राज्याचे आरोग्य विभाग आयुक्त संजीव कुमार यांनी दिले निर्देश-मातामृत्यू व बालमृत्यू कमी करणे तसेच अनेमिया व हिमोग्लोबिन वाढविण्यावर भर द्यावा !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

      नाशिक (३)::- मातामृत्यू व बालमृत्यू कमी करणेसाठी आरोग्य केंद्र व उपकेंद्र यामध्ये कमीत-कमी प्रसूती करून जास्तीत जास्त प्रसूती ग्रामीण रुग्णालयात करण्यासाठी प्रयत्न करावेत. तसेच आरोग्य विभागाच्या वतीने अनेमिया व हीमोग्लोबिन वाढविण्यावर अधिक भर देण्यासाठी नियोजनानुसार काम करण्याचे निर्देश राज्याच्या आरोग्य विभागाचे आयुक्त संजीव कुमार यांनी केले.
       शासनाच्या आरोग्य विभागाच्या वतीने आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांची विभागीय बैठक आज जिल्हा परिषदेच्या रावसाहेब थोरात सभागृहात आरोग्य विभागाचे आयुक्त संजीव कुमार यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी संजीव कुमार यांनी विविध विषयांचा आढावा घेताना मातामृत्यू व बालमृत्यू याकडे अधिक लक्ष देवून काम करण्याच्या सूचना सर्व उपस्थिताना केल्या. घरी प्रसूती होत असल्याने माता तसेच बाल मृत्यूचे प्रमाण वाढते त्यामुळे एकही प्रसूती घरी होणार नाही यासाठी सर्व आरोग्य यंत्रणेने दक्ष राहून काम करावे असेही ते म्हणाले.
       यावेळी जास्त प्रसूती केलेल्या नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी व नांदगाव तसेच जळगाव जिल्ह्यातील चोपडा या ग्रामीण रुग्णालयांचा यावेळी संजीव कुमार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ नरेश गिते यांनी नाशिक जिल्ह्यात मातामृत्यू व बालमृत्यू कमी करणेसाठी प्रभावी नियंत्रण करण्यात येत असून अनेमिया व हीमोग्लोबिन याबाबतदेखील चांगले काम करण्यात येईल असे आश्वासन आयुक्त संजीव कुमार यांना दिले.
     आढावा बैठकीस अतिरिक्त अभियान संचालक डॉ सतीश पवार, सह संचालक डॉ शशीकांत जाधव, सहायक संचालक अनिरुद्ध देशपांडे, डॉ एन. डी. देशमुख, नाशिक मंडळाचे उपसंचालक डॉ सुरेश जगदाळे,डॉ आर. बी निगडे, डॉ महेंद्र जगताप, जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ विजय डेकाटे यांच्यासह नाशिक विभागातील सर्व जिल्ह्यांचे जिल्हा शल्य चिकिस्तक, जिल्हा आरोग्य अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधीक्षक, जिल्हा माता संगोपन अधिकारी आदि उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

निवडणूक लढवायची तर आधी शपथ घ्यावी लागते !

स्त्री आत्मनिर्भर बनल्यास समाजाचा विकास होईल-पद्मश्री नीलिमा मिश्रा ! गटशिक्षण अधिकारी हेमंत बच्छाव व शिक्षण विस्तार अधिकारी शीतल कोठावदे यांना रोटरी वोकेशनल सर्विस अवार्ड प्रदान !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।