पोस्ट्स

"नो योर आर्मी" नावाने भव्य प्रदर्शन !महाराष्ट्रात प्रथमच होऊ घातलेलं प्रदर्शन पाहण्याची विद्यार्थ्यांसह जनतेला सुवर्ण संधी !!

इमेज
"नो योर आर्मी" नावाने भव्य प्रदर्शन ! महाराष्ट्रात प्रथमच होऊ घातलेलं प्रदर्शन पाहण्याची विद्यार्थ्यांसह जनतेला सुवर्ण संधी !!         नासिक (न्यूज मसाला वृत्तसेवा)::- नासिकचे खासदार हेमंत गोडसे आणि शेतकरी व भारतीय जवानांच्या परिवारासाठी, तसेच विविध समाजकार्यात गेल्या ८ वर्षांपासून अग्रेसर असलेल्या युनायटेड व्ही स्टॅन्ड फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दि. १८ मार्च २०२३ व रविवार दि. १९ मार्च २०२३ रोजी  "नो योर आर्मी" नावाचे एक भव्य प्रदर्शन गोल्फ क्लब मैदान, नाशिक येथे आयोजित केले आहे. युनायटेड व्ही स्टॅन्ड फाउंडेशन पुर्वीपासून आर्मीशी संलग्न, या पूर्वी देखील संस्थेने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने ‘नो युवर आर्मी’ मेळा भरवला होता ज्याला नाशिककरांनी अतिउत्तम प्रतिसाद दिला होता. या प्रदर्शनात केवळ आर्टलिरीच नव्हे तर इतर शस्त्रास्त्रे आणि सेवा देखील प्रदर्शित करण्यात येणार आहेत.  तोफखाना (विविध तोफा), शस्त्रागार, अभियंता उपकरणे, हवाई दल, आर्मी एव्हिएशन, वैद्यकीय उपकरणे प्रदर्शन, पायदळ, आर्मी रेकॉर्ड स्टॉल (निवृत्त सैनिकांच्या सेवेसाठी), प्रादेशिक सैन्य शस्त्

ब्रम्हकुमारी नारीशक्ती सन्मान २०२३ सोहळा संपन्न ! महिला मल्टी टास्किंग असतात- शर्मिष्ठा वालावलकर ! जिल्हा परिषदेच्या मंदाकिनी पवार व कविता देवरे-पवार यांना नारीशक्ती सन्मान !

इमेज
ब्रम्हकुमारी नारीशक्ती सन्मान २०२३ सोहळा संपन्न ! महिला मल्टी टास्किंग असतात- शर्मिष्ठा वालावलकर ! जिल्हा परिषदेच्या मंदाकिनी पवार व कविता देवरे-पवार यांना नारीशक्ती सन्मान !    पंचवटी( न्यूज मसाला वृत्तसेवा, नासिक)::- भारतीय संस्कृती प्राचीन अविनाशी संस्कृती आहे, जितके भारतात देवी देवतांचे पूजन होते तितकी इतरत्र कुठे होत नाही. आपल्या आतील दैवी गुणांचे ते एक उत्प्रेरक आहे. दैवी संस्कारांना जागृत करणे म्हणजेच अध्यात्म होय. आपल्या सानिध्यात येणाऱ्या प्रत्येकालाच आपल्या आंतरिक गुणांच्या सुगंधाने प्रभावित केल्यास याचा फायदा फक्त आपल्यालाच न होता तो संपूर्ण विश्वाला होत असतो. असे प्रतिपादन ब्रह्माकुमारी वासंती दीदी जी यांनी केले.          येथील ब्रह्माकुमारी सेवा केंद्रात साप्ताहिक नाशिक परिसर व ब्रह्मकुमारी संस्था नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने ब्रह्माकुमारी नारी शक्ती सन्मान २०२३ चे आयोजन दिनांक १० मार्च २०२३ रोजी समारंभ पूर्वक करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधीक्षक श्रीमती शर्मिष्ठा वालावलकर, माजी आरोग्य मंत्री शोभाताई बच्छाव, प्रादेशिक प

वाढता स्क्रीनटाईम सर्वांनाच धोकेदायक - बालरोगतज्ज्ञ डॉ. संपदा तांबोळकर यांचे प्रतिपादन !

इमेज
वाढता स्क्रीनटाईम सर्वांनाच धोकेदायक   - बालरोगतज्ज्ञ डॉ. संपदा तांबोळकर यांचे प्रतिपादन !    नाशिक( न्यूज मसाला वृत्तसेवा)::- वाढता स्क्रीन सर्वांनाच धोकेदायक असल्याचे प्रतिपादन बालरोगतज्ज्ञ डॉ. संपदा तांबोळकर यांनी केले. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे जागतिक महिला दिनानिमित्त विद्यापीठात सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या उद्घाटन समारंभात अध्यक्षस्थानी विद्यापीठाच्या  कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) समवेत पुणे येथील डी.वाय.पाटील विद्यापीठाच्या प्राध्यापिका, बालरोगतज्ज्ञ डॉ. संपदा तांबोळकर प्रमुख व्याख्यात्या म्हणून उपस्थित होत्या. या कार्यक्रमास व्यासपीठावर विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ, परीक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडू, वित्त व लेखाधिकारी एन.व्ही. कळसकर, विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डॉ. मनोजकुमार मोरे, मतनिसच्या अध्यक्षा श्रीमती योगिता पाटील, सचिव श्रीमती शिल्पा पवार आदी मान्यवर उपस्थित होते.         याप्रसंगी समृध्द पालकत्व विषयावर मार्गदर्शन करतांना डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या प्राध्यापिका व बालरोगतज्ज्ञ डॉ.

