ग्रामपंचायत विभागातील दोन कनिष्ठ सहाय्यक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

ग्रामपंचायत विभागातील दोन कनिष्ठ सहाय्यक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

         नासिक::- परिक्षेत्रात नंदुरबार पंचायत समिती, ग्रामपंचायत विभागातील कनिष्ठ सहाय्यक दादाभाई फुला पानपाटील, व सुखदेव भुरसिंग वाघ यांना लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने ताब्यात घेण्यात आले.

         तक्रारदार हे स्वतः लोकसेवक असून त्यांची सातारा ते नंदुरबार अशी आंतरजिल्हा बदली झाल्यानंतर त्यांचे पगारवाढ (जुलै-२०२१ ते मे-२०२३) व सातव्या वेतन आयोगाचे उर्वरीत हप्ते काढून बिल मंजूर करून देण्याचे मोबदल्यात यातील आलोसे क्रमांक दादाभाई पानपाटील, कनिष्ठ सहाय्यक, यांनी दि. २६ जून रोजी ७०००/- रू. लाचेची मागणी केली तसेच आलोसे सुखदेव वाघ, कनिष्ठ सहाय्यक, यांनी ८ आॅगस्ट रोजी तक्रारदार यांचेकडून १०००/- ते २०००/- रूपये अशी मोघम स्वरूपात लाचेची मागणी केली. त्यानंतर सापळा कारवाई दरम्यान मागणी केलेली लाचेची रक्कम यातील पानपाटील यांनी दिनांक ८ आॅगस्ट रोजी पंचायत समिती आवारात स्वीकारल्यानंतर त्यांना पंच साक्षीदारांसमक्ष पकडण्यात आलेले आहे. तसेच नंदुरबार शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
          पर्यवेक्षण अधिकारी राकेश आ. चौधरी, पोलीस उप अधीक्षक, सापळा अधिकारी समाधान महादू वाघ, पोलीस निरीक्षक, सापळा कार्यवाही पथक पोहवा/विजय ठाकरे, पोना/देवराम गावित, पोना/संदीप नावाडेकर, पोना/अमोल मराठे व पोना/मनोज अहिरे, सापळा मदत पथक माधवी एस.वाघ, पोलीस निरीक्षक, पोहवा/विलास पाटील व मपोना/ज्योती पाटील यांनी श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर पोलीस अधीक्षक, माधव रेड्डी अपर पोलीस अधीक्षक, नरेंद्र पवार वाचक पोलीस उप अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कारवाई करण्यात आली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सेवानिवृत्त होत असणाऱ्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकाच्या पत्नीचे त्यांच्या आयुष्य भरातील चढ उतार तसेच जडणघडणा विषयीचा लेखाजोखा स्वरूपात मनोगत.... पत्थर खाकर भी खडे रहे! वो लहू बनकर अडे रहे ! जब दुनिया जश्न मनाती है ! तब पुलिस फर्जं निभाती है ! सविस्तर मनोगत वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

विनामूल्य मैफल ! अफलातून म्युझिक लव्हर्सतर्फे सोमवारी सूरसम्राज्ञी लता मैफल !

होय! मी नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती लिना बनसोड(भा.प्र.से.) यांच्याबद्दलच बोलतो आहे, लिहितो आहे.