पोस्ट्स

सोमवारी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री प्रुथ्वीराज चव्हाण नासिकच्या सुविचार मंचावर !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
नाशिक शुक्रवार, दि. १० ऑगस्ट २०१८ सोमवार दि. १३ ऑगस्ट रोजी सुविचार गौरव पुरस्कारांचे वितरण अभिनेते स्वप्नील जोशी, अभिजीत खांडकेकर यांच्यासह ९ जणांना आ.पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते सुविचार गौरव             नाशिक दि. १० (प्रतिनिधी) :- सुविचार मंच या सामाजिक संस्थेतर्फे देण्यात येणाऱ्या सुविचार गौरव पुरस्कारांचे वितरण माजी केंद्रीय मंत्री व माजी मुख्यमंत्री आ.पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते सोमवार दि. १३ ऑगस्ट रोजी होणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष अॅड. अशोक खुटाडे यांनी दिली आहे.    समाजासाठी अविरतपणे झटणाऱ्या सर्वसामन्यांमधील आदर्श व्यक्तींना पुरस्काराने सन्मानीत करून त्यांचे कार्य समाजापुढे आणण्यासाठी ‘सुविचार मंच’ या सामाजिक संस्थेच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तिंकडून प्रस्ताव मागविण्यात आले होते. सार्वजनिक वाचनालयाचे माजी अध्यक्ष मधुकर झेंडे यांचे अध्यक्षतेखाली आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ.स्वप्निल तोरणे व के.बी.एच.आय.एम.आर. या व्यवस्थापन महाविद्यालयाचे संचालक प्रा.डॉ. प्रशांत सूर्यवंशी हे सदस्य असलेल्या निवड समितीने आलेल्या प्रस्

"पाखी" चा सुमित कांत कौल १० आँगस्टला भेटतोय ! तत्पूर्वी दीनानाथ यांनी घेतलेली मुलाखत, खास न्यूज मसालाच्या रसिकांसाठी !! सविस्तर मुलाखत वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
दीनानाथ  यांजकडून [ मनोरंजन प्रतिनिधी ]    पाखी चित्रपटानंतर अभिनेता सुमित कांत कौलला लागले मराठी चित्रपट सृष्टीचे वेध! देव आनंद, प्राण यांसारख्या दिग्गज कलावंतांच्या चित्रपट सृष्टीतील पदार्पणासाठी कारणीभूत असणारे नामवंत निर्माते दिग्दर्शक यशवंत पेठकर यांचा नातू सुमित कांत कौल याचे लवकरच हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण होणार आहे. आजोबांकडून मिळालेला वारसा व अभिनयाचे धडे गिरवत येत्या १० ऑगस्ट ला प्रदर्शित होणाऱ्या 'पाखी' या चित्रपटातून सुमित आपल्यासमोर येणार आहे. गेली पाच वर्षे नाटक, शॉर्ट फिल्म आणि वेब सिरीजमधून प्रियकर असो वा वृद्ध प्रत्येक भूमिका चोख पार पाडत, सुमित आता खलनायकाच्या नवीन भूमिकेत रुपेरी पडद्यावर आपणांस दिसून येणार आहे.  सुमित कांत कौल याची घेतलेली खास  मुलाखत : १० ऑगस्ट ला प्रदर्शित होणाऱ्या तुझ्या पहिल्यावहिल्या 'पाखी' या चित्रापटाबद्दल काय सांगशील? सुमित - " 'पाखी' हा लहान मुलांची तस्करी व बालविवाह या विषयांवर भाष्य करणारा सिनेमा आहे. आपल्या देशात दर आठ मिनिटांनी एखाद्या मुलाचे अपहरण होते तर, प्रत्येक एका तासात,एखाद्या बाळाचा अनैतिक व्

राज्यात प्रथम तर देशांत चाळीसावा क्रमांकावर नासिक जिल्हा ! मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे पालकमंत्रांकडून कौतुक !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
          नाशिक (५)::- प्रधान मंत्री आवास योजने अंतर्गत जिल्ह्याने राज्यात पहिला क्रमांक मिळविल्याबद्दल पालकमंत्री गिरीश महाजन यांनी आज झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ नरेश गिते यांचे कौतुक करून जिल्हा परिषदेच्या सर्व संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. तसेच जिल्ह्याने शासनाकडे मागितलेले ३० हजार घरकुल अतिरिक्त उद्दिष्ट मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्री महोदयांकडे तसेच शासनाकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासनही पालकमंत्री महाजन यांनी दिले. यामुळे २०२२ पर्यंत घरकुल मिळणाऱ्या लाभार्थ्यांस २०१८ मध्येच लाभ मिळणार असून पंतप्रधानांची महत्वाकांक्षा असलेल्या सर्वाना घरे उपलब्ध करून देण्याच्या योजनेला नाशिकमधून सुरवात होणार आहे.            यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की, देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे २०२२ पर्यंत देशातील सर्वाना घर देण्याचे स्वप्न आहे. मात्र नाशिक जिल्हा येत्या डिसेंबर २०१८ पर्यंतच जिल्ह्यातील आवास योजनेचे काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील आहे. जिल्हा परिषदेची ३० हजार घरकुल उदिष्ट पूर्ण करण्याची तयारी असल्याने यासाठी

