पोस्ट्स

राष्ट्रसंत भैय्युजी महाराज अस्थिकलश दर्शन व विसर्जन आज गोदातीरी झाले, यानिमित्त रामक्रुष्ण लहवितकर महाराजांचे प्रवचनातून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली !!!!

इमेज
नासिक(८ जुलै १८)::-आज प.पु.भैय्युजी महाराज यांच्या अस्थिविसर्जन व कलश दर्शन गोदावरीती करण्यात आले.        राष्ट्रसंत, सद्गुरू, प.पु.डाँ.भैय्युजी महाराज यांच्या आकस्मित निधनाने समाजमन हळहळले, धर्मक्षेत्र, सामाजिक क्षेत्र, राजकीय क्षेत्र असेल त्या सर्वांची मोठी हानी झाली असे हभप रामक्रुष्ण महाराज लहवितकर यांनी  उपस्थितांना आपल्या किर्तनाच्या माध्यमांतून समजावून दिले, आज अस्थिकलश दर्शन व विसर्जन निमित्त किर्तन प्रवचन आयोजित केले होते, नासिक शहर व जिल्हा सर्वोदय परिवार , छावा क्रांतीवीर सेना यांनी या प्रवचनाचे आयोजन करून प्रवचनातून अध्यात्म, जीव व परमात्मा, म्रुत्यु व म्रुत्यु पश्चातील जीवन याचबरोबर भैय्युजी महाराजांचाही परिचय करून दिला.          महाराजांचा मानवता धर्म हा आजही त्यांच्या आत्मारूपी वावराने आपल्या पाठीशी सदैव राहील कारण ते समाजासाठी झटलेत, समाजाला दिशा देणारे राष्ट्रसंत होते, संतांचे निर्माण व त्यांचे जीवन मानवी जीवनातील वास्तव्य हे आत्मारूपाने कायम असते.      यानंतर नासिक तसेच इतर ठिकाणांहून अस्थिकलश दर्शनाला आलेले धार्मिक, राजकीय , सामाजिक, क्षेत्रातील मान्यवरांनी श्रद्ध

पंढरपुरच्या विठ्ठल दर्शनाला नासिकहून सायकल वारी चे सालाबादाप्रमाणे आयोजन,! सायकल प्रेमींना सोमवारपर्यंत (दि. ९ ) सहभागी होण्याचे आवाहन-प्रविणकुमार खाबिया, सायकलिस्ट वारकरी व यावर्षीचा संदेश सविस्तरतेसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
नासिक:(7)::-नासिक सायकलिस्ट व दातार कँन्सर जेनेटिक्स लिमिटेड यांच्यातर्फे संयुक्त विद्यमाने आषाडी एकादशी निमित्त नासिक ते पंढरपूर सायकल वारीचे आयोजन करण्यात आले असुन सायकल प्रेमींनी सोमवार पर्यंत नोंदणी करण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले असुन आतापर्यंत नासिक जिल्ह्यासह मुंबई, पुणे, ठाणे, सिन्नर, सायखेडा, निफाड, पिंपळगांव, संगमनेर, अहमदनगर, व जिल्हाभरांतून ४०० सायकल प्रेमींनी नोंदणी केली आहे.           आयपीएस हरिष बैजल यांच्या संकल्पनेतून गेली सात वर्ष हा उपक्रम दरवर्षी नवीन संदेश घेऊन पार पडत आहे, यावर्षी झाडे लावणे (जगविण्याच्या उद्देशाने योग्य त्या ठिकाणी व जबाबदारी वितरीत करून)  तसेच शुन्य प्लास्टिक हा संदेश घेऊन सायकल वारी १३ जुलै रोजी सकाळी ६:०० वा. नासिक येथील गोल्फ क्लब मैदानावरून निघणार आहे.         नासिक सायकलिस्टचे अध्यक्ष प्रविणकुमार खाबिया यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत माहीती दिली, यांवेळी दातार कँन्सर जेनेटीक्सचे मिलींद अग्निहोत्री, तसेच सकलिस्टचे सचिव नितीन भोसले, राजेंद्र वानखेडे, योगेश शिंदे, राजहंस, रत्नाकर आहेर उपस्थित होते.        दरवर्षी सुधारीत स्वरूपात

