पोस्ट्स

भारतातील दुसऱ्या क्रमांकाचा लिबर्टी ब्रँड चे नासिकच्या बाजारपेठेत पदार्पण ! 'आराम के लिए फँशन !

इमेज
लिबर्टी" चे नाशिक मध्ये पदार्पण नाशिक (११)::-- पादत्राणे उद्योगातील भारतातील दुसऱ्या क्रमांकाचा आघाडीचा  ब्रँड  असलेल्या "लिबर्टी "ने  नाशिकच्या बाजारपेठेत  पदार्पण केले असून, कॉलेजरोड वरील श्रद्धा पेट्रोल पंपाजवळील बी  स्क्वेअर येथे कंपनीने आपले भव्य दालन सुरु केले आहे. ६४ वर्षापासुन लिबर्टी कंपनी या क्षेत्रात असुन आजमितीस अतिशय नवीन ,फॅशनेबल स्वरूपाची पादत्राणे आपल्या ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिली आहेत अशी माहीती आर.के.साधू यांनी पत्रकार परिषदेत दिली. "आराम के लिए फॅशन" ही टॅग लाईन तंतोतंत  सांभाळत कंपनी आपल्या ग्राहकांची आवड निवड जपत उत्कृष्ट पद्धतीचे फॅशनेबल आणि तेवढेच आरामदायी पादत्राणे वेळोवेळी बदल करत  ग्राहकांसाठी बाजारात आणते . एस एस १८ ही नव्याने येत असलेली श्रेणी आणि कंपनीची  इतर सुमारे ४५० पेक्षा जास्त उत्पादने नाशिक मधील दालनात  कंपनीने उपलब्ध करून दिली आहेत . पुरुषांकरिता फॉर्मल आणि कॅज्युअलसाठी "कुलर्स" , स्पोर्ट्स मध्ये फोर्स १०, महिला वर्गासाठी खास "सेनोरिटा "  मुलांसाठी  "फुटफन " ही उत्पादने येथील खास आकर्षण आहे

स्थानिक स्वराज्य संस्थांचे वाटोळे होत आहे काय ?,     कायद्यात बदल करायला हवा की नको ?      राष्ट्रगीताचा अपमान होतो असे वाटते काय ?

इमेज
खालील संदेश पटला असेल तर सर्वांपर्यंत पोहचविण्यासाठी लिंक शेअर करा ! नागरिकांच्या सोयी सविधांसाठी स्थानिक स्वराज्य संस्थांची निर्मिती केली जाते, विश्वस्त की चोर निवडून दिले जातात हा प्रश्न उपस्थित होतो, याचे अवलोकन सर्वच राजकीय पक्षांनी करायची वेळ आली आहे , अन्यथा वेळ निघून गेल्यास अराजकता निर्माण होईल असे वाटते, नागरिक शांत असतात, मुकाट सहन करतात असे ग्रुहीत धरण्याचे दिवस संपले आहेत असे कुणालाच वाटत नाही का ?       राजदंड पळविणे हे विरोधकांचे काम व तो सांभाळणे हे सत्ताधाऱ्यांचे काम ! विषय मंजूर वा नामंजूर हा सभाग्रुहाला दिलेला अधिकार असतांना तो मान्य करणे बंधनकारक असले तरी कोणत्या शिष्टाचारांत तो पारित झाला वा होतो हेही तितकेच महत्वाचे आहे याचा जणू सत्ताधाऱ्यांना विसर पडत आहे की काय ? आजचे विरोधकही कालच्या किंवा उद्याच्या सत्तेत होते किंवा राहतील त्यांनाही जनसामान्यांनी दिलेली विश्वस्तपदाची बूज राखणे भविष्यातील राजकारणासाठी गरजेचे आहे,       महासभेत नागरिकांच्या विकासाचे खरोखर काम केले जाते का ? उद्या नागरिकांनी जर प्रश्न विचारला की स्थानिक स्वराज्य संस्थेंतर्गत किती विद्यार्थी शि

मुका घ्या मुका ! राज्यातील सहा जागांवरील निकाल ! सत्तासुंदरीने घेतला मनसेचा व दोन्ही काँग्रेसचा मुका ! वर्चस्व नसल्याने मिळालेल्या भाजपाच्या पाठिंब्याने सेनेला एक जागा !

इमेज
काय वाटते ? राज्यभरांतील सर्व सहा जागांवर भाचपाचा धुव्वा, सेनेला मुंबईतील एक जागा जिथे भाजपाचे वर्चस्व नव्हते तेथे भाजपाने दिलेल्या पाठींब्याने ! सोलापूर व अहमदनगर काँग्रेसकडे ! पुणे व उल्हासनगर राष्ट्रवादी काँग्रेच्या पारड्यात ! आणी--------- नासिक::-मनसेच्या गटनेत्या सुरेखा भोसले यांच्या आकस्मिक निधनाने रिक्त  झालेल्या प्रभाग १३ च्या पोटनिवडणुकीत अँड.वैशाली भोसले २३२२ मतांच्या आघाडीने विजयी झाल्या.         तशी हि निवडणुक बिनविरोध करण्याचे प्रयत्न होत असतांना शिवसेनेची सत्तासुंदरीचा "मुका" घेण्याचा मनसुबा धुळीस मिळविणे हे दोन्ही काँग्रेसने ठरविल्या प्रमाणे घडले. याचा शिवसेनेच्या नवनिर्वाचित शहरप्रमुखांना मोठा धक्का मानला जात असुन मध्यंतरीच्या काळात मराठा क्रांती मोर्चा व पुन्हा तोच विस्मरणांत गेलेला मुद्दा गांढुळाच्या "मुका" ने एेनवेळी उकरून काढण्याचे कसब शब्दच्छल करून साधण्याचा खटाटोप करून सेना नेत्रुत्वाने का केला हे कोडे आता सोडविणे नासिक सेनेच्या पुढील मोठे आव्हान समजल्यास वावगे ठरू नये असा हा पोटनिवडणुकीचा निकाल आहे.         सत्ता सुंदरीने मनसेचा "म

सहा महिन्यानंतर, अधिक सुविंधांसह, दिव्य कार्निव्हल सिनेमाज आजपासुन सुरू ! प्रथममच डाल्बी 7.1 साउंड सिस्टिमचा वापर !

इमेज
सहा महिन्यानंतर दिव्य कार्निव्हल सिनेमाज आजपासुन नासिककरांच्या सेवेत रूजू ! प्रथममच डाल्बी 7.1 साउंड सिस्टिम चा वापर ! नासिक::- दिव्य कार्निव्हल ने सहा महिन्यांत टप्प्या-टप्प्याने पूर्विची मेकओव्हर पद्धत बदलत आज एका आकर्षक मल्टिप्लेक्स ची श्रुंखला सुरू करून चित्रपट चाहत्यांना एक नवीन आनंददायी सुखकारक अनुभूती देण्याचा दिव्य कार्निव्हल सिनेमाजकडून उपलब्ध करून दिल्याची माहीती डाँ. श्रीकांत भासी यांनी पत्कार परिषदेच्या माध्यमातून दिली.       पहिल्यापेक्षा लांब व रूंद पडदे, 7.1 डाँल्बी साऊंड सिस्टिम च्या आधुनिक टेक्नालाँजीचा वापर करण्यात आलेले स्वयंपूर्ण मल्टिप्लेक्स प्रेक्षकांना आवडेल व सुरक्षित वातावरणाने चित्रपटाचा आनंद द्विगुणीत  करेल, १०५३ बैठकांची क्षमता तसेच सर्व पडदे 2K प्रोजेक्षन प्रणाली युक्त असल्याने उचित प्रकाशात 3D चित्रपट पाहण्यासाठी अनुकुल आहे.        सर्वसाधारण पणे टप्प्या-टप्प्याने मल्टिप्लेक्स अपग्रेड केली जातात मात्र कार्निव्हल सिनेमाजकडून या चित्रपटग्रुहास अपग्रेड (नवीनीकरण) करण्यासाठी सहा महिने पूर्णत: बंद ठेवण्यात आले. वरिष्ठ मंडळींना १८० अंशात मागे टेकुन सिनेमा बघ

आदीवासी विकास महामंडळाच्या कारभाराविरोधात ६ एप्रिल पासुन आमरण उपोषण !

