भगवत्पूज्यपाद आदि शंकराचार्य पुरस्कार' परमपूज्य स्वामी श्री माधवगिरीजी गुरु जनार्दन (मौनगिरीजी) महाराज (तपोवन, नाशिक, महाराष्ट्र) यांना ,व, ‘वेदसंवर्धन पुरस्कार' वेदमूर्ति उमेश अनंतमहाराज टाकळीकर (जि.परभणी, महाराष्ट्र) यांना घोषित, ९ मे रोजी प्रदान सोहळा-स्वामी स्वरुपानंद सरस्वती !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!! 

भगवत्पूज्यपाद आदि शंकराचार्य जयंती सोहळा, पुरस्कार वितरण व ग्रंथ प्रकाशन - वैशाख शु.पंचमी गुरुवार दि. ९ मे २०१९
          आदि शंकराचार्यांचे विचार आणि कार्य यांचा जनसामान्यांच्यामध्ये प्रसार करणा-या फुलगाव येथील श्रुतिसागर आश्रमाचे संस्थापक परमपूज्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांच्या शुभहस्ते दरवर्षी राष्ट्रीय स्तरावर ‘भगवत्पूज्यपाद आदि शंकराचार्य पुरस्कार' प्रदान करण्यात येतो. यावर्षी हा पुरस्कार परमपूज्य स्वामी श्री माधवगिरीजी गुरु जनार्दन (मौनगिरीजी) महाराज (तपोवन, नाशिक, महाराष्ट्र) यांना तसेच, ‘वेदसंवर्धन पुरस्कार' वेदमूर्ति श्री.उमेश अनंतमहाराज टाकळीकर (जि.परभणी, महाराष्ट्र) यांना देण्यात येणार आहे. भारतातील वैदिक, आध्यात्मिक, सांस्कृतिक क्षेत्रात कार्य करणा-या आचारसंपन्न व्यक्तींना दरवर्षी हे मानाचे पुरस्कार देण्यात येत असून मानपत्र, सन्मानचिन्ह, महावस्त्र आणि रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. | श्रुतिसागर आश्रमाच्या प्रमुख आचार्य माताजी स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती यांच्या नेतृत्वाखाली श्रीभीमाशंकर ट्रस्ट व श्रीदक्षिणामूर्ति रिलिजस् ट्रस्ट यांमार्फत गेली ३० वर्षे प्रवचनमालिका, सी.डी., ग्रंथप्रकाशन, धर्मादाय दवाखाना, वैद्यकीय शिबिरे, आदिवासी भागात शैक्षणिक मदत, मोफत वह्यावाटप, पिण्याच्या पाण्याची सोय, फिरता दवाखाना इत्यादि अनेक समाजोपयोगी उपक्रम सुरु आहेत. या उपक्रमाचा एक भाग म्हणून ‘आदि शंकराचार्य जयंती साजरी केली जात आहे. यंदा गुरुवार - दि. ९ मे २०१९ रोजी शिवशक्ति ज्ञानपीठ, नाशिक येथे दुपारी ३ ते रात्री ८.३० वाजता हा सोहळा संपन्न होईल. सर्वांसाठी हा कार्यक्रम खुला
        आहे आणि प्रवेश विनामूल्य आहे.
       कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष सपकाळ शिक्षणसमूह, नाशिकचे श्री. रवींद्र सपकाळ असून डॉ.बाबासाहेब तराणेकर (अध्यक्ष अखिल भारतीय त्रिपदी परिवार), सर डॉ. मो.स.गोसावी-थोर शिक्षणमहर्षि, नाशिक, डॉ.एस्.टी. देशमुख-मा. कुलगुरु, अमरावती विद्यापीठ, श्री.मोहनराव चव्हाण यांची प्रमुख उपस्थिति लाभणार आहे. तसेच, या सोहळ्यामध्ये, परमपूज्य स्वामी सागरानंद सरस्वतीजी महाराज यांची मंगल उपस्थिति असणार आहे. यावेळी सनातन संस्कृतीचे वैज्ञानिक रहस्य या विषयावर परमपूज्य स्वामी सवितानंदजी महाराज (गुजरात) तसेच, राष्ट्रउभारणीमध्ये धर्माचे महत्त्व या विषयावर श्री. प्रकाश पाठक (धुळे) या मान्यवर वक्त्यांची भाषणे व माताजींचे प्रबोधन होणार आहे. यावर्षी परमपूज्य माताजींनी लिहिलेल्या योगवासिष्ठ - द्वितीय मुमुक्षुव्यवहार प्रकरण या विशेष ग्रंथाचे या सोहळ्यामध्ये प्रकाशन होणार आहे. परमपूज्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांच्या अध्यक्षतेखाली हा संपूर्ण सोहळा होणार असून त्यांचे आशीर्वचन लाभणार आहे.
      आजच्या विज्ञानयुगामध्ये मनुष्याने विज्ञानाच्या साहाय्याने सर्वच क्षेत्रात प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रगति केलेली आहे. एका बाजूला सर्व सुखसोयींनी समृद्ध झालेले जीवन तर दुस-या बाजूला ताणतणाव, नैराश्य, उद्विग्नता यांनी भरलेले जीवन असे परस्परविरोधी चित्र प्रत्येकाच्या जीवनात दिसते. बाह्य अनेक साधनांचा उपयोग करूनही मनुष्याला चिरंतन सुखाची

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इशरे नाशिक शाखेच्या नवीन कार्यकारिणीने केले पदग्रहण !

"राजकारण गेलं मिशीत" या चित्रपटात उद्धव भयवाळ यांची लावणी !

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।