पोस्ट्स

मेक्सिकोतील राज्य महाराष्ट्राशी व्यापार, शैक्षणिक सहकार्य वाढविण्यास इच्छुक-सॅम्युएल आलेहान्द्रो

इमेज
मेक्सिकोतील राज्य महाराष्ट्राशी व्यापार, शैक्षणिक सहकार्य वाढविण्यास इच्छुक-सॅम्युएल आलेहान्द्रो न्यूज मसाला वृत्तसेवा नासिक, 7387333801,              मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : मेक्सिकोतील नवेवो लिआन राज्याचे गव्हर्नर सॅम्युएल आलेहान्द्रो गार्सिया सेपूलवेडा यांनी एका शिष्टमंडळासह राज्यपाल रमेश बैस यांची राजभवन येथे सदिच्छा भेट घेतली.          नवेवो लिआन हे मेक्सिकोतील सर्वाधिक गुंतवणूक स्नेही प्रगत राज्य असून राज्याची सीमा अमेरिकेशी जोडली असल्याने ते अनेक देशांशी व्यापाराचे प्रवेशद्वार आहे असे गव्हर्नर सॅम्युएल आलेहान्द्रो यांनी यावेळी सांगितले.          महाराष्ट्राचे व्यापार-उद्योगातील महत्त्व जाणून मेक्सिकोने मुंबईत आपला वाणिज्य दूतावास सुरु केला असून उद्योजक-व्यापाऱ्यांना मेक्सिकोत येण्यासाठी सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील असे त्यांनी सांगितले. नवेवो लिआन राज्यात चार खासगी विद्यापीठे असून आपले राज्य व्यापारासह महाराष्ट्रातील विद्यापीठांशी शैक्षणिक सहकार्य करण्यास इच्छुक आहे असेही त्यांनी राज्यपाल बैस यांना सांगितले.            इलेक्ट्रिक वाहनांची कंपनी असलेली टेस्ला, बीएमडब्

ग्रामपंचायत विभागातील दोन कनिष्ठ सहाय्यक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

इमेज
ग्रामपंचायत विभागातील दोन कनिष्ठ सहाय्यक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !          नासिक::- परिक्षेत्रात नंदुरबार पंचायत समिती, ग्रामपंचायत विभागातील कनिष्ठ सहाय्यक दादाभाई फुला पानपाटील, व सुखदेव भुरसिंग वाघ यांना लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने ताब्यात घेण्यात आले.          तक्रारदार हे स्वतः लोकसेवक असून त्यांची सातारा ते नंदुरबार अशी आंतरजिल्हा बदली झाल्यानंतर त्यांचे पगारवाढ (जुलै-२०२१ ते मे-२०२३) व सातव्या वेतन आयोगाचे उर्वरीत हप्ते काढून बिल मंजूर करून देण्याचे मोबदल्यात यातील आलोसे क्रमांक दादाभाई पानपाटील, कनिष्ठ सहाय्यक, यांनी दि. २६ जून रोजी ७०००/- रू. लाचेची मागणी केली तसेच आलोसे सुखदेव वाघ, कनिष्ठ सहाय्यक, यांनी ८ आॅगस्ट रोजी तक्रारदार यांचेकडून १०००/- ते २०००/- रूपये अशी मोघम स्वरूपात लाचेची मागणी केली. त्यानंतर सापळा कारवाई दरम्यान मागणी केलेली लाचेची रक्कम यातील पानपाटील यांनी दिनांक ८ आॅगस्ट रोजी पंचायत समिती आवारात स्वीकारल्यानंतर त्यांना पंच साक्षीदारांसमक्ष पकडण्यात आलेले आहे. तसेच नंदुरबार शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिय

दोन आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी मोनिका गोडबोले-यशोद सन्मानित ! विशेष बालकांना प्रशिक्षण कार्याची लंडन बुक ऑफ रेकॉर्ड ने घेतली दखल !!

इमेज
दोन आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी मोनिका गोडबोले-यशोद सन्मानित ! विशेष बालकांना प्रशिक्षण कार्याची लंडन बुक ऑफ रेकॉर्ड ने घेतली दखल !!   न्यूज मसाला वृत्तसेवा नासिक 7387333801             नाशिक ( प्रतिनिधी )::- लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सतर्फे विशेष बालकांना प्रशिक्षण देऊन त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याच्या कार्याबद्दल मोनिका गोडबोले - यशोद यांना सन्मानित करण्यात आले आहे. नुकतेच प्रमाणपत्र, सन्मानचन्ह व पदक त्यांना प्रदान करण्यात आले. पाठोपाठ एमटीटीव्ही न्यूज मीडिया संस्थेने त्यांच्या विशेष मुलांच्या विकासात देत असलेल्या योगदानाची दखल घेऊन पुरस्कार बहाल केला.     विशेष बालके अधिक संवेदनशील आणि  मनस्वी असतात. त्यांच्यावर चिकाटीने उपचार करून प्रशिक्षण द्यावे लागते. त्यांना सर्वसामन्यांप्रमाणे मुख्य प्रवाहात आणणे हे जिकिरीचे व कौशल्याचे काम असते. रायझिंग चाईल्ड डेव्हलपमेंट अँड लर्निंग सेंटरमध्ये  अश्या बालकांना व त्यांच्या पालकांना विशेष प्रशिक्षण दिले जाते. देशभरातून तसेच परदेशातून येथे येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. सर्वांगीण उपचारांनी काही महिन्यात सुपरिणाम होऊन मुलांमध्ये सुधारणा

पंडित कांबळे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्य पुरस्कार प्रदान !

इमेज
पंडित कांबळे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्य पुरस्कार प्रदान ! न्यूज मसाला वृत्तसेवा, नासिक, 7387333801         उस्मानाबाद : लातूर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्य अकादमीच्या वतीने दरवर्षी कथा, कविता, कादंबरी, बालसाहित्य, आत्मचरित्र, संपादित साहित्य व आंबेडकरी साहित्य या प्रकारात उल्लेखनीय लेखन करणाऱ्या साहित्यिकांच्या साहित्य प्रकारास डॉ. बाबासाहेब आंबेडकर राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार दिला जातो. त्यातील आंबेडकरी साहित्य या प्रकारात पंडित कांबळे यांच्या "उस्मानाबाद जिल्ह्यातील आंबेडकरवादी साहित्यिक" या पुस्तकास २०२२ सालचा तृतीय राज्यस्तरीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्य पुरस्कार मिळाला. दिनांक ६ ऑगस्ट २०२३ रोजी भालचंद्र ब्लड बँक, लातूर येथे पंधरावा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. यावेळी पंडित कांबळे व लीना कांबळे यांचा ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष व कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. अरविंद शोभणे यांच्या हस्ते शाल, पुष्पहार, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व रोख रक्कम देऊन सपत्निक डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्य पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. यावे

नांदगाव येथील "गिरणा वसाहतीचं" अनोखं स्नेह संमेलन ! तब्बल ३५ वर्षांनंतर १८० सभासद एकत्र !

इमेज
नांदगाव येथील "गिरणा वसाहतीचं" अनोखं स्नेह संमेलन ! तब्बल ३५ वर्षांनंतर १८० सभासद एकत्र ! न्यूज मसाला वृत्तसेवा,          नासिक::- नांदगाव तालुक्यातील साकोरा रोडवर असलेल्या गिरणा वसाहतीत साधारण सन १९६० ते सन २००५ या कालावधीत वास्तव्यास असलेल्या तत्कालीन लहान थोर अबालवृद्धांचा स्नेह मेळावा त्रंबकेश्वर रोडवरील आनंद रिसॉर्ट, नाशिक येथे अनोख्या पद्धतीने रविवार दिनांक ६ ऑगष्ट २०२३ रोजी आनंदोत्सवात साजरा झाला. या स्नेह संमेलनाचे अध्यक्ष स्थान गिरणा कॉलनीतील जेष्ठ सदस्य शाम जोशी यांनी भूषविले तर प्रमुख पाहुणे म्हणून जलसंपदा विभाग मंत्रालय मुंबई येथुन सचिव म्हणून सेवानिवृत्त झालेले इंजि. पी. आर. भामरे व जलसंपदा विभागातुन मुख्य अभियंता म्हणुन सेवानिवृत्त झालेले इंजि. र. वा. निकुम हे उपस्थित होते.         गिरणा वसाहत नांदगाव येथे शासकीय सेवेनिमित्त आपले जीवन व्यथित केलेले साधारण १०० कुटुंबातील १८० सभासद या स्नेह मेळाव्यास उपस्थित होते. स्नेह मेळाव्यास उपस्थित असणारे सभासद साधारण ३६ वर्षानंतर एकमेकांना भेटुन आपल्या कौटुंबिक जीवनाच्या विचारांची देवानं घेवाण उपस्थितांनी केली. जुन्या आठवणी