इमेज
नासिक::-आदिवासी विकास महामंडळाचा कारभार  गेल्या दोन वर्षा पासून अतिशय धिम्या गतीने चालू असून संचालक मंडळाच्या सुचना व ठरावांची अंमलबजावणी होत नाही या विभागातले अधिकारी कोणाला जुमानत नसल्या मुळे आदिवासी योजना ठप्प होत आहेत. शासनाकडून आलेला निधी योजनावर खर्च होत नाही तो शासनास परत जात आहे. महामंडळाची पंप व पाईप योजनेचा खर्चीत निधी 43 कोटी खर्च न करता शासनाला परत केल्याप्रकरणी संचालक मंडळाला अंधारात ठेवले गेले.खावटी कर्ज वाटप योजनेचे 70 कोटी रूपये परत केल्या प्रकरणी दोशींवर कारवाई व्हावी.या करता व अशा अनेक मागण्यांकरता आदिवासी विकास भवनासमोर उपोषण करण्यात येणार असल्याची माहीती पत्रकार परिषदेत देण्यात आली या वेळी आदीवासी विकास महामंडळाचे भरतसिंग दुधनाग, धनराज महाले,मिनाक्षीताई वट्टी,अशोक मंगाम, मधुकर काठे,विठ्ठल देशमुख,केवलराम काळे,देविदास पाटिल, भगवानदादा वळवी, आदी उपस्तीत होते. सौजन्य नासिक लोकल, नासिक

अटक न करण्यासाठी हवालदाराने मागीतली २५००० ची लाच ! ४ एप्रिलची सलग तिसऱ्या घटनेत एकाच कारणासाठी लाच ! हवालदार जाळ्यात !

इमेज
तक्रारदाराच्या भावास पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात जादा कलम लागू न करणे व  अटक करू नये यांसाठी पंचवीस हजार रूपयांची लाच स्विकारतांना नवघर पोलीस ठाणे ग्रामीण चा हवालदार अंकुष मंगल भोईर यांस ठाणे लाचलुचपत विभागाने कारवाई करून सापळा यशस्वी केला,       ४ एप्रिल हा दिवस खोपोली, उस्मानाबाद नवघर मधील पोलीसांच्या लाचखोरीचा तसेच तक्रारदारांस किंवा त्याच्या भावास वा दोघांना अटक करू नये या एकाच प्रकारच्या तक्रारींसाठी नोंद झाला.

माध्यमिक शाळा लिपीक व काँन्स्टेबल लाचलुचपतच्या जाळ्यात !

इमेज
उस्मानाबाद::-ढोकी पोलीस ठाण्यातील हेड काँनस्टेबल मधुकर प्रल्हाद कदम (आरोपी क्र-१) व जावळे-दुमाला येथील माध्यमिक विद्यालयाचा लिपीक सुनिल भास्कर जाधव (आरोपी क्र-२)यांना उस्मानाबाद लाचलुचपत युनिटने तक्रारदार यांना आरोपी न करण्यासाठी ३ एप्रिलला ३०००/- रूपयांची मागणी केली होती, ती ४ एप्रिल रोजी आरोपी क्र-१ च्या सांगण्यावरून आरोपी क्र-२ ला स्विकारतांना उस्मानाबाद लाचलुचपत चमूने पकडले.

