पोस्ट्स

सावरगांव प्रकरणांत निव्रुत्तीनाथ संस्थान विश्वस्त मंडळाकडे सदर विश्वस्ताचा माफीनामा सादर ! आषाडी यात्रेचे नियोजनासंदर्भात बैठकीत सविस्तर चर्चा !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
त्र्यंबकेश्वर (२०)::-निव्रुत्तीनाथ संस्थानच्या विश्वस्तांनी आजच्या बैठकित १६ तारखेला सावरगांव येथे घडलेल्या प्रकारावर पांघरून घालत विषय मार्गी लावून संस्थानचे भविष्यात होऊ घातलेल्या नुकसानीस थांबविण्यात यश मिळविले आहे, संबधित विश्वस्त या बाबीमुळे अभिनंदनास पात्र आहेत.      सावरगांव येथील प्रतिष्ठित-दानशूर व गेल्या चाळीस वर्षापासुन वारकरी पंथाची पताका खांद्यावर मिरविणारे बाबाजी पाटील-कुशारे व संस्थानचे विश्वस्त, आश्रम निर्माते, ब्रम्हचारी पंडीत महाराज कोल्हे यांची अकरा हजार रूपयांच्या देणगीवरून खडाजंगी झाली होती, मात्र दोन्ही पक्षांनी व संस्थानच्या विश्वस्त मंडळाने सामंजस्याची भूमिका घेत झालेला कथित प्रकार हा गैरसमजुतीतुन झाला होता. यापुढे असा प्रकार कुणाकडूनही घडू नये याची खबरदारी घेत पंडीत कोल्हे यांच्याकडून माफीनामा लिहून घेत व तो मंजूर करत हा विषय आजच्या बैठकित संपवून संतश्रेष्ठ निव्रुत्तीनाथ संस्थानच्या होणाऱ्या बदनामीकारक नुकसानीतून सावरले, याचे श्रेय अध्यक्ष संजय धोंगडे, सचिव पवन भुतडा, त्र्यंबक गायकवाड, पुंडलिक थेटे, जयंत गोसावी,यांना जाते , त्यांना इतर विश्वस्तांनीही तितक्याच

मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर कामगारांचे उपोषण मागे ! कामगारांचे प्रश्न लवकरात लवकर सोडविण्याचे संबंधित यंत्रणांना आदेश !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !

इमेज
मुंबई दि. १९ : माथाडी कामगारांच्या महाराष्ट्र शासनाशी संबंधित असलेल्या विविध प्रश्नांची तातडीने सोडवणुक करण्याच्या व त्याबाबतच्या अधिसुचना त्वरीत काढण्याच्या सुचना महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याने ‘‘महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियन’’ चे पदाधिकारी वकार्यकर्त्यांचे सोमवार दि. १८ जून २०१८ पासून आझाद मैदान, मुंबई येथे सुरू असलेले उपोषण मागे घेण्यात आले.             माथाडी कामगारांच्या विविध प्रश्नासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयात संयुक्त बैठक आयोजित केली होती त्या बैठकीत हे आदेश दिलेले आहेत.बैठकीस महाराष्ट्र राज्याचे महसुल मंत्री ना.चंद्रकांत दादा पाटील, कामगार मंत्री ना. संभाजी पाटील-निलंगेकर,कामगार विभागाचे प्रधान सचिव बलदेव सिंह, महसुल विभागाचे प्रधान सचिव मनुकुमार श्रीवास्तव, सहपोलिस आयुक्त देवेन भारती, कामगार आयुक्त नरेंद्र पोयाम, सह कामगार आयुक्त (माथाडी), श्री लाखस्वार, सहाय्यक कामगार आयुक्तश्री.वि.रा.जाधव, विविध माथाडी बोर्डाचे अधिकारी, माथाडी कामगार नेते आमदार नरेंद्र अण्णासाहेब पाटील, कार्याध्यक्ष

जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांमध्ये २१ जून आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा करण्यात येणार - डाँ.नरेश गिते. सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
         नाशिक – जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांमध्ये २१ जून हा आंतरराष्ट्रीय योगादिन साजरा करण्यात येणार असून याबाबत सर्व तालुकास्तरीय यंत्रणेला सूचना देण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेचे  मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ नरेश गिते यांनी दिली.           संयुक्त राष्ट्रसंघाने २१ जून हा ‘आंतरराष्ट्रीय योग दिवस’ म्हणून साजरा करण्यास मान्यता दिली आहे. त्यानिमित्ताने, गेल्या तीन वर्षापासून विशेष कार्यक्रमाचे आयो​जन करण्यात येत आहे.  याबाबत प्राथमिक शाळांमध्ये हा दिवस साजरा करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने नियोजन केले आहे.  जिल्ह्यामध्ये आंतरराष्ट्रीय योगादिन साजरा करून विध्यार्थी, पालक, नागरिक व ग्रामस्थ यांचे मध्ये याबाबत जनजागृती होण्यासाठी सर्व जिल्हा परिषद शाळांमध्ये साजरा करण्यात येणार आहे. आंतरराष्ट्रीय योगादिनाचे औचित्य साधत प्रत्येक शाळेमध्ये योगासनांचे प्रात्यक्षिक, प्राणायाम, आदि बाबत तसेच नागरिकांचा सहभाग घेऊन योग दिन साजरा करण्यात येणार असल्याचे प्राथमिक शिक्षण विभागाच्या शिक्षण अधिकारी डॉ वैशाली झनकार यांनी सांगितले.                                     07387333

राज्यपालांनी घेतली कुपोषणावरील कार्याची दखल ! ग्रामविकास अधिकाऱ्याचा सत्कार !! शिक्षणाची गुणवत्ता वाढविण्यावरही भर देणार-मुख्य कार्यकारी अधिकारी !!! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !

इमेज
नाशिक  –  नाशिक जिल्ह्यात कुपोषण निर्मुलनासाठी ३ हजारापेक्षा जास्त ग्राम बाल विकास केंद्र स्थापन करण्यात आली आहेत. जिल्ह्यातील कुपोषण निर्मूलनाच्या कामाची राज्याच्या राज्यपालांनीही दखल घेतली असून या कामासाठी सर्व स्तरातून प्रतिसाद मिळत आहे. जिल्हा परिषदेच्या सभागृहानेही कुपोषण निर्मुलनासाठी करण्यात येणाऱ्या प्रयत्नाची दखल घेऊन या कामात सहभाग घेतला आहे. प्रशासनाबरोबरच लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने जिल्ह्यातून कुपोषणाचे उच्चाटन करून सर्व बालकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करू असा विश्वास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ नरेश गिते यांनी व्यक्त केला. सिन्नर  तालुक्याची तालुकास्तरीय आढावा बैठक आज सिन्नर येथील ज्वालामाता मंगल कार्यालयात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ नरेश गिते यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक प्रमोद पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ साळवे, सामान्य प्रशासन विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप चौधरी, बाल विकास विभागाचे उप मुख

देशासाठी प्राणार्पण करणाऱ्या शहिदांच्या मातापित्यांप्रती क्रुतज्ञता व्यक्त करण्याचा कार्यक्रम -माँ तुझे सलाम ! महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघ १,११,०००/- रूपयांची आर्थिक मदत शहीद शुभम मुस्तापुरेच्या मातापित्यांना देणार !! एक ज्योत पेटविली जातेय देशप्रेमाची !!! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!

इमेज
नासिक::-देश रक्षणासाठी सीमेवर शत्रुराष्ट्राशी लढतांना शहिद होण्याचे वय फक्त २० वर्ष ? आणी खेळण्या-बागडण्याच्या वयातलं पोरगं देशासाठी अर्पण करणाऱ्या मातापित्यांचे मनातली घालमेल काय असेल ? साधा विचार करतांच अंगावर काटा ( शहारे नव्हे) उभा राहतो, पण त्या मातापित्यांप्रती जी भावना समाजाकडून व्यक्त व्हायला हवी तशी आज होतांना दिसत नाही, याचा अर्थ समाजांत तसे घटक नाहीत असे नाही, पण व्यक्त कसे व्हावे याचा मार्ग त्यांना अवगत होत नाही तेथे महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघ कमीतकमी एका शहीदाच्या कुटुंबाच्या मागे ऊभे राहण्याचा प्रयत्न करतो हि विशेष उल्लेखनीय बाब समजायला हवी, समाजासाठी एक सकारात्मक संदेश पोहचविण्याचे काम महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघ करीत आहे.          शहीद शुभम मस्तापुरे , अवघा वीस वर्षाचा तरूण देशासाठी ३ एप्रिल २०१८ रोजी धारातीर्थी पडला, त्याच्या मातापित्याचा सन्मान शुक्रवार दि. २२ जुन रोजी सायं. ७ ते १० या वेळेत रोटरी क्लब, गंजमाळ येथे "माँ तुझे सलाम" या देशभक्तीपर संगीत रजनी च्या माध्यमातून मानवंदनेच्या रूपात होत आहे, महासंघाकडून वीरमाता-पित्यास १,११,०००/- रूपयांची आर

