स्थानिक स्वराज्य संस्थांचे वाटोळे होत आहे काय ?,     कायद्यात बदल करायला हवा की नको ?      राष्ट्रगीताचा अपमान होतो असे वाटते काय ?


खालील संदेश पटला असेल तर सर्वांपर्यंत पोहचविण्यासाठी लिंक शेअर करा !

नागरिकांच्या सोयी सविधांसाठी स्थानिक स्वराज्य संस्थांची निर्मिती केली जाते, विश्वस्त की चोर निवडून दिले जातात हा प्रश्न उपस्थित होतो, याचे अवलोकन सर्वच राजकीय पक्षांनी करायची वेळ आली आहे , अन्यथा वेळ निघून गेल्यास अराजकता निर्माण होईल असे वाटते, नागरिक शांत असतात, मुकाट सहन करतात असे ग्रुहीत धरण्याचे दिवस संपले आहेत असे कुणालाच वाटत नाही का ?
      राजदंड पळविणे हे विरोधकांचे काम व तो सांभाळणे हे सत्ताधाऱ्यांचे काम ! विषय मंजूर वा नामंजूर हा सभाग्रुहाला दिलेला अधिकार असतांना तो मान्य करणे बंधनकारक असले तरी कोणत्या शिष्टाचारांत तो पारित झाला वा होतो हेही तितकेच महत्वाचे आहे याचा जणू सत्ताधाऱ्यांना विसर पडत आहे की काय ? आजचे विरोधकही कालच्या किंवा उद्याच्या सत्तेत होते किंवा राहतील त्यांनाही जनसामान्यांनी दिलेली विश्वस्तपदाची बूज राखणे भविष्यातील राजकारणासाठी गरजेचे आहे,
      महासभेत नागरिकांच्या विकासाचे खरोखर काम केले जाते का ? उद्या नागरिकांनी जर प्रश्न विचारला की स्थानिक स्वराज्य संस्थेंतर्गत किती विद्यार्थी शिक्षण घेत आहेत ? त्याच्या शिक्षणावर किती खर्च ती संस्था करते ? यासाठीचा निधी जनतेकडून शिक्षणकर रूपाने, राज्य सरकारकडून मिळणारा निधी, केंद्राकडून मिळणारा निधी, तसेच जागतिक पातळीवरून मिळणारा निधी या सर्वांचा जर हिशोब केला व ते खर्च प्रत्येक विद्यार्थ्यामागे काढला तर कदाचित तो आकडा उच्च दर्जाच्या शिक्षण संस्थेपेक्षाही जास्त येईल याचा अर्थ काय निघतो हे सांगण्याची आवश्यकता नाही असे वाटते.
   विषय मंजूर करतांना महासभेतील ध्वनीयंत्रणा बंद पडते ( माईक ) , तांत्रिक बाब आहे , बंद पडू शकते ते समजू शकतो परंतु यंत्रणा बंद पडली हा गौडबंगालचा भाग नसावा असे वाटते या मताशी सहमत आहात काय ?
       सभाग्रुहात गोंधळ चालू असतो, ध्वनीयंत्रणा बंद असते, अशातच पीठासीन आजच्या सभेतील सर्व विषय मंजूर करतात व राष्ट्रगीत सुरू करण्याची सूचना देतात अन् सभाग्रुहात राष्ट्रगीत सुरू होते, राष्ट्रगीत अर्ध्यावर येईपर्यंत अनेकांना माहीत नसते व पुढील पंघरा वीस सेकंदात भारत माता की जय म्हणतांना कुठलीही शरम कशी वाटत नाही !
       स्थानिक स्वराज्य संस्थांमधील हा प्रकार तत्काळ थांविण्यासाठी कठोर नियम अंमलात आणणे गरजेचे आहे काय ? नागरिकांच्या कररूपाने जमा झालेला निधी हा योग्य रितीनेच खर्च व्हायला हवा , विरोधकांचे मतही विचारात घ्यायला हवे, आणी सभेचे विषय संपल्यानंतरच सन्मानाने राष्ट्रगीताला सुरूवात व्हावी,
       शिक्षणावरील खर्च हे वानगीदाखल उदाहरण आहे, त्याचप्रमाणे इतरही विषयांच्या बाबतीत प्रशासनासहीत सर्वच राजकीय धुरीनांनी व जनतेने अभ्यास करायला हवा. मग ठरवा आम्ही ठेवतो राष्ट्रगीताचा मान , उंचावतो देशाची शान  !!!
हा संदेश कुठल्याही एका स्थानिक स्वराज्य संस्थेबद्दल नसुन सर्वसमावेशक आहे,
सर्वांपर्यंत पोहचवावसा वाटल्यास  लिंक शेअर करा.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

होय! मी नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती लिना बनसोड(भा.प्र.से.) यांच्याबद्दलच बोलतो आहे, लिहितो आहे.

महावितरणचा वरिष्ठ तंत्रज्ञ व आणखी एक इसम लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

'मायबाप' ने जागवल्या मातेच्या आठवणी ! 'मह्या मायपुढं थिटं, सम्दं देऊळ राऊळ...तिच्या पायाच्या चिऱ्यात, माह्य अजिंठा वेरूळ' !!