पोलीस निरिक्षक लाचलुचपतच्या जाळ्यात ! चार लाखाची मागणी पैकी एक लाखाची रक्कम स्विकारतांना------

इमेज
ठाणे::-खोपोली पोलीस ठाणे, रायगडचे पोलीस निरिक्षक राजन नारायण जगताप यांनी ४०००००/- रूपये व दोन विदेशी दारूच्या बाटल्यांची मागणी त्क्रादाराकडे मागीतली होती त्यापैकी १०००००/- रूपये स्विकारतांना ४ एप्रिल रोजी रात्री सव्वानऊ वाजता लाचलुचपत खात्याकडून पकडण्यात आले.        तक्रारदाराच्या भावास पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात अटक करू नये तसेच तक्रारदार यांस इतर गुन्ह्यात अटक न करण्यासाठी सदर लाचेची रक्कम मागण्यांत आली होती.

जिल्हा क्रिडा अधिकारी लाचलुचपतच्या जाळ्यात ! दोन लाख रूपयांची मागणी, ऐंशी हजार स्वीकारतांना सापडले !

इमेज
बीड येथील जिल्हा क्रिडा अधिकारी लाचलुचपतच्या जाळ्यात ! सात व्यक्तींचे व्यायामशाळेच्या बांधकामाचे पहिल्या हप्त्याचे प्रत्येकी तीन लाख प्रमाणे अनुदान बँक खात्यात जमा करण्यासाठी दोन लाख रूपयांची मागणी ७ फेब्रुवारी १८ ला फिर्यादी शेतकरी वय ५५ यांच्याकडे करण्यात आली होती.  यांत आरोपी नं १ जिल्हा क्रिडा अधिकारी नामे नंदा गजानन खुरपुडे , व आरोपी नं २ परिचर नामे शेख फईम शेख अल्लाउद्दीन यांना बीडचे पोलीस अधिक्षक हनपुडे पाटील व लाचलुचपत च्या टीमने सापळा रचून आरोपी नं २ यांस ८००००/- रूपये रक्कमेची लाच स्वीकारतांना काल दि ३ मार्च रोजी पकडण्यात आले. लाचेची रक्कम ८००००/- रूपये मिळून आली.

जाती-धर्माच्या पलीकडे जाऊन राष्ट्रहितास सर्वोच्च प्राधान्य द्यावे-पोलीस आयुक्त डाँ.रविंद्रकुमार सिंगल, शहीद पोलीस शिपाई फिरोज पठाण यांना स्मरणांजली अर्पण , महाराष्ट्रातील पहील्याच मार्गदर्शक उपक्रमाचे आयोजन

इमेज
नासिक(3)::-जाती-धर्माच्या पलिकडे जाऊन राष्ट्रहिताला प्राधान्य द्यावे असे आवाहन शहीद पोलीस शिपाई फिरोज अफजलखान पठाण यांच्या स्मरणांजली कार्यक्रमा प्रसंगी नासिक पोलीस आयुक्त डाँ रविंद्रकुमार सिंगल यांनी केले.        शहीद पोलीस शिपाई पठाण यांच्या स्मरणांजली कार्यक्रमाचे आयोजन के.टी.एच.एम.महाविद्यालयाच्या व्हि.एल.सी.सभाग्रुहात करण्यात आले होते.       प्रारंभी मान्यवरांचे हस्ते दिपप्रज्वलन तसेच शहीद पठाण यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. प्रतिमेसमोर पुष्पचक्र अर्पण करतेवेळी अफजलखान पठाण (शहीद फिरोज यांचे  वडील) यांना त्यांच्या भावना अनावर झाल्याने शहीद मुलाच्या आठवणीने अश्रुंना वाट करू द्यावी लागली त्यावेळी सभाग्रुहातील वातावरण भावनिक झाले होते.           पोलीस खात्यात अधिकारी व कर्मचारी हे जनतेच्या सेवेसाठी व कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अहोरात्र सेवा बजावत असतात, वेळप्रसंगी कायद्याची अंमलबदावणी करतांना कधीकधी कठोर कारवाई करावी लागते, जनता व पोलीस समोरासमोर येतात तेव्हा पोलीसही आपल्यासारखेच आहेत ही जाणीव जनतेनेही ठेवायला हवी, मात्र अशा प्रसंगी काही अघटीत घडते अशा वेळी प्रत्येका