्यांचे आयोजन !          मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : होळी सणासाठी मध्य रेल्वे मार्गावर ९० विशेष गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. सणादरम्यान प्रवाशांची होणारी अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वेने लोकमान्य टिळक टर्मिनस-गोरखपूर आणि पनवेल- छपरा दरम्यान आणखी १० विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये मुंबई- गोरखपूर एसी स्पेशल गाडीच्या ४ सेवा धावणार आहेत. गाडी क्रमांक ०२५९८ एसी होळी विशेष लोकमान्य टिळक टर्मिनस येथून ५ मार्च आणि १२ मार्च रोजी १२.४५ वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी रात्री १२.३० वाजता गोरखपूरला पोहोचेल. तर गाडी क्रमांक ०२५९७ गाडी गोरखपूरहून १३ मार्च आणि १० मार्च रोजी रात्री ८.५५ वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी लोकमान्य टिळक टर्मिनसला ७.२५ वाजता पोहोचेल. यासोबत पनवेल-छपरा स्पेशल गाडीच्या ६ सेवा धावणार आहेत. या गाड्यांचे आरक्षण विशेष शुल्कावर बुकिंग १ मार्च रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या वेबसाइटवर खुले होणार आहे.