सहाय्यक प्रशासन अधिकारी पदावर अनिल गिते व अनिल सानप यांना पदोन्नती !

सहाय्यक प्रशासन अधिकारी पदावर अनिल गिते व अनिल सानप यांना पदोन्नती !

       नासिक::-  दिनांक ७ मार्च २०२४ रोजी जिल्हा परिषद नाशिक मधील अनिल गीते व अनिल सानप यांना कनिष्ठ प्रशासन अधिकारी मधून सहाय्यक प्रशासन अधिकारी पदावर पदोन्नती देण्यात आली.
तसेच वरिष्ठ सहाय्यक श्रीमती छाया सोनवणे, राजेंद्र येवला, धनराज पवार, दिलीप पाटील, विलास ननावरे, मंगेश चव्हाण, ओम प्रकाश पाटोळे, किरण माळवे, चंद्रकांत पगारे यांना कनिष्ठ प्रशासन अधिकारी पदावर पदोन्नती देण्यात आली. गजेंद्र घाडगे व जीवन पारधी यांना कनिष्ठ सहाय्यक पदावरून वरिष्ठ पदावर पदोन्नती देण्यात आली.

      पदोन्नती चार प्रश्न अनेक दिवसांपासून प्रलंबित होता आज हा प्रश्न मार्गी लागल्याने लिपिक वर्गीय कर्मचारी यांनी समाधान व्यक्त केले. सदरच्या पदोन्नती पारदर्शकपणे राबविल्याने व कर्मचाऱ्यांची गैरसोय न झाल्याने कर्मचारी यांनी समाधान व्यक्त करत परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती आशिमा मित्तल, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन गुंडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत श्रीमती वर्षा फडोळ, मुख्य लेखा व वित्त अधिकारी भालचंद्र चव्हाण, रवींद्र आंधळे, श्रीमती सोनाली भार्गवी, सुनील तैल यांचे महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद लिपिक वर्गीय कर्मचारी संघटना क्रमांक ६१५ जिल्हा शाखा नाशिकच्या वतीने आभार मानण्यात आले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विनामूल्य मैफल ! अफलातून म्युझिक लव्हर्सतर्फे सोमवारी सूरसम्राज्ञी लता मैफल !

इशरे नाशिक शाखेच्या नवीन कार्यकारिणीने केले पदग्रहण !

"राजकारण गेलं मिशीत" या चित्रपटात उद्धव भयवाळ यांची लावणी !