गृह विलगिकरणात असलेल्या कुटुंबियांच्या घरी मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांची भेट ! झपाट्याने वाढत असलेली कोरोना रुग्णांच्या बाबतीत ग्रामसेवक, वैद्यकीय अधिकाऱ्यांना मार्गदर्शन व सूचना !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!



नाशिक(प्रतिनिधी)::- नाशिक शहरासह ग्रामीण भागात कोरोना रुग्णाच्या संख्येत वाढ होत असल्याने जिल्हा परिषदेच्या वतीने ग्रामीण भागात विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. नाशिक तालुक्यात गेल्या दोन ते तीन दिवसात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर आज जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी जातेगाव ग्रामपंचायत तसेच संदीप फाउंडेशन येथे भेट देऊन कामाचा आढावा घेतला व विविध सूचना केल्या. नाशिक तालुक्यातील सर्व ग्रामसेवक, वैद्यकीय अधिकारी यांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारा  मार्गदर्शन करून हॉटस्पॉट क्षेत्र, कंटेन्मेंट क्षेत्र, टेस्टिंग संस्थात्मक विलगीकरण याबाबत सविस्तर सूचना दिल्या. नाशिक तालुक्यातील ग्रामपंचायत जातेगाव येथे भेट देऊन कंटेन्मेंट क्षेत्राची पाहणी केली तसेच गृह विलगीकरणात असलेल्या दोन रुग्णाच्या कुटुंबांना भेटी देऊन ते काळजी कशी घेतात, घरात स्वतंत्र स्वच्छतागृह आहे का याची महिती घेतली. संस्थात्मक विलागिकरण करणेसाठी शाळेची पाहणी करून संबधित यंत्रणेला आवश्यक सूचना दिल्या. यावेळी लसीकरणाच्या मोहिमेचाही त्यांनी आढावा घेतला. ग्रामपंचायत महिरावणी येथील संदीप फाउंडेशन कोविड केअर सेंटरला भेट देऊन माहिती घेतली व मार्गदर्शन केले,
यावेळी ग्रामपंचायत विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र परदेशी, गट विकास अधिकारी डॉ. सारिका बारी, पंचायत समिती सदस्य रत्नाकर चुंभळे यांच्यासह तालुकास्तरीय अधिकारी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

निवडणूक लढवायची तर आधी शपथ घ्यावी लागते !

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।

अखंड शारदोत्सवाची गोदातटाला परंपरा ! साहित्य संमेलन की महाविकास आघाडीचा राजकीय मेळावा ? असा प्रश्न साहित्यिक व नागरिकांना पडत आहे. संमेलन आणि वादांची मालिका काही संपत नाही अशाचप्रकारे नवनवे वाद समोर येत आहेत !! चित्रकलेच्या क्षेत्रात महनीय कामगिरी बजावलेले वासुदेवराव कुलकर्णी, शिल्पकलेत आपली नाममुद्रा कोरणारे मदन गर्गे, लोंढे बंधू, तांबट बंधू यांचा पुसटसाही उल्लेख नसल्याबद्दल कलाक्षेत्रात नाराजीचा सूर उमटतो आहे !!! सविस्तर लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!