पोस्ट्स

पाच हजारांची लाच घेतांना तलाठी ताब्यात !

इमेज
पाच हजारांची लाच घेतांना तलाठी ताब्यात !        नाशिक(वार्ताहर)::- अतिरिक्त कारभार असलेल्या तलाठीस ५ हजाराची लाच घेतांना लाच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडत कारवाई केली.   तक्रारदार यांची आत्या हिने तक्रारदार यांच्या वडीलांच्या नावे असलेली मौजे नागापूर, तालुका निफाड, जिल्हा नाशिक येथील गट नंबर ३३७ अन्वये एक हेक्टर तीन आर तसेच गट नंबर ३३९ अन्वये एक हेक्टर पाच आर अशी शेती मृत्युपत्र करून लिहून दिली होती. त्या बाबत  दुय्यम निबंधक निफाड यांचेकडे दस्त नोंदणी केला होता. त्या अनुषंगाने तक्रारदार यांच्याकडे केलेल्या अर्जाअन्वये तक्रारदार व त्यांचे वडील यांचे नाव सदरील जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर नोंद घेणे कामी महेश सहदेव गायकवाड ( वय- ४३ वर्ष, धंदा- नोकरी , तलाठी दावचवाडी अतिरिक्त कार्यभार चितेगाव, तालुका, निफाड, जिल्हा नाशिक ) पाच हजारांची लाच स्विकारताना ताब्यात घेण्यात आले. लाच लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अधिक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, अप्पर पोलीस अधीक्षक नारायण न्याहाळदे, उपअधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग संदिप घुगे, 

संजय चव्हाण यांची स्विकृत संचालकपदी निवड !

इमेज
संजय चव्हाण यांची स्विकृत संचालकपदी निवड ! नाशिक, न्यूज मसाला वृत्तसेवा::- नाशिक जिल्हा मजूर फेडरेशनच्या स्विकृत संचालकपदी आज संजय यादवराव चव्हाण यांची निवड झाली.  "चव्हाणांच्या निवडीने संस्थेच्या तसेच राजकीय, सामाजिक क्षेत्रातूनही अभिनंदनाचा वर्षाव !"      चव्हाण हे बरेच वर्ष संंचालक होते. गत पंचवार्षिक मध्ये त्यांच्या पत्नी सौ. आशा चव्हाण या उपाध्यक्षा होत्या. चव्हाण हे जनलक्षमी बँकेचे माजी संंचांलक असून भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ पदाधिकारी आहेत. त्यांच्या दीर्घ अनुभवाचा फायदा फेडरेशनला व्हावा या उदात्त हेतुने आज फेडरेशनच्या संंचालक मंडळाच्या बैठकीत त्यांच्या स्विकृत संचालकपदाला एकमुखाने मान्यता देण्यात आली. अध्यक्ष प्रमोद भाबड यांनी त्यांना नियुक्ती पत्र दिले. यावेळी उपाध्यक्षा शर्मीला कुसारे, राजेंद्र भोसले, संपतराव सकाळे, शिवाजी रौंदळ, प्रमोद मुळाणे, सतीश सोमवंंशी, सुरेश भोेये, भारत कोकाटे, अमोल थोरेे, रोहीत पगार, ज्ञानेेश्वर लहाणे, सविता धनवटे, राजेंद्र गावीत, राजाभाऊ खेमनार, शशिकांत उबाळे, अर्जुन चुंंबळे, दिप्ती पाटील, कविता शिंदे, सचीव सुनील वारुंगसे उपस्थित होते.

शासकीय वाहनचालक तब्बल दिड लाखांची लाच स्वीकारताना !

