न्यूज मसालाच्या "लोकराजा" दिवाळी विशेषांकाच्या मुखप्रुष्ठ छायाचित्राचे यंदाचे मानकरी, नासिक लोकसभा सदस्य मा. हेमंत (आप्पा) गोडसे !!! मा.खास.हेमंत गोडसे यांना वाढदिवसाच्या न्यूज मसाला परिवाराकडून हार्दीक शुभेच्छा !!! सविस्तर माहीतीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

नासिक (दि.३):::--न्यूज मसाला या नियतकालिक दिवाळी विशेषांकाच्या "लोकराजा" या पर्वात मुखपृष्ठाचा मानकरी कोण ?
महाराष्ट्राच्या उत्सवी परंपरेत दिवाळीची आतिषबाजी आपले वेगळे महत्व टिकवून आहे.या परंपरेत दिवाळी अंकांचा मासलेदार सहभाग फराळाच्या आनंदाचा कुरकुरीतपणा आणखी वाढवतो.विशेषतः शेकडो दिवाळी अंकांच्या गर्दीतही प्रत्येक दिवाळी अंकांचे मुखपृष्ठ आपले स्वतःचे वेगळे वैशिष्ट निर्देशीत करतो.न्यूज मसालाही आपल्या या वैशिष्ट्याचे सातवे वर्ष साजरे करीत असून आजी माजी खासदारांमध्ये यंदा न्यूज मसाला "लोकराजा" पर्वात मुखपृष्ठावर झळकण्याचा मान कोण पटकावणार याविषयीची उत्सुकता संपली आहे.
   यंदा न्यूज मसालाच्या "लोकराजा" दिवाळी विशेषांक २०१८ च्या मुखप्रुष्ठावर नासिकचे लोकसभा सदस्य मा. हेमंत आप्पा गोडसे यांचे छायचित्र झळकणार आहे.
न्यूज मसालाच्या "लोकराजा" दिवाळी विशेषांकाच्या मुखप्रुष्ठावर दरवर्षी आजी-माजी संसद सदस्याचे छायाचित्र प्रकाशित करण्यात येते, यावर्षीच्या ७ व्या विशेषांकाच्या मुखप्रुष्ठ छायाचित्रासाठी पाच खासदारांची नांवे (गोपनीय) स्पर्धेत होती, यांतून खास. हेमंत गोडसे यांच्या छायाचित्राची निवड न्यूज मसालाच्या संपादकीय मंडळाने केलेल्या मित्र परिवाराच्या सर्वेमधून  करण्यात आली.
यापुर्वी
(2012)मा.खास.दौलतराव आहेर, (2013)मा.खास.प्रतापदादा सोनवणे, (2014)मा.खास.समीर भुजबळ,
(2015)मा.खास.गोपीनाथ मुंडे,
(2016) मा.खास. युवराज छत्रपती संभाजी राजे भोसले,
(2017) मा.खास.राजू शेट्टी
यांचे छायाचित्र न्यूज मसालाच्या "लोकराजा" दिवाळी विशेषांकावर झळकले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

८४ अनुकंपा कर्मचाऱ्यांचे समायोजन !

जागतिक फार्मासिस्ट दिवस विशेष एसएमबीटी फार्मसीच्या विद्यार्थ्यांची ‘अशीही’ सामाजिक बांधिलकी !

विजयादशमीला शिवप्रताप गरूडझेप ! ‘पहिले ते हरिकथा निरुपण, दुसरे ते राजकारण, तिसरे ते सावधपण सर्वाविषयी’ !!