होय! मी नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती लिना बनसोड(भा.प्र.से.) यांच्याबद्दलच बोलतो आहे, लिहितो आहे.
आभाळाने नाकारलेल्या पंखांना विहाराचं सामर्थ्य द्यावं, उपेक्षितांना साधनांचं पाठबळ देत संधींची कवाडं खुली करावी, दुर्जनांचा समाचार घेत सज्जानांचा सन्मान करावा, सहकारी वर्गाला उंबुटू न्यायाने सर्वथैव लोकहिताचे आत्मभान द्यावे आणि सुशासनाच्या निर्मितीतून लोककेंद्री संविधानाचा पाया मजबूत करत राष्ट्रकार्यात स्वतःला समर्पित करावे, अशा पंचसूत्रीतून लोकसेवेचा परिपाठ पढवत लोकाभिमुख प्रशासनाची आश्वासक मांडणी करणारी 'भारत की बेटी' काल नाशिकमधून पुढील जबाबदारीसाठी मार्गस्थ झाली. व्रतस्थ लोकसेवेच्या या अग्रणीला निरोप देताना प्रशासनाचा जेव्हा कंठ दाटून आला तेव्हा एक सलाम हृदयापासून निघाला आणि शब्दरूप घेऊन कागदावर स्थिरावला. होय! मी नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती लिना बनसोड(भा.प्र.से.) यांच्याबद्दलच बोलतो आहे, लिहितो आहे. पत्रकारितेच्या उण्यापुऱ्या अडीच दशकांत कितीतरी सनदी अधिकाऱ्यांशी संपर्क आला. पण, अशा अधिकाऱ्यांना निरोप देताना गहिवरलेले प्रशासन बघण्याचा दुर्मिळ योग कालचा दिवस पुढ्यात टाकून गेला. फार नाही, पण दोनच वर्षांच्या कारकीर्दीत नाशिक जिल्हा
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा