मडगांव ते नागपूर व्हाया नासिक रेल्वे सुरू करण्याची गरज का ? किती विद्यापीठे, धार्मिक स्थळे, महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक, संत गाडगेबाबा स्मारक यांसोबत कोकण-उत्तर महाराष्ट्र-विदर्भ या विभागातील सांस्कृतिक, पर्यटन, औद्योगिक विकास, व्यापार देवाणघेवाण असे या रेल्वेने काय जोडले जाणार !! सविस्तर प्रसतावाच्या बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा !!! न्यूज मसाला सर्विसेस, नासिक, 7387333801


रत्नागिरी (न्यूज मसाला सर्विसेस)::-
महाराष्ट्राचे आराध्य दैवत व विदर्भातील प्रसिद्ध संत गजानन महाराज मंदिर,अमरावती शहरातील वालगाव येथील संत गाडगेबाबा महाराज स्मारक, नागपूर येथे महामानव डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांची चैत्यभुमी, वर्धा येथील महात्मा गांधी यांचे सेवाग्राम, बुलढाणा येथील नांदुरा येथील १०५ फुटी  हनुमानाची मूर्ती, मुर्तीजापुर येथील कार्तीकस्वामी मंदिर, कारंजा येथील दत्त गुरूंचे  स्थान, रेणुकामाता मंदिर, नाशिक येथील शुर्पणखा मंदिर, धुळे येथील देवपुर येथील स्वामीनारायण मंदिर, जळगाव येथील मुक्ताबाई, चांगदेव मंदिर, दर्शनाकरीता व पाहण्याकरिता अनेक भाविक शेगाव व बुलढाणा परिसरात येत असतात. धार्मिक क्षेत्र, उदयोग क्षेत्र, पर्यटन क्षेत्र, शैक्षणिक क्षेत्र, यांची नाळ जोडल्यामुळे प्रचंड प्रमाणात प्रवाशांची या गाडीसाठी मागणी आहे. तसेच कोकण ते खान्देश, विदर्भ असे महाराष्ट्र दर्शन म्हणून या गाडीला थिविम, सावंतवाडी रोड, कुडाळ, कणकवली, राजापुर रोड, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, चिपळूण, खेड या थांब्यावरून नागपूर करिता जाणारे असंख्य प्रवासी आहेत या भाविकांना दर्शनासाठी रत्नागिरी व सिंधुदुर्ग परिसरातून रेल्वे सेवा उपलब्ध नसल्याने द्राविडी प्राणायाम करावा लागत आहे. तरी या रेल्वेच्या प्रवाशांची मागणी आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर, चिपळूण, गुहागर, खेड, मंडणगड, दापोली व सिंधुदुर्ग जिल्हातील कणकवली, कुडाळ, सावंतवाडी, वेंगुर्ले, मालवण, देवगड हे महत्वाचे ठिकाण असुन ही वेगाने विकसित होणारी शहरे आहेत, दापोली येथे डाॅ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या रत्नागिरी व सिंधुदुर्ग परिसरात अनेक शाखा आहेत कोकण कृषी विद्यापीठामध्ये नाशिक, धुळे, जळगाव, बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर या परिसरात येणारी लोकांची प्रवाशांची संख्या भरपूर आहे. नाशिक येथे द्राक्षांची, धुळे व नंदुरबार येथे लाल मिरचीची मोठी बाजारपेठ, पाचोरा, चाळीसगाव, भुसावळ, जळगाव केळीची मोठी बाजारपेठ, व केळीची मोठी उत्पादन केंद्र कोकणामध्ये येणाऱ्या केळी, द्राक्षे, संत्री, लाल मिरची रत्नागिरी हापुस आंबा व सिंधुदुर्ग प्रसिध्द देवगड हापुस आंबा, मालवणी खाजा, कडक बुंदीचे लाडू, चुरमुऱ्याचे लाडू,  सावंतवाडी प्रसिद्ध लाकडी खेळणी या मार्केटमुळे आयात निर्यात होण्यास मदत होणार आहे, तसेच की हि "मडगाव ते नागपूर"  रेल्वेसेवेला पेण, चाळीसगाव, जळगांव, शेगांव, मुर्तीजापुर अधिकृत थांबे मिळावे असा प्रस्ताव कल्याण सावंतवाडी रेल्वे प्रवासी समन्वय समिती गृपचे दापोली मंडणगड जनसंपर्क तथा तालुकाध्यक्ष  वैभव बहुतुले, कुडाळ तालुकाध्यक्ष चैतन्य धुरी, सुनील उत्तेकर, मनिष खानविलकर, प्रसन्ना जोशी, सुधीर राठोड, हर्षद भगत यांनी महाराष्ट्र राज्यमंत्री जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागास बहुजन कल्याण कामगार विभाग मा.श्री. ओमप्रकाश उर्फ  बच्चू  कडु मंत्रालय मुंबई व बेलोरा (चांदुर बाजार अमरावती) कार्यालय येथे पाठविण्यात आला आहे.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

होय! मी नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती लिना बनसोड(भा.प्र.से.) यांच्याबद्दलच बोलतो आहे, लिहितो आहे.

महावितरणचा वरिष्ठ तंत्रज्ञ व आणखी एक इसम लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

'मायबाप' ने जागवल्या मातेच्या आठवणी ! 'मह्या मायपुढं थिटं, सम्दं देऊळ राऊळ...तिच्या पायाच्या चिऱ्यात, माह्य अजिंठा वेरूळ' !!