विश्वास ठाकुरांसहीत अभिनेता स्वप्निल जोशी, अभिजित खांडकेकर याना सुविचार गौरव पुरस्कार जाहीर !!! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
  “सुविचार गौरव” पुरस्कार जाहीर विश्वास बँकेचे अध्यक्ष विश्वास ठाकुर यांना सामाजिक क्षेत्रातील पुरस्कार घोषित ! अभिनेते स्वप्निल जोशी, अभिजित खांडकेकर यांचा समावेश   नाशिक दि. ०४ (प्रतिनिधी) :-समाजासाठी विविध क्षेत्रात अविरतपणे झटणाऱ्या मान्यवरांची “सुविचार गौरव” पुरस्कारासाठी नावे जाहीर करण्यात आली असून यात अभिनेते स्वप्नील जोशी व अभिजित खांडकेकर यांचा समावेश आहे.  विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तिंचे कार्य समाजापुढे आणून त्यांचा गौरव करण्यासाठी ‘सुविचार मंच’ या सामाजिक संस्थेच्या वतीने प्रस्ताव मागविण्यात आले होते. या प्रस्तावांमधून सुविचार गौरव पुरस्कारांसाठी निवड करण्यात आलेल्या पुरस्कारार्थींची नावे संस्थेच्या वतीने आज जाहीर करण्यात आली.           यामध्ये कला क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल चित्रपट अभिनेते स्वप्निल जोशी यांची निवड करण्यात आली. तर अभिनय क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी बद्दल “माझ्या नवऱ्याची बायको” फेम अभिनेते गुरु उर्फ अभिजित खांडकेकर यांना विशेष पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. यांसह डॉ.रविंद्र सपकाळ (शैक्षणिक), दिपक बागड (उद्योग), हृदयरोग तज्

राज्याचे आरोग्य विभाग आयुक्त संजीव कुमार यांनी दिले निर्देश-मातामृत्यू व बालमृत्यू कमी करणे तसेच अनेमिया व हिमोग्लोबिन वाढविण्यावर भर द्यावा !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
      नाशिक (३)::- मातामृत्यू व बालमृत्यू कमी करणेसाठी आरोग्य केंद्र व उपकेंद्र यामध्ये कमीत-कमी प्रसूती करून जास्तीत जास्त प्रसूती ग्रामीण रुग्णालयात करण्यासाठी प्रयत्न करावेत. तसेच आरोग्य विभागाच्या वतीने अनेमिया व हीमोग्लोबिन वाढविण्यावर अधिक भर देण्यासाठी नियोजनानुसार काम करण्याचे निर्देश राज्याच्या आरोग्य विभागाचे आयुक्त संजीव कुमार यांनी केले.        शासनाच्या आरोग्य विभागाच्या वतीने आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांची विभागीय बैठक आज जिल्हा परिषदेच्या रावसाहेब थोरात सभागृहात आरोग्य विभागाचे आयुक्त संजीव कुमार यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी संजीव कुमार यांनी विविध विषयांचा आढावा घेताना मातामृत्यू व बालमृत्यू याकडे अधिक लक्ष देवून काम करण्याच्या सूचना सर्व उपस्थिताना केल्या. घरी प्रसूती होत असल्याने माता तसेच बाल मृत्यूचे प्रमाण वाढते त्यामुळे एकही प्रसूती घरी होणार नाही यासाठी सर्व आरोग्य यंत्रणेने दक्ष राहून काम करावे असेही ते म्हणाले.        यावेळी जास्त प्रसूती केलेल्या नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी व नांदगाव तसेच जळगाव जिल्ह्यातील चोपडा या ग्रामीण रुग्णालयांचा यावेळी संजीव

