मध्य नाशिक विधानसभा मतदारसंघात आ. प्रा.फरांदे यांचा विजय निश्चित‌-भाजपा नाशिक महानगर अध्यक्ष प्रशांत जाधव यांची ग्वाही

मध्य नाशिक विधानसभा मतदारसंघात 
आ. प्रा.फरांदे यांचा विजय निश्चित‌-भाजपा नाशिक महानगर अध्यक्ष प्रशांत जाधव यांची ग्वाही 
            नाशिक ( प्रतिनिधी )  समाजातील सर्व घटकांसाठी काम केलेल्या मध्य नाशिक विधानसभेतील आमदार प्रा. सौ. देवयानी फरांदे यांचा विजय निश्चित‌ होणार. अशी ग्वाही मंगळवार ( दि.१२) सकाळ- सायंकाळच्या सत्रात भाजपा नाशिक महानगर अध्यक्ष प्रशांत जाधव यांनी दिली. 
   भाजपा नाशिक महानगर अध्यक्ष प्रशांत जाधव यांच्या  ‌‌पस्थितीत प्रभाग क्र.१२ मधील गायकवाड नगर, प्रथमेश नगर, मातोश्री नगर व गणेश कॉलनी या परिसरात  घरोघरी प्रचार संपर्क साधला. मध्य नाशिक विधानसभेतील महायुतीच्या उमेदवार प्रा. सौ. देवयानीताई फरांदे यांना आपले बहुमुल्य मत देऊन विजयी करावे असे आवाहन करण्यात आले. परिसरातील रहिवाशी नागरिकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला व आपले अमूल्य मत विकासपर्वाला असेल असे निक्षून सांगितले.

   घरोघरी काढण्यात आलेल्या प्रचार फेरीत भाजपा ज्येष्ठ कार्यकर्ते अभय छल्लाणी, नंदकुमार देसाई, नरेंद्र सोनवणे, प्रदीप पाटील, कैलास चौधरी, अविनाश जासुंदे, शिरीष भुमकर, भाजपा  ज्येष्ठ कार्यकर्त्या  भारती मोरे, सौ. नानीवडेकर,  मिनाक्षी  वैद्य, सौ. भुमकर इत्यादी कार्यकर्ते व रहिवासी नागरिक यांचा मोठ्या संख्येने सहभाग होता
परिसरातील समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती, डाॕक्टर्स, वकील, उद्योजक, प्राचार्य व शिक्षक वर्ग, निवृत्त सरकारी अधिकारी, कर्मचारी, छोटेमोठे व्यावसायिक यांच्या भेटीगाठी भाजपा नाशिक महानगर अध्यक्ष प्रशांत जाधव यांच्यासह विविध कार्यकर्ते यांनी घेतल्या व सर्वांनी प्रा. सौ. फरांदे यांच्या आतापर्यंतच्या कार्याची प्रशंसाच केली. त्यामुळे त्यांचा विजय निश्चित आहे. असा सूर उमटला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।

राष्ट्र उभारणी मध्ये बांधकाम व्यवसायिकाचे मोलाचे स्थान -बोमन इराणी

सर्वसामान्यांच्या स्वप्नांना आकार देणारा शेल्टर-२०२४ चा भूमीपूजन सोहळा संपन्न ! २० ते २५ डिसेंबर दरम्यान त्र्यंबक रोडवरील ठक्कर इस्टेट येथे भरणार शेल्टर २०२४, घरे आणि बांधकाम बाबत सर्व काही एकाच छताखाली !