महात्मा ज्योतिराव फुले जनारोग्य योजनेत, आता ५ लाखांपर्यंत उपचार करता येणार !माहिती व जनसंपर्क कार्यालयाकडील निकषांनुसार पात्र पत्रकार व त्यांचे कुटुंब ! योजनेचा लाभ कुणाला, कसा यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !

इमेज
महात्मा ज्योतिराव फुले जनारोग्य योजनेत, आता ५ लाखांपर्यंत उपचार करता येणार ! माहिती व जनसंपर्क कार्यालयाकडील निकषांनुसार पात्र पत्रकार व त्यांचे कुटुंब ! महात्मा ज्योतिराब फुले जनारोग्य योजेनेतील विमा संरक्षण मर्यादा १.५० लाखांहून ५ लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे. राज्याच्या अर्थसंकल्पात ही घोषणा करण्यात आली. या योजनेचा लाभ अशा प्रकारे घ्यावा. मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : महात्मा ज्योतिराब फुले जनारोग्य योजेनेतील विमा संरक्षण मर्यादा १.५० लाखांहून ५ लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे. राज्याच्या अर्थसंकल्पात ही घोषणा करण्यात आली.         त्याशिवाय नवीन २०० रुग्णालयांचा यात समावेश करण्यात येणार आहे. तर मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रियांचे लाभ २.५० लाखांहून ४ लाखांपर्यंत मर्यादा वाढवण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने राज्यभरात ७०० दवाखाने उघडण्यात येण्याची शक्यता आहे. महात्मा ज्योतिराब फुले जनारोग्य योजना राज्यातील दारिद्ररेषेखालील विशेषकरुन पिवळी शिधापत्रिका धारकांना दर्जेदार वैद्यकीय सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी राज्य सरकारने २ जूलै २०१२ रोजी रा

वसंतदादा पाटील प्रतिष्ठानमध्ये पोस्टर प्रेझेन्टेशनला उत्तम प्रतिसाद !

इमेज
वसंतदादा पाटील प्रतिष्ठानमध्ये पोस्टर प्रेझेन्टेशनला उत्तम प्रतिसाद ! न्यूज मसाला वृत्तसेवा::- मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : वसंतदादा पाटील प्रतिष्ठानच्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पोस्टर प्रेझेन्टेशन स्पर्धेला उत्तम प्रतिसाद मिळाला. यात ३२ गटांमधून १४८ विद्यार्थी सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांनी त्यांच्या नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान कल्पनांनी अप्रतिम पोस्टर्स तयार केले होते. स्पर्धेत रस्त्यावर खड्डे शोधणे आणि प्लास्टिक कचरा वापरून भरणे, फळ प्रतवारी प्रणाली यांनी प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले, दुसरे पारितोषिक भाभा अणुशक्ती संशोधन केंद्राच्या सुरक्षेसाठी व्हिजिटर ट्रॅकिंग आणि मॉनिटरिंग सिस्टमने जिंकले आणि तिसरे पारितोषिक विजेते सोलनम ट्यूबरोसम डिसीज क्लासिफिकेशन युजिंग डीप लर्निंग होते.          प्रा. विनोद सपकाळ यांनी कार्यक्रमाचे उत्तम आयोजन केले. स्पर्धेला कॅम्पस संचालक प्रा. अशोक चव्हाण, प्राचार्य डॉ. आलम एन. शेख सर यांनी भेट दिली. डॉ. रईस मुल्ला,  डॉ. प्रमोद भावार्थे, प्रा. स्वप्नील देसाई आणि डॉ. महेंद्र पवार यांनी पोस्टर्सचे मूल्यमापन केले. अशाप्रकारे व

स्तन कर्करोग तपासणी व निदान कक्षाचे आज उद्घाटन !

इमेज
स्तन कर्करोग तपासणी व निदान कक्षाचे आज उद्घाटन ! मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : जागतिक महिला दिनानिमित्त राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्नित रुग्णालयामध्ये स्तन कर्करोग तपासणी व निदान कक्ष सुरू करण्यात येणार आहे. या कक्षाचे उद्घाटन आज (बुधवारी) सकाळी ९ वा. कामा व आल्ब्लेस रुग्णालय येथे वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते होणार आहे.        वैद्यकीय शिक्षण विभागाच्यावतीने सुरू करण्यात येणाऱ्या या कक्षाच्या माध्यमातून पुढील काळात स्तन कर्करोग जनजागृती अभियान राबविण्यात येणार आहे. हा कक्ष प्रत्येक बुधवारी दुपारी १२ ते २ या वेळेत कार्यरत असेल.

दर्जेदार मराठी चित्रपटांना आज अनुदान वाटप !

इमेज
दर्जेदार मराठी चित्रपटांना आज अनुदान वाटप ! मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :  मराठी चित्रपटाना प्रोत्साहन देण्यासाठी, राज्य शासनाच्या वतीने दर्जेदार मराठी चित्रपट निर्मितीस अर्थसहाय्य योजना राबवली जाते. यावर्षीच्या चित्रपट अनुदानाचे वाटप सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते आज बुधवार दि.८ मार्च रोजी मंत्रालयातील समिती सभागृहात करण्यात येणार आहे.        शासनाने नियुक्त केलेल्या चित्रपट परीक्षण समितीने यंदाच्या अनुदानासाठी ४१ चित्रपटांना पात्र ठरवले आहे. यातील ४  चित्रपटांना “अ” दर्जा तर ३३  चित्रपटांना “ब” दर्जा प्राप्त झाला आहे. तर ४ चित्रपट विविध राज्य, राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त असल्याने त्यांना शासन धोरणानुसार "अ" दर्जा देऊन अनुदान वितरीत करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी अनुदानप्राप्त चित्रपटाचा चमू उपस्थित राहणार असल्याची माहिती महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी व सांस्कृतिक विकास महामंडळाने दिली आहे.