"नो योर आर्मी" नावाने भव्य प्रदर्शन !महाराष्ट्रात प्रथमच होऊ घातलेलं प्रदर्शन पाहण्याची विद्यार्थ्यांसह जनतेला सुवर्ण संधी !!

"नो योर आर्मी" नावाने भव्य प्रदर्शन !
महाराष्ट्रात प्रथमच होऊ घातलेलं प्रदर्शन पाहण्याची विद्यार्थ्यांसह जनतेला सुवर्ण संधी !!

       नासिक (न्यूज मसाला वृत्तसेवा)::- नासिकचे खासदार हेमंत गोडसे आणि शेतकरी व भारतीय जवानांच्या परिवारासाठी, तसेच विविध समाजकार्यात गेल्या ८ वर्षांपासून अग्रेसर असलेल्या युनायटेड व्ही स्टॅन्ड फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दि. १८ मार्च २०२३ व रविवार दि. १९ मार्च २०२३ रोजी  "नो योर आर्मी" नावाचे एक भव्य प्रदर्शन गोल्फ क्लब मैदान, नाशिक येथे आयोजित केले आहे. युनायटेड व्ही स्टॅन्ड फाउंडेशन पुर्वीपासून आर्मीशी संलग्न, या पूर्वी देखील संस्थेने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने ‘नो युवर आर्मी’ मेळा भरवला होता ज्याला नाशिककरांनी अतिउत्तम प्रतिसाद दिला होता. या प्रदर्शनात केवळ आर्टलिरीच नव्हे तर इतर शस्त्रास्त्रे आणि सेवा देखील प्रदर्शित करण्यात येणार आहेत.  तोफखाना (विविध तोफा), शस्त्रागार, अभियंता उपकरणे, हवाई दल, आर्मी एव्हिएशन, वैद्यकीय उपकरणे प्रदर्शन, पायदळ, आर्मी रेकॉर्ड स्टॉल (निवृत्त सैनिकांच्या सेवेसाठी), प्रादेशिक सैन्य शस्त्रे, सिम्फनी बँड, आर्मी बँड, लाईव्ह शो (उदा.  घोडदौड, टेन्ट पॅकिंग, डेअरडेव्हिल्स, जिमनॅस्टिक) हे प्रदर्शनाचे आकर्षण असणार आहे. आपले संरक्षण दल वापरत असलेल्या आधुनिक शस्त्रास्त्रांचे हे प्रदर्शन असणार आहे, 

ज्यात नागिरकांना सशस्त्र दलांच्या जीवनाशी परिचित होता येईल, आणि तरुणांना सैनिकांशी संवाद साधण्यासाठी पाहिल्यांदाच भव्य व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. अग्नीवीर भरती संदर्भात देखील इथे मार्गदर्शन केंद्र असणार आहे. त्यामुळे तरुण पिढीच्या मनातील देशभक्ती वाढवून भारतीय लष्कराने केलेल्या कार्यातून प्रेरणा घेऊन त्यांना देशाच्या कार्यात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन दिले जाईल. लष्कराला एक करिअर म्हणून ओळख करुन दिली जाईल. नाशिक शहर तसेच जिल्ह्यातील नागरिक व सुमारे २००० शाळा आणि महाविद्यालये, अनाथाश्रम, दिव्यांग मुलांच्या संस्था तसेच ग्रामीण भागातील नागरिक, विद्यार्थी या सर्वांना आमंत्रित करण्यात येत आहे. हा कार्यक्रम नाशिक तसेच महाराष्ट्रातील सर्वात अविस्मरणीय आणि अनोखा कार्यक्रम असेल असे खासदार हेमंत गोडसे यांच्याकडून पत्रकार परिषदेत सांगण्यात आले. असे भव्य प्रदर्शन अद्याप पावेतो संपूर्ण महाराष्ट्रात घडलेलं नाही.  नाशिक हे प्राचीन काळापासून महाराष्ट्रातील एक धार्मिक पर्यटन स्थळ आहे आणि आता एक प्रगतीशील शहर म्हणून ओळखले जाते. नाशिक हे महाराष्ट्रातील एक प्रमुख लष्करी तळ देखील आहे. यात स्कूल ऑफ आर्टिलरी, सैन्याचे मुख्य प्रशिक्षण केंद्र , हवाई दल आणि इतर संरक्षण विभागांचा समावेश आहे .

         भारतीय सैन्याला आणि सैन्यदलाच्या वापरात असलेल्या शस्त्रांना या प्रदर्शनात स्वतः अनुभवायला मिळणार असल्यामुळे या मेळ्याला ‘नो योर आर्मी’ नाव देण्यात आलेले आहे. आजतागायत पहिल्यादांच असा भव्य दिव्य उपक्रम नाशिककरांना बघायला मिळणार आहे, त्यामुळे ‘न भूतो ना भविष्यती ‘नो योर आर्मी मेळा’ म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.
सगळ्याच शासकीय शाळेचे विद्यार्थी व तरुण येणार असल्यामुळे त्यापैकी एक विद्यार्थी देखील सैन्यात भरती झाला तरी सर्व मेहनत सार्थ ठरेल असे प्रतिपादन केले. प्रत्येकाला अभिमान वाटेल असा हा मेळा असणार आहे, आणि यातून प्रत्येकाची देशभक्ती द्विगुणित होईलच पण सैनिकांचं देशाप्रती असलेलं योगदान आपल्याला स्वतः डोळ्यांनी अनुभवयाला पहिल्यांदाच मिळणार आहे. संस्कृती आणि सांस्कृतिकने नटलेल्या व राष्ट्रीय एकात्मतने संपन्न असलेल्या भारतदेशाच्या देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रम नाशिककरांना बघायला मिळणार आहेत. मेडिकल इक्विपमेंट कॅम्पही या प्रदर्शनात असणार आहे, तसेच माजी सैनिक ज्यांचे पेन्शन किंवा कागदपत्रे काही कामे पेंडिंग असतील तर ते तिथे आर्टिलरी रेकॉर्डस् च्या माध्यमातून सोडवण्यात येतील.
कार्यक्रमाचे उद्घाटन नितीन गडकरी (रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री, भारत), अजयजी भट (संरक्षण राज्यमंत्री), जनरल मनोज जी. पांडे (सेनाप्रमुख), एकनाथ शिंदे (महाराष्ट्राचे मुख्यमंत्री), देवेंद्रजी फडणवीस (उपमुख्यमंत्री महाराष्ट्र) आणि इतर अनेक प्रतिष्ठित लष्कर/नौदल/हवाई दलाचे अधिकारी, मंत्री, व्यापारी आणि खेळाडू व इतर क्षेत्रातील भारताला अभिमान असलेल्या मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहेत. शाळेतील विद्यार्थ्यांना एक अनोखे प्रदर्शन बघायला मिळेल व देशसेवेची भावना निर्माण होईल.
    कार्यक्रमाचे उद्घाटन दिनांक 18 मार्च 2023 रोजी सकाळी नऊ वाजता होणार आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गटविकास अधिकारी व सहाय्यक लेखाधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

दिवाळी अंकासाठी साहित्य पाठविण्याचे आवाहन ! साप्ताहिक न्यूज मसाला चा "लोकराजा" दिवाळी विशेषांक २०२४,

एकदा सर्वांनी कवयित्री फरझाना इकबाल यांची पंढरीच्या "विठ्ठलाच्या भेटीसाठी मन विठाई विठाई" रचना ऐकायला हवी !