दोन आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी मोनिका गोडबोले-यशोद सन्मानित ! विशेष बालकांना प्रशिक्षण कार्याची लंडन बुक ऑफ रेकॉर्ड ने घेतली दखल !!

दोन आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी मोनिका गोडबोले-यशोद सन्मानित ! विशेष बालकांना प्रशिक्षण कार्याची लंडन बुक ऑफ रेकॉर्ड ने घेतली दखल !!

 
न्यूज मसाला वृत्तसेवा नासिक
7387333801
            नाशिक ( प्रतिनिधी )::- लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सतर्फे विशेष बालकांना प्रशिक्षण देऊन त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याच्या कार्याबद्दल मोनिका गोडबोले - यशोद यांना सन्मानित करण्यात आले आहे. नुकतेच प्रमाणपत्र, सन्मानचन्ह व पदक त्यांना प्रदान करण्यात आले. पाठोपाठ एमटीटीव्ही न्यूज मीडिया संस्थेने त्यांच्या विशेष मुलांच्या विकासात देत असलेल्या योगदानाची दखल घेऊन पुरस्कार बहाल केला.

    विशेष बालके अधिक संवेदनशील आणि  मनस्वी असतात. त्यांच्यावर चिकाटीने उपचार करून प्रशिक्षण द्यावे लागते. त्यांना सर्वसामन्यांप्रमाणे मुख्य प्रवाहात आणणे हे जिकिरीचे व कौशल्याचे काम असते. रायझिंग चाईल्ड डेव्हलपमेंट अँड लर्निंग सेंटरमध्ये  अश्या बालकांना व त्यांच्या पालकांना विशेष प्रशिक्षण दिले जाते. देशभरातून तसेच परदेशातून येथे येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. सर्वांगीण उपचारांनी काही महिन्यात सुपरिणाम होऊन मुलांमध्ये सुधारणा होत असल्याचे चित्र दिसते. विशेष मुलांच्या मानसिक, शारीरिक विकासाला चालना दिली जाते. अस्थिर, चंचल, स्वमग्न, चिडखोर व सतत अस्वस्थ मुलांमध्ये प्रशिक्षणाने सुधारणा होऊन सर्वसामान्य मुलांप्रमाणे ते प्रगती करू शकतात.
   प्रशिक्षक मोनिका गोडबोले - यशोद म्हणाल्या, या पुरस्कारांनी आमच्या कार्यावर आंतरराष्ट्रीय मान्यतेची मोहर उमटली आहे. काही मुलांमध्ये जन्मत:च अनेक समस्या असतात. पालकांनी त्या लवकर ओळखून व स्वीकारून त्यावर तातडीने योग्य इलाज करणे आवश्यक असते. मी व माझे सहकारी अशा प्रत्येक मुलाची गरज लक्षात घेऊन त्याप्रमाणे प्रशिक्षण देतो. ओमकार साधना, गायत्री मंत्र उच्चार यांचा स्मरणशक्ती, शारीरिक व बुध्यांक वाढ यासाठी निश्चित उपयोग होतो. आम्ही देत असलेले प्रशिक्षण, मूल व पालक या तिन्ही घटकांच्या एकत्रित प्रामाणिक प्रयत्नातून या विशेष बालकांच्या प्रगतीचा आलेख उंचावतो असे त्यांनी नमूद केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सेवानिवृत्त होत असणाऱ्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकाच्या पत्नीचे त्यांच्या आयुष्य भरातील चढ उतार तसेच जडणघडणा विषयीचा लेखाजोखा स्वरूपात मनोगत.... पत्थर खाकर भी खडे रहे! वो लहू बनकर अडे रहे ! जब दुनिया जश्न मनाती है ! तब पुलिस फर्जं निभाती है ! सविस्तर मनोगत वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

विनामूल्य मैफल ! अफलातून म्युझिक लव्हर्सतर्फे सोमवारी सूरसम्राज्ञी लता मैफल !

प्रेरणादायी गोष्टींमधून विशेष बालकांनी अनुभवले छत्रपती शिवाजी महाराज !