सिस्टर शिवानी करोनाकाळात सकारात्मक विचारांसाठी मार्गदर्शन करणार ब्रह्माकुमारीज तर्फे आज लाईव वेबिनारचे आयोजन ! आयोजकांतर्फे व्याख्यानाचा लाभ घेण्याचे आवाहन !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा !!!सिस्टर शिवानी करोनाकाळात सकारात्मक विचारांसाठी मार्गदर्शन करणार

ब्रह्माकुमारीज  तर्फे  आज लाईव वेबिनारचे आयोजन

      मानव समाजाला उच्च सकारात्मक विचारांची दिशा देणा·या सुप्रसिद्ध समुपदेशक व प्रेरक वक्त्या सिस्टर बीके शिवानी यांचे `अपनी मुश्किलोसे बडे बनो` या विषयावर प्रेरक व्याख्यान आज २५ एप्रिल रोजी ऑनलाईन आयोजित केले आहे.

        करोना काळात सर्वत्र भय, दुख: आणि नैराश्येचे वातावरण आहे. मानवी समाजासमोर आलेल्या या मोठ्या संकटास सामोरे जातांना वैद्यकिय उपचाराबरोबर उच्च सकारात्मकतेचीही आवश्यकता असल्याचे जाणूव लागले आहे. नव्हे दृढ मनोबल आणि सकारात्मक विचार हे करोनापासून मुक्तीचे एक मोठे औषध आहे.  सिस्टर शिवानी यांनी जगभरातील व्यक्तिंना उच्च सकारात्मकतेचा संदेश देऊन त्यांचे सुदृढ मनोबल तयार केलेले आहे. त्यायोगे विचारांनी जीवनाची दिशा आणि दशा बदलेले लाखो व्यक्ति त्याची साक्ष देतात.

         ब्रह्माकुमारीज् मीडिया सर्विस सेंटरतर्फे त्यांच्या ऑनलाईन वेबिनारचे आयोजन आज रविवार  दि. २५ रोजी संध्याकाळी ५ वाजता करण्यात आले असून युट्यूब व झुमच्या माध्यमातून लाईव संवाद सिस्टर शिवानी साधणार आहे. त्यांच्या प्रत्यक्ष ऐकण्याची संधी युट्यूबच्या http://tiny.cc/sisterbkshivani या चैनलवर उपलब्ध आहे. तरी सर्व नागरीकांनी लाभ घ्यावा असे आवाहन कार्यक्रमाचे आयोजक ब्र.कु. वासंती आणि माध्यम समन्वयक डॉ. सोमनाथ वडनेरे यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

होय! मी नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती लिना बनसोड(भा.प्र.से.) यांच्याबद्दलच बोलतो आहे, लिहितो आहे.

८४ अनुकंपा कर्मचाऱ्यांचे समायोजन !

समग्र वारली चित्रसृष्टी प्रकल्पालासर्वतोपरी सहकार्य -ना. डॉ. गावित