इमेज
शासकीय वाहनचालक तब्बल दिड लाखांची लाच स्वीकारताना ! नाशिक : त्रंबकेश्वर तहसील कार्यालयातील वाहनचालकाला तब्बल दीड लाखांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले, विशेष म्हणजे यापूर्वी या वाहन चालकाने ५० हजारांची लाच घेतली होती,          तक्रारदाराने मौजे शिरसाठे तालुका इगतपुरी येथे गट क्रमांक १७६ मधील शेतजमीन विकत घेण्यासाठी विसारपावती नोटरी केली होती, शेतजमीन संदर्भात तत्कालीन उपविभागीय अधिकारी इगतपुरी, त्रंबकेश्वर येथे वाद चालू होता. या वादाचा निकाल तक्रारदार यांच्या बाजूने करून दिल्याच्या मोबदल्यात2 लाख रुपयांची लाच मागितली होती. त्यापैकी ५० हजार दिले होते. राहिलेलं दीड लाख घेताना चालक अनिल बाबुराव आगीवले नेमणूक वाहनचालक त्र्यंबकेश्वर यांना पथकाने रंगेहाथ पकडले. अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, अपर अधीक्षक नारायण न्याहालदे, उपअधीक्षक नरेंद्र पवार, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संदीप साळुंखे, हवालदार पंकज पळशीकर, प्रकाश महाजन, नितीन कराड, प्रभाकर गवळी यांच्या पथकाने ही कारवाई केली

रामरक्षा स्तोत्र पाठांतर स्पर्धेमध्ये रंगुबाई जुन्नरे इंग्लिश मेडियम स्कूल तर मारुती स्तोत्र स्पर्धेमध्ये रचना विद्यालयाची बाजी.

इमेज
रामरक्षा स्तोत्र पाठांतर स्पर्धेमध्ये रंगुबाई जुन्नरे इंग्लिश मेडियम स्कूल तर मारुती स्तोत्र स्पर्धेमध्ये रचना विद्यालयाची बाजी...        नाशिक, न्यूज मसाला वृत्तसेवा::- अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेच्या रामरक्षा आणि मारुती स्तोत्र पाठांतर स्पर्धेमध्ये नाशिक जिल्ह्यातील विविध शाळांमधील इयत्ता तिसरी आणि चौथीच्या जवळपास ५७५ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. वेद पुराणे, उपनिषदे, स्तोत्रे आणि महाकाव्यानी समृद्ध असलेल्या भारतीय संस्कृतीची परंपरा महान आहे. तसेच आपल्या मराठी मनासाठी मारुती स्तोत्र आणि रामरक्षा ही स्तोत्रे लहानपणापासूनच संस्कार करणारी आहे. शारीरिक व्यायामाबरोबरच मनाचा व्यायाम होण्यासाठी पुरातन काळापासून अशी स्तोत्रे प्रत्येक घरामध्ये म्हटली जात होती. कालौघामध्ये याचे प्रमाण कमी कमी होत गेले.  अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेने हे संस्कार दृढ व्हावे म्हणून रामरक्षा आणि मारुती स्तोत्र पाठांतर स्पर्धेचे आयोजन केले होते. मराठी इंग्रजी माध्यमातील विविध प्राथमिक शाळांनी यामध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. इयत्ता तिसरी आणि चौथीचे विद्यार्थी अतिशय तन्मयतेने हि स्तोत्रे सादर करीत होती.

तीन बालकांवर यशस्वी ओपन हार्ट सर्जरी !

इमेज
तीन बालकांवर यशस्वी ओपन हार्ट सर्जरी ! राज्यस्तरीय लाईव्ह कार्यशाळा आयोजनामुळे बालहृदयरोग तज्ञांची स्तुतीसुमने ! नाशिक, न्यूज मसाला वृत्तसेवा::- वरिष्ठ बालहृदयविकार तज्ञांकडून मोलाचे मार्गदर्शन मिळावे तसेच बालहृदयउपचार करताना कोणत्या पद्धतीने काळजी घेतली जावी या उद्देशाने उत्तर महाराष्टातील एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये नुकतेच राज्यस्तरीय दोन दिवसीय लाईव्ह वर्कशॉपचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुंबईतील वरिष्ठ बालरोग व जन्मजात हृदयविकार तज्ञ डॉ. सुरेश राव यांनी उपस्थित बालरोगतज्ञ, सर्जन आणि फिजिशियन यांना मार्गदर्शन केले. दोन दिवसीय आयोजित कार्यशाळेत ३ बालकांवर यशस्वी ओपन हार्ट सर्जरी करण्यात आली.        मुंबईतील बालरोग व बालहृदयविकार शस्रक्रिया तज्ञ डॉ. सुरेश राव व एसएमबीटी हॉस्पीटलामधील हृदयविकार शस्रक्रिया विभागाचे प्रमुख डॉ. विद्युतकुमार सिन्हा यांच्या प्रमुख उपस्थितीत बालहृदय विकार व कन्जनायटल हार्ट शस्रक्रिया या विषयावर लाईव्ह कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेसाठी संपूर्ण महाराष्ट्रातून १०० पेक्षा अधिक डॉक्टरांनी हजेरी लावली. विशेष म्हणजे, ऑपरेशन थिएटरमधून थेट ऑडिओ व्हि

रामरक्षा आणि मारुतीस्तोत्र पाठांतर स्पर्धेत ५०० विद्यार्थी सहभागी होणार !

