जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांमध्ये २१ जून आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा करण्यात येणार - डाँ.नरेश गिते. सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

         नाशिक – जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांमध्ये २१ जून हा आंतरराष्ट्रीय योगादिन साजरा करण्यात येणार असून याबाबत सर्व तालुकास्तरीय यंत्रणेला सूचना देण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेचे  मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ नरेश गिते यांनी दिली.

          संयुक्त राष्ट्रसंघाने २१ जून हा ‘आंतरराष्ट्रीय योग दिवस’ म्हणून साजरा करण्यास मान्यता दिली आहे. त्यानिमित्ताने, गेल्या तीन वर्षापासून विशेष कार्यक्रमाचे आयो​जन करण्यात येत आहे.  याबाबत प्राथमिक शाळांमध्ये हा दिवस साजरा करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने नियोजन केले आहे.  जिल्ह्यामध्ये आंतरराष्ट्रीय योगादिन साजरा करून विध्यार्थी, पालक, नागरिक व ग्रामस्थ यांचे मध्ये याबाबत जनजागृती होण्यासाठी सर्व जिल्हा परिषद शाळांमध्ये साजरा करण्यात येणार आहे. आंतरराष्ट्रीय योगादिनाचे औचित्य साधत प्रत्येक शाळेमध्ये योगासनांचे प्रात्यक्षिक, प्राणायाम, आदि बाबत तसेच नागरिकांचा सहभाग घेऊन योग दिन साजरा करण्यात येणार असल्याचे प्राथमिक शिक्षण विभागाच्या शिक्षण अधिकारी डॉ वैशाली झनकार यांनी सांगितले.

                                    07387333801

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

प्रथमतःच अध्यक्षपदी खासदार, सर्व शिक्षक संघटनांची समन्वय समिती स्थापन, कार्याध्यक्षपदी के. के. अहिरे.

दिवाळी अंकासाठी साहित्य पाठविण्याचे आवाहन ! साप्ताहिक न्यूज मसाला चा "लोकराजा" दिवाळी विशेषांक २०२४,

‘मविप्र’ च्या ठेवींचा आकडा सव्वाशे कोटींपर्यंत:- सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे. मविप्र संस्थेची ११० वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत, १ हजार ८७ कोटींचे अंदाजपत्रक, वर्षभरात तीन हजार विद्यार्थ्यांना प्लेसमेंट, मविप्र सुरु करणार वृद्धाश्रम !ऑक्सफर्ड युनिवर्सिटीसोबत मविप्र करणार करार !