'लोकराजा' दिवाळी विशेषांक २०२४ चे दिमाखात प्रकाशन ! उत्तम साहित्य निर्मिती काळाची गरज- डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी, 'लोकराजा'ने जपला संवेदनशील साहित्याचा वसा-आशिमा मित्तल

'लोकराजा' दिवाळी विशेषांक २०२४ चे दिमाखात प्रकाशन !
 उत्तम साहित्य निर्मिती काळाची गरज- डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी 
'लोकराजा'ने जपला संवेदनशील साहित्याचा वसा-आशिमा मित्तल

     नाशिक(२६):- आजच्या धकाधकीच्या जीवनात माणूस माणसापासून दूर चालला आहे. नव्या माध्यमांमुळे वाचन कमी होऊ लागलं आहे. अशा काळात वाचकांना आवडेल आणि त्यांच्या ज्ञानात भर पडेल अशा संवेदनशील साहित्याचा वसा 'लोकराजा दिवाळी अंका'ने प्राणपणाने जपला आहे, असे उद्गार नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी काढले.

   

 साप्ताहिक न्यूज मसालाच्या १३ वी आवृत्ती 'लोकराजा दिवाळी विशेषांका' चे प्रकाशन साईबाबा हार्ट इन्स्टिट्यूट अँड रिसर्च सेंटरमध्ये ज्येष्ठ हृदयरोगतज्ज्ञ डॉ.अनिरुद्ध धर्माधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली नाशिक जिल्हा रुग्णालयाचे शल्यचिकित्सक डॉ.चारुदत्त शिंदे, डॉ. चौधरी, ज्येष्ठ पत्रकार आणि नाशिक पुढारी आवृत्तीचे संपादक मिलिंद सजगुरे, कृषी विकास अधिकारी संजय शेवाळे, संवेदनशील साहित्यिक विवेक उगलमुगले, ज्योतिषाचार्य नरेंद्र धारणे संपादक नरेंद्र पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या.




     आपल्या भाषणात त्यांनी दिवाळी फराळाबरोबरच दिवाळी अंक ही आपली संस्कृती असल्याचेही सांगितले. मंचावरील मान्यवरांनी आपल्या मनोगतात लोकराजा दिवाळी अंकाच्या तेरा वर्षाच्या प्रवासाबद्दल गौरवोदगार काढत सातत्य ठेवल्याबद्दल संपादकांसह साप्ताहिक न्यूज मसाला परिवाराचे कौतुक केले. अध्यक्षीय भाषणात डॉ.अनिरुद्ध धर्माधिकारी यांनी वाचन संस्कृतीबद्दल चिंता व्यक्त करण्याची गरज नाही, असे सांगत उत्तम साहित्य लेखन करणाऱ्या साहित्यिकांची संख्या कमी होत असल्याने वाचक साहित्याकडे वळत नाही, असे मत मांडत लोकराजा दिवाळी अंकाच्या प्रत्येक पानात विचारप्रवर्तक साहित्य असल्याचे सांगितले. पंचवटी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, शेखर फरताळे यांनीही स्नेहसदिच्छा दिल्या.



     प्रकाशन सोहळ्यास ॲड.मिलिंद चिंधडे, ज्येष्ठ साहित्यिका अलका दराडे, सुनंदा पाटील, गिरणा गौरव प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सुरेश पवार, सुप्रसिद्ध साहित्यिक जी.पी.खैरनार, ज्येष्ठ पत्रकार नरेंद्र जोशी, गौरव अहिरे, नंदू शेळके, दीपक कणसे, अरुण बिडवे, नाशिक तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनील पवार, जिपचे निवृत्त अधिकारी सय्यद सर, बहाळकर सर, राजेंद्र अमृतकार, युवाकवी नितीन कोकणे, प्रफुल्लचंद्र काळे, सुभाषित प्रकाशनाचे प्रकाशक सुभाष सबनीस, ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक पुंजाजी मालुंजकर आदींसह रसिक उपस्थित होते.







     संपादक नरेंद्र पाटील, उपसंपादक संजय देवधर, प्रतिनिधी डॉ.एन.ए.पाटील, तेजस पाटील, जिग्नेश पाटील यांनी मान्यवरांचा विठ्ठल-रुक्मिणीची देखणी प्रतिमा देत यथोचित सन्मान केला. कवी रवींद्र मालुंजकर यांनी सूत्रसंचालन केले.

टिप्पण्या

  1. खूप खूप शुभेच्छा दिवाळी अंकाला. साहित्यिक फराळ नेहमीप्रमाणे उत्तमच असणार

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।

राष्ट्र उभारणी मध्ये बांधकाम व्यवसायिकाचे मोलाचे स्थान -बोमन इराणी

सर्वसामान्यांच्या स्वप्नांना आकार देणारा शेल्टर-२०२४ चा भूमीपूजन सोहळा संपन्न ! २० ते २५ डिसेंबर दरम्यान त्र्यंबक रोडवरील ठक्कर इस्टेट येथे भरणार शेल्टर २०२४, घरे आणि बांधकाम बाबत सर्व काही एकाच छताखाली !