नात्यांची परिभाषा आणि भावनांचा प्रवास उलगडणारा "लाईफकोच" म्हणजे "दो गुब्बारे" !

इमेज
नात्यांची परिभाषा आणि भावनांचा प्रवास उलगडणारा "लाईफकोच" म्हणजे "दो गुब्बारे" !  यशवंतराव चव्हाण सेंटरमुळे युवा आणि ज्येष्ठ तसेच कलाकार आणि प्रेक्षक यांची ह्रदयस्पर्शी भेट !! न्यूज मसाला वृत्तसेवा,           मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : कधी कधी काही नाती आपली असूनही दुरावतात, सुखी परिवार हा फक्त भिंतीवर टांगलेल्या छायाचित्रामध्येच दिसतो. पण प्रत्यक्षात त्याची चौकट खिळखिळी झालेली असते, इतकी की जराशा धक्क्याने ती कोसळून पडेल आणि आत असलेल्या माणसांचं नातं तुटून जाईल म्हणून ती जीवापाड जपावी आणि कुणालाही कळू नये हाच प्रयत्न असतो. ही धडपड वरुण नार्वेकर यांच्या दिग्दर्शनातून "दोन गुब्बारे" वेबसिरीजच्या स्क्रिनिंग प्रसंगी पाहायला मिळाली.               काही नाती नव्याने आपल्याशी जुळवून घेतात. वेगळी भाषा, प्रांत, संस्कृती यासोबतच युवा व ज्येष्ठ नागरिक या दोन्ही पिढ्यांचा एकमेकांसोबत होणारा सुखद संवाद हा दुरावल्यामुळे दुखावलेल्या नात्यांवर मायेची फुंकर घालणारा होता. यामुळे नव्याने सुरू झालेल्या या नात्यासोबत पुन्हा आयुष्य उमेदीने जगायला इच्छा होते. हे डॉ. मोहन आगाशे आण

तहसीलदारास पंधरा लाखांची लाच मागितल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

इमेज
तहसीलदारास पंधरा लाखांची लाच मागितल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !          नासिक::-  तहसीलदार नरेशकुमार तुकाराम बहिरम, यांस १५ लाखांची लाच मागितल्यावर करणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने ताब्यात घेण्यात आले.         राजुर बहुला तालुका जिल्हा नाशिक येथील जमिनीच्या मालक यांच्या जमिनीमध्ये मुरुम उत्खनना बाबत मूल्य नियमानुसार पाचपट दंड,  स्वामित्वधन जागा भाडे मिळून एकूण रक्कम १,२५,०६,२२०/- याप्रमाणे दंड आकारणी केले बाबत आलोसे यांच्या कार्यालयाकडील आदेश आले होते. त्या आदेशाविरुद्ध जमिनीच्या मालक यांनी उपविभागीय अधिकारी, नाशिक यांच्याकडे अपील दाखल केले होते त्याबाबत आदेश होऊन सदरचे प्रकरण पुनश्च फेर चौकशीसाठी नरेशकुमार बहिरम, तहसीलदार नाशिक यांच्याकडे पाठवण्यात आले होते. सदर मिळकती मधील उत्खनन केलेला मुरूम त्याच जागेत वापर वापर झाल्याचे जमिनीच्या मालक यांनी त्यांचे कथनात नमूद केले होते. सदर बाबत पडताळणी करणे कामी आरोपी लोकसेवक यांनी जमिनीच्या मालक यांना त्यांच्या मालकीच्या राजुर बहुला तालुका जिल्हा नाशिक येथे स्थळ निरीक्षण वेळी बोलावले होते. परंतु जमिनीच्या मालक या व