इमेज
अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेच्या रामरक्षा आणि मारुतीस्तोत्र पाठांतर स्पर्धेत ५०० विद्यार्थी सहभागी होणार !   नासिक, न्यूज मसाला वृत्तसेवा::-  वेद, पुराणे, उपनिषदे, स्तोत्रे आणि महाकाव्यांनी समृध्द असलेल्या भारतीय संस्कृतीची परंपरा महान आहे. आपल्या मराठी मनांसाठी मारुती स्तोत्र, रामरक्षा आणि मनाचे श्लोक हि स्तोत्रे लहानपणापासूनच संस्कार करणारी आहेत. शारीरिक व्यायामा बरोबरच मनाचा व्यायाम व्हावा म्हणून पुरातन काळापासून हि स्तोत्रे घरोघर म्हटली जात होती. आजही काही घरांमध्ये या स्तोत्रांचे पठाण होत आहे. परंतु आपल्या लहानग्यांना या स्तोत्राची गोडी लागावी तसेच त्यांनी ते सातत्याने म्हणत रहावे यासाठी अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेच्यावतीने नाशिक शहरातील प्राथमिक शाळांमधील इयत्ता तिसरीच्या विद्यार्थ्यांसाठी मारुती स्तोत्र आणि इयता चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी रामरक्षा स्तोत्र पाठांतर स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धा रविवार दिनांक ५ मार्च २०२३ रोजी  सकाळी ९.०० ते १२.३० यावेळेत होणार असून जवळपास ५५० शालेय विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदविला आहे. या स्पर्धा काळाराम मंदिर आणि अखिल

जेके आर्किटेक्ट ऑफ द इयर आंतरराष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा !

इमेज
जेके आर्किटेक्ट ऑफ द इयर आंतरराष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा ! नासिक, न्यूज मसाला वृत्तसेवा::- भारतासह जगभरातील नामवंत वास्तुविशारदांसाठी अतिशय महत्वपूर्ण असलेल्या जेके आर्किटेक्ट ऑफ द इयर या पुरस्काराची घोषणा नाशिकमध्ये आज राणा प्रताप सिंग, प्रशासक- जेके सिमेंट लि. यांच्या उपस्थितीत करण्यात आली. देशविदेशातील सुमारे २८५ प्रवेशिकांमधून वेगवेगळ्या श्रेणीतून  ११ जणांना पुरस्कार घोषित करण्यात आला. वास्तुकला व्यवसायातील उत्कृष्ट प्रतिभावंतांना त्यांनी  समाजाच्या विकासात दिलेल्या योगदानाबद्दल प्रोत्साहित करण्यासाठी हा  पुरस्कार  देण्यात येतो. जे के सिमेंटचे डॉ. राघवपत सिंघानिया यांच्या मार्गदर्शनाखाली सलग ३२ वर्षांपासून हा  पुरस्कार देण्यात येत आहे. हा पुरस्कार केवळ भारतातीलच नव्हे तर शेजारील देशांतील वास्तुशास्त्रीय गुणवत्तेचा मानकरी ठरला आहे. केवळ गुणवत्तेनुसार ज्युरींच्या निर्णयानुसार बक्षिसे दिली जातात. सर्वोच्च पुरस्कार तीन वर्षातून एकदा “ग्रेट मास्टर्स अवॉर्ड” किंवा “चेअरमन अवॉर्ड” या सन्मानांतर्गत आजीवन योगदानासाठी दिला जातो. भारतातील प्रवेशिका आर्किटेक्ट ऑफ द इयर अवॉर्ड, कमेंडेशन अवॉर्ड