कोरोना रुग्णांसाठी ५० बेडस् चे कोविड सेंटर मध्ये मोफत आहार, वैद्यकीय काढे, जरुरीप्रमाणे व्यायाम तसेच त्यांची मनस्थिती सकारात्मक रहावी यासाठीचे विशेष कार्यक्रम ! जनकल्याण समितीतर्फे विनामूल्य विशेष विलगीकरण कक्ष सुरू !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!


जनकल्याण समितीतर्फे सेवाकार्य


 विनामूल्य विशेष विलगीकरण कक्ष 


 नाशिक ( प्रतिनिधी )- रा.स्व.संघ जनकल्याण समिती, आयुर्वेद सेवा संघ आणि नाशिक महानगर पालिका यांच्या संयुक्त विद्यमाने  हाॅटेल राॅयल हेरीटेज, खडकाळी सिग्नल जवळ, गंजमाळ येथे ५० बेड्सचे 'कोवीड केअर सेंटर' (विलगीकरण कक्ष) सुरू झाले आहे.  रविवारी ( दि.२५)  वर्धमान जयंतीच्या मूहूर्तावर  सुरू करण्यात आले. ही विनामूल्य सेवा गरजू रुग्णांना देण्यात येईल.


    या 'कोविड सेंटरमध्ये'  कोविड पॉझिटिव्ह आणि लक्षणे नसलेल्या रुग्णांसाठी व ज्यांना होम आयसोलेशन मध्ये रहाण्याचा डॉक्टरांनी सल्ला दिला आहे अशांना दाखल करुन घेतले जाईल. रुग्णास दाखल करुन घ्यायचा निर्णय योग्य तपासणीनंतर सर्वस्वी 'कोविड सेंटर' वरील डॉक्टरांच्या सल्ल्याने होईल. येथे जरूरीनुसार साधारण आठ ते दहा दिवसाच्या अवधीसाठी रुग्णाला दाखल करुन घेतले जाणार आहे.रुग्ण कोविड सेंटरमध्ये असतांना त्याच्यासाठी आहार, वैद्यकीय काढे, जरुरीप्रमाणे व्यायाम तसेच त्यांची मनस्थिती सकारात्मक रहावी यासाठीचे  विशेष कार्यक्रम यांचे दिवसभराचे नियोजन  येथील डॉक्टर्स आणि प्रशासनाने केले आहे. ही संपूर्ण सेवा निःशुल्क असेल ! गरजू नागरिकांनी या विलगीकरण कक्ष सुविधेचा लाभ घेण्यासाठी ८४४६५९९२११ आणि ८४४६५९९३११ क्रमांकावर  संपर्क करावा असे आवाहन संयोजकांनी केले आहे.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।

निवडणूक लढवायची तर आधी शपथ घ्यावी लागते !

अखंड शारदोत्सवाची गोदातटाला परंपरा ! साहित्य संमेलन की महाविकास आघाडीचा राजकीय मेळावा ? असा प्रश्न साहित्यिक व नागरिकांना पडत आहे. संमेलन आणि वादांची मालिका काही संपत नाही अशाचप्रकारे नवनवे वाद समोर येत आहेत !! चित्रकलेच्या क्षेत्रात महनीय कामगिरी बजावलेले वासुदेवराव कुलकर्णी, शिल्पकलेत आपली नाममुद्रा कोरणारे मदन गर्गे, लोंढे बंधू, तांबट बंधू यांचा पुसटसाही उल्लेख नसल्याबद्दल कलाक्षेत्रात नाराजीचा सूर उमटतो आहे !!! सविस्तर लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!