नांव सोनूबाई अन् हाती कथीलाचा वाळा याचप्रमाणे गांवाच्या नांवात विहीर अन् गांव सदा तहानलेलं अशा गावात मुंबई च्या अमास सेवा ग्रुपचा सेवाभावी उपक्रम !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!



  तहानलेल्या आदिवासी पाड्याला मदतीचा दिलासा 


       नाशिक ( प्रतिनिधी ) गावाच्या नावात विहीर असूनही पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ आदिवासी महिलांवर येते. पाण्याविना जीव झाला बेजार, सामाजिक बांधिलकीने दिला मोलाचा आधार असे चित्र नुकतेच बघायला मिळाले. पेठ तालुक्यातील घोटविहिर येथे अमास सेवा ग्रुप मुंबई व इतर समाजसेवी ग्रुप च्या मदतीने पाण्याचे ड्रम रोलर कोरोनाच्या नियमाचे पालन करुन वाटप करण्यात आले. शाळेतील शिक्षक दिलीप आहिरे व सुरेश सूर्यवंशी यांनी याकामी पुढाकार घेतला. त्यामुळे तहानलेल्या आदिवासींना दिलासा मिळाला.


  घोटविहिरा हे गाव नेहमीच पाण्याचे भीषण दुष्काळी गाव आहे. या गावाला अमास सेवा ग्रुप मुंबई व पुष्य सेवा ग्रुप विलेपार्ले, सेवा समिती ग्रुप, गुंदेचा गार्डन लालबाग,मुंबई यांच्या वतीने हा मदतीचा हात देण्यात आला. गावातील महिलांना उन्हाळ्यात सुमारे ४ किमी अंतरावरुन पाणी आणावे लागते. अशा स्थितीत पाण्याचे ड्रम रोलर मिळाल्याने डोक्यावरचे ओझे कमरेवर आले अशी प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली. ड्रम वितरण प्रसंगी महिलांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. या वेळी गावातील ग्रामस्थ  सुभाष चौधरी, नंदराज चौधरी, ग्रामपंचायत सदस्य भागवत चौधरी व इतर ग्रामस्थ उपस्थित होते. पाण्याचे ड्रम रोलर मिळवण्यासाठी  ज्ञानेश्वर कोकणे, गिरीश बोरसे, दिलीप शिंदे, विजय भोये, धर्मराज मोरे आदींनी मदत केली. घोटविहिरा येथील शाळेतील शिक्षक दिलीप आहिरे  व सुरेश सूर्यवंशी यांनी स्वागत, प्रस्ताविक व सूत्रसंचालन केले.पाण्याचे  ड्रम उपलब्ध करून दिल्याबद्दल अमास सेवा ग्रुपचे मार्गदर्शक विजयजी भगत,संचालक चंद्रकांत भाई देढीया व इतर सर्व देणगीदारांंचे आदिवासी बांधवांनी आभार मानले.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

निवडणूक लढवायची तर आधी शपथ घ्यावी लागते !

स्त्री आत्मनिर्भर बनल्यास समाजाचा विकास होईल-पद्मश्री नीलिमा मिश्रा ! गटशिक्षण अधिकारी हेमंत बच्छाव व शिक्षण विस्तार अधिकारी शीतल कोठावदे यांना रोटरी वोकेशनल सर्विस अवार्ड प्रदान !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।