कृषी पर्यटन - चला जाऊ गावाकडे ! तुम्ही कल्पक तरुण असाल आणि तुम्हाला चार-चौघांपेक्षा वेगळे आणि गावात काही करण्याची इच्छा असेल तर कृषी पर्यटनाचा व्यवसाय तुम्हाला साद घालतो आहे ! सविस्तर वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!





कृषी पर्यटन - चला जाऊ गावाकडे !

    माणसाला असलेली मूलभूत उत्सुकता आणि धकाधकीच्या जीवनाची गरज म्हणून लोकांचा पर्यटनाकडे ओढा वाढत आहे. याचमुळे कृषी पर्यटनात लोकांचा रस वाढतो आहे. ज्यात रोजगाराच्या खूप संधी आहेत. एखाद्या जागी फक्त जाऊन येण्यापेक्षा तेथील जीवनशैली, चालीरीती, पद्धती प्रत्यक्षात अनुभवण्याकडे पर्यटकांचा ओढा आहे. माणूस हा खेड्यातून शहराकडे गेला आहे. आज बहुतांश उत्पन्न कमावणारा गट शहरातच जन्मलेला असला तरी आपले पूर्वज कसे जीवन जगायचे हे त्याला अनुभवायला आवडते. ज्यांना गाव नाही त्यांना गावातील जीवन पाहायला आवडते. यातूनच कृषी पर्यटनाची क्रेझ निर्माण झाली आहे. नाशिक जिल्ह्यातील अश्याच काही कृषी पर्यटन केंद्रांचा परिचय पुढच्या आठवड्यापासून दर शनिवारी आपण करून घेणार आहोत.
त्यापुढील टप्प्यात राज्यातील केंद्रांचा समावेश केला जाईल.
              कृषी पर्यटन व्यावसायिक म्हणून काय देतोय यावर आपल्याकडे पर्यटकांचा ओघ कसा असेल हे अवलंबून असतो. असा हा अतिशय सुंदर आणि आव्हानात्मक व्यवसाय-कृषी पर्यटन !
          माणूस हजारो वर्षापासून शेती करतो आहे आणि जमिनीशी त्याची नाळ जन्मजन्मांतरीची. काचेच्या चकचकीत ऑफिसमध्ये राहून कॉम्प्युटरच्या सहाय्याने तो काम करू लागला, जगाशी जोडला गेला तरी त्याला मोकळ्या हवेचे आणि या मातीचे अप्रूप नेहमी राहणारच. नेमकी हीच गरज कृषी पर्यटन पूर्ण करते. पर्यटकाला गावाच्या वातावरणाची जाणीव देऊन, त्याला दोन तीन दिवसांचा न विसरता येणारा अनुभव दिला की तो पर्यटक पुन्हा तुमच्याकडे येणारच. नंतर आपल्या मित्रांनाही घेऊन येईल. तुमच्याकडे गावाला जाऊन काही करण्याची इच्छा असेल तर कृषी पर्यटन हा एक उत्तम पर्याय आहे. कृषी पर्यटक हा शहरात राहणारा किंवा अगदी विदेशातील एखादा पर्यटक आहे. त्याला गावातील शांत, हिरव्यागार, निर्मळ वातावरणाचा अनुभव घ्यायचा आहे. त्यामुळे मार्केटिंग असे असावे की जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपणांस पोहोचता आले पाहिजे. रोजच्या कामाची दगदग, ताण लोकांना अधिक असते. त्यामुळे नेहमीच्या आयुष्यातून अशा निर्भेळ जगात येण्याची गरज त्यांच्यापेक्षा अधिक कोणाला असेल बरे ! ते दोन-तीन दिवस त्याला कुठली अडचण येऊच नये ही तुमची जबाबदारी समजा. बैलगाडी सैर, सकाळी वासुदेव, रात्री भजनं, सकाळी व रात्री खास गावाकडचं जेवण अशा खास गावरान गोष्टींचा पर्यटकाला अधिकाधिक अनुभव घेता येईल.

                                              संजय देवधर     
                                (ज्येष्ठ पत्रकार, नाशिक)
***********************************
कल्पकतेने व्हाल यशस्वी !

    एक उत्तम कृषी पर्यटन केंद्र बनवण्यासाठी तुमच्याकडे कौलारू घरं, बैलगाडी, धबधबा किंवा ओहोळ, झरा, तळं, शेत, नदी, विहीर, भरपूर झाडी, गावरान खाद्यपदार्थाची सोय  आसपास असणं अत्यंत आवश्यक आहे. तुमच्या पर्यटक संख्येवर तुमचा नफा अवलंबून असतो. कृषी पर्यटन हा गावात विशेषत: जेथे पर्यटकांना पोहोचणे सोयीस्कर आहे तेथे अतिशय यशस्वी होईल असा व्यवसाय आहे. त्यासाठी फक्त चिकाटी आणि आपल्या केंद्राचे उत्तम मार्केटिंग करण्याची हातोटी असणे गरजेची आहे आणि त्यातही सतत कुठल्या प्रकारे आणि कोण कोणत्या पर्यटकांना आपण आकर्षित करू शकतो हे सतत शोधत राहणे गरजेचे आहे. तुम्ही कल्पक तरुण असाल आणि तुम्हाला चार-चौघांपेक्षा वेगळे आणि गावात काही करण्याची इच्छा असेल तर कृषी पर्यटनाचा व्यवसाय तुम्हाला साद घालतो आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।

निवडणूक लढवायची तर आधी शपथ घ्यावी लागते !

अखंड शारदोत्सवाची गोदातटाला परंपरा ! साहित्य संमेलन की महाविकास आघाडीचा राजकीय मेळावा ? असा प्रश्न साहित्यिक व नागरिकांना पडत आहे. संमेलन आणि वादांची मालिका काही संपत नाही अशाचप्रकारे नवनवे वाद समोर येत आहेत !! चित्रकलेच्या क्षेत्रात महनीय कामगिरी बजावलेले वासुदेवराव कुलकर्णी, शिल्पकलेत आपली नाममुद्रा कोरणारे मदन गर्गे, लोंढे बंधू, तांबट बंधू यांचा पुसटसाही उल्लेख नसल्याबद्दल कलाक्षेत्रात नाराजीचा सूर उमटतो आहे !!! सविस्तर लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!