मुख्याध्यापक दिनेश साळुंके अर्थात मदतीला धावून जाणारा खरा कोरोना योद्धा ! त्यांचा सत्कार म्हणजे सामाजिक भान असलेले सहृदयी व्यक्तिमत्वाचा सत्कार - प्रशांत जानी, डिस्ट्रिक गव्हर्नर !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

कोरोना योद्धा सन्मान
 
  कोरोना संचारबंदी,लाॅकडाऊन काळात नंदुरबार जिल्ह्यात ग्रामीण व शहरी भागात गरजू कुटुंबांना मदत जीवनावश्यक वस्तूंचे वाटप, खाजगी डाॅकटरांना पी.पी.ई. किटचे वाटप,माकस्चे मोफत वाटप, कोविड १९ आजारा संदर्भात जनजागृती करून अवरॅनेसचे काम, काळजी व उपाय संदर्भात सोशल मिडीया द्वारे माहिती प्रसिध्द केली.
          २३ मार्चपासून सुरू असलेल्या लाॅकडाऊनमध्ये मुख्याध्यापक दिनेश साळुंके यांनी सामाजिक बांधिलकी जपत अनेक गरजूंना मदत केली, मदतीसाठी मित्रपरिवारामार्फत गरजूंची माहीती घेत शक्यहोईल तितकी मदत पोहोचविली. शाळेला सुट्टी असूनही नंदूरबार व विखरण येथेच थांबणे पसंत केले, याची दखल घेत अनेक संस्थांनी त्यांचा कोविड योद्धा म्हणून प्रशस्तीपत्राद्वारे सत्कार केला. मात्र आंतरराष्ट्रीय रोटरी क्लब ऑफ नंदनगरी यांनी साळुंके यांचे कार्य फक्त प्रशस्तीपत्राने न करता महाराष्ट्र राज्याचे डिस्ट्रिक गव्हर्नर प्रशांत जानी यांच्या हस्ते केले. यावेळी जानी यांनी सांगितले की, साळुंके यांच्यासारखे मुख्याध्यापक म्हणजे सामाजिक भान असलेले सहृदयी व्यक्तिमत्व आहे.
         आपासो.आ.ध.देवरे माध्यमिक विद्यालय विखरण ता. जि.नंदुरबार विद्यालयाचे मुख्याध्यापक डी.डी.साळुंके यांच्या  या "कोरोना योद्धा " सत्काराचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.
   या कार्यक्रमाला सौ.हिताबेन जानी, श्रीकांत इंदाणी, अनिश शाह, निलेश तंवर, प्रितिश बांगड उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

होय! मी नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती लिना बनसोड(भा.प्र.से.) यांच्याबद्दलच बोलतो आहे, लिहितो आहे.

आनंद मेळाव्याच्या माध्यमातून टिळकांचा एकत्रित येण्याचा उद्देश सफल- वरिष्ठ पाेलिस निरीक्षक भालेराव

दातार म्हणजे समाजाला भरभरून देणारे ! कुलसंमेलनात उमटला सार्थ अभिमान !!