देशासाठी प्राणार्पण करणाऱ्या शहिदांच्या मातापित्यांप्रती क्रुतज्ञता व्यक्त करण्याचा कार्यक्रम -माँ तुझे सलाम ! महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघ १,११,०००/- रूपयांची आर्थिक मदत शहीद शुभम मुस्तापुरेच्या मातापित्यांना देणार !! एक ज्योत पेटविली जातेय देशप्रेमाची !!! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!

नासिक::-देश रक्षणासाठी सीमेवर शत्रुराष्ट्राशी लढतांना शहिद होण्याचे वय फक्त २० वर्ष ? आणी खेळण्या-बागडण्याच्या वयातलं पोरगं देशासाठी अर्पण करणाऱ्या मातापित्यांचे मनातली घालमेल काय असेल ? साधा विचार करतांच अंगावर काटा ( शहारे नव्हे) उभा राहतो, पण त्या मातापित्यांप्रती जी भावना समाजाकडून व्यक्त व्हायला हवी तशी आज होतांना दिसत नाही, याचा अर्थ समाजांत तसे घटक नाहीत असे नाही, पण व्यक्त कसे व्हावे याचा मार्ग त्यांना अवगत होत नाही तेथे महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघ कमीतकमी एका शहीदाच्या कुटुंबाच्या मागे ऊभे राहण्याचा प्रयत्न करतो हि विशेष उल्लेखनीय बाब समजायला हवी, समाजासाठी एक सकारात्मक संदेश पोहचविण्याचे काम महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघ करीत आहे.
         शहीद शुभम मस्तापुरे , अवघा वीस वर्षाचा तरूण देशासाठी ३ एप्रिल २०१८ रोजी धारातीर्थी पडला, त्याच्या मातापित्याचा सन्मान शुक्रवार दि. २२ जुन रोजी सायं. ७ ते १० या वेळेत रोटरी क्लब, गंजमाळ येथे "माँ तुझे सलाम" या देशभक्तीपर संगीत रजनी च्या माध्यमातून मानवंदनेच्या रूपात होत आहे, महासंघाकडून वीरमाता-पित्यास १,११,०००/- रूपयांची आर्थिक मदत देऊन क्रुतज्ञता व्यक्त केली जाणार आहे, महासंघच नव्हे तर कुणीही शहिदांच्या मातापित्यांची वा कुटुंबाच्या त्यागाची परतफेड करू शकत नाही, मात्र तमाम देशवासींयांमध्ये ही क्रुतज्ञतेची भावना रूजविली जावी या उदात्त हेतूने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहीती महासंघातर्फे देण्यात आली व तमाम देशप्रेमींनी हजर राहून मानवंदनेसह क्रुतज्ञता व्यक्त करण्यासाठी या कार्यक्रमास आवर्जुन उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे,
-जयहिंद-

7387333801

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विवाहसंस्कृती की दिखाऊपणाचा बाजार ? समाज कोणत्या दिशेने चालला आहे./ दिखाव्याच्या स्पर्धेने उद्ध्वस्त होत चाललेला मध्यमवर्ग / उशिरा होणारे विवाह आणि अवास्तव अपेक्षा,,,,,,,,

लोकअदालतीत ३ हजार ७६२ प्रकरणे निकाली, ६४ कोटी रूपयांचे तडजोड शुल्क वसूल

खोटी माहिती सादर केल्यास संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात येणार ! उप अभियंत्यांनी दिलेला अंतराचा दाखला ग्राह्य धरला जाईल !! शिक्षकांच्या आॅनलाईन बदल्यांबाबत डॉ. गितेंचा इशारा !!! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!