लोकशाहीर अण्णा भाऊ विचारवेधराष्ट्रीय पुरस्कार डॉ.शंकर अंदानी यांना प्रदान ! अण्णाभाऊंचे साहित्य म्हणजे मानवमुक्तीचा हुंकार : ॲड. कृष्णा पाटील

इमेज
लोकशाहीर अण्णा भाऊ विचारवेध राष्ट्रीय पुरस्कार डॉ.शंकर अंदानी यांना प्रदान !  अण्णाभाऊंचे साहित्य म्हणजे मानवमुक्तीचा हुंकार : ॲड. कृष्णा पाटील  छाया पाटील, डॉ. नंदकुमार गोंधळी लोकशाहीर अण्णा भाऊ विचारवेध जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित            कोल्हापूर (प्रतिनिधी) : लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य कष्टकरी, उपेक्षित समाजाशी नातं सांगणार असून त्यांचे साहित्य म्हणजे मानवमुक्तीचा हुंकार आहे असे प्रतिपादन ज्येष्ठ विधीज्ञ व साहित्यिक ॲड. कृष्णा पाटील यांनी केले. ते प्रागतिक लेखक संघ, निर्मिती विचारमंच, कोल्हापूर यांच्या वतीने आयोजित लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमात बोलत होते. यावेळी मानाचा, सन्मानाचा लोकशाहीर अण्णा भाऊ विचारवेध जीवन गौरव पुरस्कार जेष्ठ समाजसेविका, धम्मलिपी प्रशीक्षिका, कवी आणि संपादिका छाया पाटील (मुंबई) आणि पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष, ज्येष्ठ आंबेडकरवादी नेते डॉ. नंदकुमार गोंधळी (कोल्हापूर) यांना मानाचा फेटा, मानपत्र, सन्मानचिन्ह आणि एक लाख रुपयांची पुस्तके देऊन सन्मानित करण्यात आले. राजर्षी शाहू स्मारक भवन, कोल्हाप

मेकॅनिकल इंजिनिअर मराठमोळी अभिनेत्री अपूर्वा आनंदचा मुख्य नायिकेच्या भूमिकेतील 'सिर्फ मनी' हिंदी चित्रपट उद्या चित्रपटगृहात दाखल !

इमेज
मेकॅनिकल इंजिनिअर मराठमोळी अभिनेत्री अपूर्वा आनंदचा मुख्य नायिकेच्या भूमिकेतील 'सिर्फ मनी' हिंदी चित्रपट उद्या चित्रपटगृहात दाखल ! अपूर्व आनंद ने नाशिकच्या शिरपेचात रोवला मानाचा तुरा ! 'सिर्फ मनी' हिंदी चित्रपटात केली मुख्य नायिकेची भूमिका        नाशिक(प्रतिनिधी):- नाशिकचा कला साहित्य क्षेत्रातील वारसा जपत आजवर अनेक कलाकारांनी चित्रपटसृष्टीत नाव केल आहे. असाच काहीसा प्रयत्न करत शहरातील उदयोन्मुख अभिनेत्री म्हणून अपूर्वा आनंद ह्या मराठमोळ्या मुलीने 'सिर्फ मनी' ह्या हिंदी चित्रपटात मुख्य नायिकेची भूमिका करत नाशिक शहराचे नाव एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं आहे. 'सिर्फ मनी' हा चित्रपट उद्या ४ ऑगस्ट रोजी चित्रपट गृहात दाखल होत आहे.            पंजाब अमृतसर येथे वास्तव्यास राहणारी रंगीली नावाची तरुणी जी एका सर्वसामान्य घरातील मात्र सर्व गुण संपन्न असणारी मुलगी. बालपणापासूनच अभिनय क्षेत्राची आवड असते. एक चांगली अभिनेत्री व्हावी हे स्वप्न तिच्या आईचे आणि तीचे देखील असते. याच अनुषंगाने आईचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि आपलं नशीब आजमावण्यासाठी रंगीली अमृतसर पंजाब येथू

Today's weekly NEWS MASALA Issue (03 August 2023)

इमेज
Today's weekly NEWS MASALA Issue (03 August 2023)