आमरण उपोषण, कामगारांच्या शासनाशी निगडीत विविध प्रश्नांची सोडवणूक होण्यासाठी युनियनच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे आझाद मैदानात आमरण उपोषण सुरू !! कार्यवाही लवकर न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा !!! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !

माथाडी कामगारांच्या महाराष्ट्र शासनाशी संबंधित असलेल्या विविध प्रश्नांची सोडवणुक होण्यासाठी युनियनच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे आझाद मैदानात आमरण उपोषण सुरु!

लवकरात लवकर कार्यवाही न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा !

मुंबई,दि.१८:-माथाडी कामगारांच्या महाराष्ट्र शासनाशी संबंधित असलेल्या विविध प्रश्नांची सोडवणुक होण्यासाठी आज दि.१८ जून,२०१८ पासून आझाद मैदान,मुंबई येथे “महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियन”च्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे उपोषण आंदोलन सुरु आहे,

या उपोषण आंदोलनामध्ये युनियनचे सरचिटणीस आमदार नरेंद्र अण्णासाहेब पाटील, कार्याध्यक्ष गुलाबराव जगताप, संयुक्त सरचिटणीस वसंतराव पवार, चंद्रकांत पाटील, ऋषिकांत शिंदे, आनंद पाटील, युनियनचे कायदेशीर सल्लागार अॅड.सौ.भारतीताई पाटील, अध्यक्ष एकनाथ जाधव, उपाध्यक्ष सुर्यकांत पाटील, खजिनदार गुंगा पाटील, सहा.खजिनदार भानुदास इंगूळकर, तसेच इतर सर्व पदाधिकारी व बृहन्मुंबई, ठाणे, पालघर, रायगड व महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झालेले आहेत. माथाडी सल्लागार समितीची पुनर्रचना करुन त्यावर अनुभवी कामगार नेत्यांच्या नेमणुका कराव्या, माथाडी बोर्डाच्या पुनर्रचना करुन त्यावर युनियनच्या सभासद संख्येच्या प्रमाणात सदस्यांच्या नेमणुका कराव्या, माथाडी बोर्डाच्या कार्यालयीन सेवेत कामगारांच्या सुशिक्षित मुला-मुलीना प्राध्यान्य द्यावे,  महाराष्ट्रातील ३६ माथाडी मंडळाचे एकच माथाडी मंडळ करण्याचा प्रयत्न शासनाने थांबवावा, माथाडी मंडळावर पुर्णवेळ चेअरमन,सेक्रेटरी यांच्या नेमणुका कराव्या, माथाडी कायदा व बोर्डाच्या योजनांचा धोका निर्माण करणारे शासन निर्णय रद्द करावे, मापाडी कर्मचा-यांना बाजार समितीच्या कार्यालयीन सेवेत घ्यावे,कळंबोली स्टील मार्केट व रेल्वे माल धक्क्यावरील कामगारांच्या प्रश्नांची सोडवणुक व्हावी, गुलटेकडी मार्केट, पुणे, लातूर, कोल्हापूर येथिल कामगारांच्या प्रश्नांची सोडवणुक व्हावी, माथाडी कामगारांच्या घरकुलासाठी वडाळा व चेंबूर याठिकाणी दिलेल्या जमिनीसंदर्भातील प्रश्नांची आणि इतर दैनंदिन आदी प्रश्नांची सोडवणुक  तातडीने करण्याबद्दल युनियनने शासनाकडे मागणी केली आहे. माथाडी कामगारांच्या न्याय्य मागणीकडे शासन सतत दुर्लक्ष करीत असल्यामुळे उपोषण आंदोलनाचा निर्णय घेणे भाग पडले असल्याचे पत्रकात युनियनने म्हटले आहे.

गेले अनेक वर्षापासून तेच प्रश्न तीच आश्वासने मात्र प्रत्यक्ष कोणतीच कृती सरकारकडून केली जात नसल्यामुळे तमाम माथाडी कामगारांमध्ये कमालीचा असंतोष पसरला आहे. राज्य सरकारने सकारात्मक भुमिकेतून गेले अनेक वर्षापासून प्रलंबित असलेले माथाडी कामगारांचे प्रश्न तातडीने सोडवावेत, अन्यथा माथाडी कामगारांना उपोषण आंदोलनाबरोबर रस्त्यावर उतरुन तीव्र निदर्शने व धरणे आंदोलन करणे भाग पडेल, असा इशारा “महाराष्ट्र राज्य माथाडी,ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियन” ने दिला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

८४ अनुकंपा कर्मचाऱ्यांचे समायोजन !

जागतिक फार्मासिस्ट दिवस विशेष एसएमबीटी फार्मसीच्या विद्यार्थ्यांची ‘अशीही’ सामाजिक बांधिलकी !

विजयादशमीला शिवप्रताप गरूडझेप ! ‘पहिले ते हरिकथा निरुपण, दुसरे ते राजकारण, तिसरे ते सावधपण सर्वाविषयी’ !!