नासिक पोलिस आयुक्त आणि सहा जानेवारी पत्रकार / दर्पण दिन ! सविस्तर वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!


नासिक पोलिस आयुक्त आणि सहा जानेवारी पत्रकार / दर्पण दिन !

नासिक पोलिस आयुक्त दिपक पांडेय यांच्याशी काल आयुक्तालयात संवाद साधला असता त्यांच्यातील सतत काहीतरी शिकत राहिले पाहिजे या आणखी एका पैलूचे दर्शन झाले.
निमित्त होते पत्रकार दिनाचे, पांढऱ्या आणि काळ्या तीळाच्या लाडूंनी आमचे तोंड गोड केले की आम्ही काही बोलू नये म्हणून आदरातिथ्य्याचा सोपस्कार घडवून आणला अशी शंका येत नाही तितक्यात दहा पंधरा सेकंदात लाडू विषयाला सुरुवात होऊन संपुष्टातही आणला. आणि याच कालावधीत आम्ही कशासाठी, कोणत्या कामासाठी आलो आहोत, यावर काय उपाय, अपेक्षा व निराकरणाचा निष्कर्ष मनोमन काढून विषयापासून दूर न जाता विषयांतरही करायला हसत मोकळे झाले. आम्हाला अजूनही खात्री नव्हती की आमचे काम मार्गी लागले असेल !
     तिसऱ्या मिनिटाला सुरूवात झाली आणि,,,,,,,  पत्रकार, पत्रकारिता काय असते ते जाणण्यासाठी "मी सहा जानेवारी ला सायंदैनिक भ्रमर या वृत्तपत्र कार्यालयात निमंत्रित संपादक म्हणून जात आहे !"
या अनपेक्षित वाक्याने मात्र खात्री पटली की आमचे काम झाले आहे !
कारण साहेब एक दिवस,  तेही सहा जानेवारीलाच, पत्रकार प्र के अत्रे, मराठी "केसरी" वृत्तपत्राचे मवाळ संपादक आगरकर, इंग्रजी "मराठा" वृत्तपत्राचे संपादक जहाल टिळक, छत्रीधारी आर के लक्ष्मण विलक्षण असतात हे जाणून घेणार !
हा त्यांचा सतत शिकत राहण्याचा पैलू समोर आल्यानंतर आम्हालाही प्रश्र्न पडलाय !
काम तर मार्गी लागते पण त्याहून मार्गी लावण्यासाठी सतत शिकायलाच हवे का ?
कदाचित किरकोळ वजनाचे कागदी प्रमाणपत्र वजनदार का व कसे होते ? त्यासाठी कुणाचे काय कष्ट असतात हे अवघ्या सात मिनिटांच्या भेटीतून समोर अवतरावे.....
"जावे ज्याच्या वंशी तेव्हाची कळे !"  या उक्तीप्रमाणे पोलिस आयुक्त दिपक पांडेय सहा जानेवारीला पत्रकारितेच्या दुनियेत "मुसाफीरी" करायला जात आहेत, दर्पणात उलट की सुलट प्रतिबिंब दिसते या प्रश्नाचे उत्तर भले काहीही मिळो मात्र त्यांच्या जिज्ञासू वृत्तीला सलाम ! "दर्पण दिनानिमित्त" सर्वांना हार्दिक शुभेच्छा !!
         
            नरेंद्र पाटील,
संपादक-न्यूज मसाला,
संपादक-लोकराजा दिवाळी विशेषांक,
नासिक
दिनांक ६ जानेवारी २०२२

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

दिवाळी अंकासाठी साहित्य पाठविण्याचे आवाहन ! साप्ताहिक न्यूज मसाला चा "लोकराजा" दिवाळी विशेषांक २०२४,

सहाय्यक प्रशासन अधिकारी पदावर अनिल गिते व अनिल सानप यांना पदोन्नती !

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।