विश्वास ठाकुरांसहीत अभिनेता स्वप्निल जोशी, अभिजित खांडकेकर याना सुविचार गौरव पुरस्कार जाहीर !!! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

 

“सुविचार गौरव” पुरस्कार जाहीर

विश्वास बँकेचे अध्यक्ष विश्वास ठाकुर यांना सामाजिक क्षेत्रातील पुरस्कार घोषित !

अभिनेते स्वप्निल जोशी, अभिजित खांडकेकर यांचा समावेश

 

नाशिक दि. ०४ (प्रतिनिधी) :-समाजासाठी विविध क्षेत्रात अविरतपणे झटणाऱ्या मान्यवरांची “सुविचार गौरव” पुरस्कारासाठी नावे जाहीर करण्यात आली असून यात अभिनेते स्वप्नील जोशी व अभिजित खांडकेकर यांचा समावेश आहे. 

विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तिंचे कार्य समाजापुढे आणून त्यांचा गौरव करण्यासाठी ‘सुविचार मंच’ या सामाजिक संस्थेच्या वतीने प्रस्ताव मागविण्यात आले होते. या प्रस्तावांमधून सुविचार गौरव पुरस्कारांसाठी निवड करण्यात आलेल्या पुरस्कारार्थींची नावे संस्थेच्या वतीने आज जाहीर करण्यात आली.

          यामध्ये कला क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल चित्रपट अभिनेते स्वप्निल जोशी यांची निवड करण्यात आली. तर अभिनय क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी बद्दल “माझ्या नवऱ्याची बायको” फेम अभिनेते गुरु उर्फ अभिजित खांडकेकर यांना विशेष पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. यांसह डॉ.रविंद्र सपकाळ (शैक्षणिक), दिपक बागड (उद्योग), हृदयरोग तज्ञ डॉ. आशुतोष साहु (वैद्यकीय), 
        विश्वास ठाकूर (सामाजिक) ,
महाराष्ट्र महिला क्रिकेट संघातील खेळाडु माया सोनवणे (क्रीडा), जेष्ठ साहित्यिक प्रा.डॉ.विनोद गोरवाडकर (साहित्य) यांना सुविचार गौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. तसेच माजी खासदार प्रतापदादा सोनवणे यांना यावेळी “जीवन गौरव” पुरस्काराने गौरवित करण्यात येणार आहेत.

सार्वजनिक वाचनालयाचे माजी अध्यक्ष मधुकर झेंडे यांचे अध्यक्षतेखाली आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ.स्वप्निल तोरणे व के.बी.एच.आय.एम.आर. या व्यवस्थापन महाविद्यालयाचे संचालक प्रा.डॉ. प्रशांत सूर्यवंशी हे सदस्य असलेल्या निवड समितीने आलेल्या प्रस्तावांमधून सर्वोत्तम गौरवपात्र व्यक्तिंची निवड केली आहे.       

सोमवार दि. १३ ऑगस्ट रोजी सांयकाळी ५ वाजता माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते येथील रावसाहेब थोरात सभागृहात आयोजित एका शानदार कार्यक्रमात सुविचार गौरव पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे.  यावेळी माजी उपमुख्यमंत्री आ. छगन भुजबळ व माजी मंत्री विनायकदादा पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

या कार्यक्रमासाठी सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन सुविचार मंच आयोजकांकडून करण्यात आले आहे.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

होय! मी नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती लिना बनसोड(भा.प्र.से.) यांच्याबद्दलच बोलतो आहे, लिहितो आहे.

महावितरणचा वरिष्ठ तंत्रज्ञ व आणखी एक इसम लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

'मायबाप' ने जागवल्या मातेच्या आठवणी ! 'मह्या मायपुढं थिटं, सम्दं देऊळ राऊळ...तिच्या पायाच्या चिऱ्यात, माह्य अजिंठा वेरूळ' !!