न्यूज मसालाच्या "लोकराजा" दिवाळी विशेषांकाच्या मुखप्रुष्ठ छायाचित्राचे यंदाचे मानकरी, नासिक लोकसभा सदस्य मा. हेमंत (आप्पा) गोडसे !!! मा.खास.हेमंत गोडसे यांना वाढदिवसाच्या न्यूज मसाला परिवाराकडून हार्दीक शुभेच्छा !!! सविस्तर माहीतीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
नासिक (दि.३):::-- न्यूज मसाला या नियतकालिक दिवाळी विशेषांकाच्या "लोकराजा" या पर्वात मुखपृष्ठाचा मानकरी कोण ? महाराष्ट्राच्या उत्सवी परंपरेत दिवाळीची आतिषबाजी आपले वेगळे महत्व टिकवून आहे.या परंपरेत दिवाळी अंकांचा मासलेदार सहभाग फराळाच्या आनंदाचा कुरकुरीतपणा आणखी वाढवतो.विशेषतः शेकडो दिवाळी अंकांच्या गर्दीतही प्रत्येक दिवाळी अंकांचे मुखपृष्ठ आपले स्वतःचे वेगळे वैशिष्ट निर्देशीत करतो.न्यूज मसालाही आपल्या या वैशिष्ट्याचे सातवे वर्ष साजरे करीत असून आजी माजी खासदारांमध्ये यंदा न्यूज मसाला "लोकराजा" पर्वात मुखपृष्ठावर झळकण्याचा मान कोण पटकावणार याविषयीची उत्सुकता संपली आहे.    यंदा न्यूज मसालाच्या "लोकराजा" दिवाळी विशेषांक २०१८ च्या मुखप्रुष्ठावर नासिकचे लोकसभा सदस्य मा. हेमंत आप्पा गोडसे यांचे छायचित्र झळकणार आहे. न्यूज मसालाच्या "लोकराजा" दिवाळी विशेषांकाच्या मुखप्रुष्ठावर दरवर्षी आजी-माजी संसद सदस्याचे छायाचित्र प्रकाशित करण्यात येते, यावर्षीच्या ७ व्या विशेषांकाच्या मुखप्रुष्ठ छायाचित्रासाठी पाच खासदारांची नांवे (गोपनीय) स्पर्धेत होती, यांतून खास

मकरंद-क्रांती यांची "ट्रकभर स्वप्न" २४ आँगस्टला आपल्यासमोर येत आहेत ! शोधूया, ट्रकभर स्वप्नांमध्ये आपली स्वप्ने आहेत का ? दीनानाथ यांजकडून खास न्यूज मसालाच्या रसिकांसाठी !!!

इमेज
दीनानाथ यांजकडून [ मनोरंजन प्रतिनिधी ]   मकरंद-क्रांतीच्या‘ट्रकभर स्वप्नां’चाप्रवास       प्रत्येकजण एखाद्या वैशिष्ट्यपूर्ण भूमिकेसाठी ओळखला जातो. पण हेच कलाकार जेव्हा अनपेक्षितपणे एखाद्या वेगळ्या भूमिकेत दिसतात तेव्हा सर्वांच्याच भुवया उंचावतात. नेहमीच वेगळ्या धाटणीचे तसंच आशयघन सिनेमांच्या शोधात असणारे मकरंद देशपांडे आणि क्रांती रेडकर हे दोन कलाकारही ‘ट्रकभर स्वप्न’ या सिनेमात एका वेगळ्या रूपात प्रेक्षकांना भेटणार आहेत. अभिनयाकडून दिग्दर्शनाकडे वळलेल्या प्रमोद पवार यांनी ‘ट्रकभर स्वप्न’ या सिनेमात सर्वसामान्य जोडप्याच्या स्वप्नांचा प्रवास उलगडला आहे. मकरंद-क्रांती यांनी या जोडप्याची भूमिका साकारली आहे. मकरंद देशपांडे म्हणजे प्रायोगिक रंगभूमीपासून थेट हिंदी सिनेसृष्टी गाजवलेला प्रयोगशील अभिनेता... अॅक्टर-डिरेक्टर अशी प्रतिमा असलेल्या मकरंदने मराठी-हिंदीसह तेलुगू, कन्नड, मल्याळम आदी दाक्षिणात्य प्रादेशिक भाषांमधील सिनेमांमध्येही अभिनय केला आहे. आता ‘ट्रकभर स्वप्न’ या मराठी सिनेमाचाही समावेश झाला आहे. पण या सिनेमातील मकरंदची भूमिका आजवरच्या व्यक्तिरेखांपेक्षा अगदी विरुध्द आहे. मकरंद