आमरण उपोषण, कामगारांच्या शासनाशी निगडीत विविध प्रश्नांची सोडवणूक होण्यासाठी युनियनच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे आझाद मैदानात आमरण उपोषण सुरू !! कार्यवाही लवकर न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा !!! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !

इमेज
माथाडी कामगारांच्या महाराष्ट्र शासनाशी संबंधित असलेल्या विविध प्रश्नांची सोडवणुक होण्यासाठी युनियनच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे आझाद मैदानात आमरण उपोषण सुरु! लवकरात लवकर कार्यवाही न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा ! मुंबई,दि.१८:-माथाडी कामगारांच्या महाराष्ट्र शासनाशी संबंधित असलेल्या विविध प्रश्नांची सोडवणुक होण्यासाठी आज दि.१८ जून,२०१८ पासून आझाद मैदान,मुंबई येथे “महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियन”च्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे उपोषण आंदोलन सुरु आहे, या उपोषण आंदोलनामध्ये युनियनचे सरचिटणीस आमदार नरेंद्र अण्णासाहेब पाटील, कार्याध्यक्ष गुलाबराव जगताप, संयुक्त सरचिटणीस वसंतराव पवार, चंद्रकांत पाटील, ऋषिकांत शिंदे, आनंद पाटील, युनियनचे कायदेशीर सल्लागार अॅड.सौ.भारतीताई पाटील, अध्यक्ष एकनाथ जाधव, उपाध्यक्ष सुर्यकांत पाटील, खजिनदार गुंगा पाटील, सहा.खजिनदार भानुदास इंगूळकर, तसेच इतर सर्व पदाधिकारी व बृहन्मुंबई, ठाणे, पालघर, रायगड व महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झालेले आहेत. माथाडी सल्लागार समितीची पुनर्रचना

आमचा राजकिय रंग बाहेर उतरवून आलो आहोत-उद्धव ठाकरे !! एक वेगळी उर्जा देणारा समारोप समारंभ !!! सविस्तर माहीतीसाठी खालील लिंकवर क्लिक कर !!!

इमेज
मनोरंजन प्रतिनिधी "दिनानाथ" यांजकडून ९८ वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन एक वेगळी ऊर्जा देणारा समारोप समारंभ ,,, दिनांक १३ ते १५ जून २०१८ या कालावधीत मुलुंड येथील महाकवी कालिदास नाट्य मंदिरात तुफान रंगलेले ९८ वे नाट्य संमेलनाचा समारोप समारंभ प्रियदर्शनी क्रीडा संकुल येथील सुधा करमरकर रंगमंच येथे मोठ्या उत्साहात साजरा झाला .  या प्रसंगी प्रमुख पाहुणे मा . श्री उद्धव ठाकरे  [  शिवसेना पक्ष प्रमुख  ], मा श्री सुशीलकुमार शिंदे  [  ज्येष्ठ नेते काँग्रेस  ],  मा विनोद तावडे  [  सांस्कृतिक मंत्री  ]  प्रसाद कांबळी  [  अध्यक्ष नाट्य परिषद  ],  कीर्ती शिलेदार  [  अध्यक्षा नाट्य संमेलन  ],  असे मान्यवर उपस्थित होते . सुरवातीला प्रास्ताविक भाषणात परिषदेचे उपाध्यक्ष डॉ गिरीश ओक यांनी आत्तापर्यंत झालेल्या नाट्य संमेलनामधील कार्यक्रमाचा आढावा घेतला ,  त्या नंतर मुंबई बाहेर महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी नाट्य प्रयोगाची व्यवस्था करणारे रंगकर्मी वितरक याना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले .  त्यांच्या वतीने जयंत जातेगावकर यांनी मनोगत व्यक्त केल्यानंतर नाट्य परिषदेने संपादित केलेल्या ९८ व्य ना