ग्रामपंचायतींमधील माहीती संकलनासाठी जिल्हा परिषदेकडून गुगल एक्सलशीटच्या वापरास सुरूवात-राजेंद्र पाटील ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
         नाशिक(७)::-जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाने जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीमधील विविध विषयांची माहिती संकलित करण्यासाठी गुगल एक्सलशीटचा वापर करण्यास सुरवात केली आहे. यासाठी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या विविध विषयांबाबत प्रपत्र तयार करण्यात आले असून प्रत्येक ग्रामपंचायतीमधून सदरची प्रपत्र भरण्यात येणार आहेत. याबाबत आज ग्रामपंचायत विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पाटील यांच्या उपस्थितीत जिल्हा परिषदेच्या रावसाहेब थोरात सभागृहात आज आढावा बैठक घेऊन याबाबत माहिती देण्यात आली. तसेच ग्रामपंचायत विभागाच्या विविध विषयांचा आढावा घेण्यात आला.        ग्रामपंचायत विभाग हा जिल्हा परिषदेच्या सर्वाधिक महत्वाचा विभाग आहे. सर्व प्रकारच्या योजनाची अंमलबजावणी ग्राम स्तरावर ग्रामसेवकाकडून करण्यात येते. तसेच विविध प्रकारचे अहवाल व माहितीदेखील ग्रामसेवकाकडूनच घेण्यात येते. जिल्हा व तालुकास्तरावर विविध आढावा बैठकींसाठी सदरची माहिती आवश्यक असते. यासाठी ग्रामपंचायत विभागाने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ नरेश गिते यांच्या मार्गदर्शनाखाली माहिती संकलनासाठी विविध विषयांचे प्र

"काय झालं कळंना" हे सारे २० जुलैला कळायला हवे ना ? मग बघूयाच !! कथानकाबाबत थोडक्यात माहीतीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
"काय झालं कळंना" २० जुलैला कळलेच पाहीजे ! पहिल्या प्रेमाची अनुभूती कधी स्वर्गसुख तर कधी विरह वेदना देते, या गुतगुंतीच्या विषयाची जाणीव 'श्री धनलक्ष्मी प्रोडक्शन' निर्मित "काय झालं कळंना" या चित्रपटाच्या माध्यमातून २० जुलैला प्रदर्शित सिनेमातून बघायला हवी,       शरद आणी पल्लवी या दोन प्रेमवीरंची कथा , यांत कुणाचं प्रेम अडचणीचा सामना करतं, कुणाचं सहजतेने यशस्वी होते, कुणाला मिळत नाही अशा अडीच अक्षरी प्रेम ह्या शब्दाला मध्यबिंदू ठेवून कथेची मांडणी करण्यात आली आहे.      प्रेमासाठी काहीही करण्याची तयारी असणाऱ्या शरद आणी पल्लवी यांच्या आयुष्यांत घडणाऱ्या घटनांनंतर त्यांच्या प्रेमाला काय दिशा मिळते, या वळणात्मक कथेत पुढे काय बघायला मिळेल हे गुलदस्त्यातील रहस्य असुन हा रहस्यमय सिनेमा नसुन प्रेमपट आहे.         प्रेमातील चांगले वाईट बारकावे दाखवितांना जगण्यातील नवा अर्थ उलगडून दाखविण्याचा प्रयत्न केला आहे,         गिरिजा प्रभू व स्वप्निल काळे या नुकत्याच बारावी झालेल्या वयात आलेल्या दोघांनी रूपेरी पडद्यावर पदार्पण केले आहे. सोबत अरूण नलावडे, संजय खापरे, वंदना वाक

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत ९ कोटी २२ लाखाची कामे मंजूर !!! लवकरच निविदा काढून कामांना सुरूवात !!! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
छगन भुजबळ यांच्या प्रयत्नामुळे...         मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून येवला मतदार संघातील कामे मंजूर !          नाशिक, येवला, दि.३ जुलै:-  माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नातून मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा १ मधून येवला तालुक्यातील प्ररामा २ अंगणगाव ते चिचोंडी - साताळी भिंगारे-मुखेड ते तालुका बॉर्डर इतर जिल्हा मार्ग क्र.१२ व प्ररामा ८ बाभूळगाव खु. ते नांदूर धामोडे-कुसमाडी-न्यायगव्हाण इतर जिल्हा मार्ग क्र.१६ या दोन रस्त्यांची दर्जोन्नती करण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे.             राज्यातील वाड्या-वस्त्यांना जोडणाऱ्या रस्त्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ करण्यासह सध्या असलेल्या रस्त्यांचा दर्जा वाढविण्यासाठी मोठ्या प्रमाणात कामे करणे आवश्यक असल्याने प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या धर्तीवर राज्यात मुख्यमंत्री ग्रामसडक योजना राबविली जात आहे. छगन भुजबळ यांच्या प्रयत्नामुळे मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा १  मधून येवला मतदारसंघासाठी रु. ९ कोटी ७७ लक्षच्या दोन रस्त्यांच्या दर्जोन्नतीला मंजुरी मिळाली आहे.          सदर मंजूर झालेल्या रस्त्यांमध्ये येवला तालुक्यातील प्ररामा

संभाजीराजे - दिलेर खान प्रकरणाचा पेच कसा सुटणार ? दीनानाथ यांजकडून खास प्रश्न !! उत्तर मिळणार झी मराठी वाहीनीकडून !! खालील लिंकवर क्लिक करा, उत्तर काय असेल ?????

इमेज
दीनानाथ  यांजकडून [ मनोरंजन प्रतिनिधी ] संभाजीराजे - दिलेर खान प्रकरणाचा पेच कसा सुटणार?            झी मराठी वाहिनीवर सुरू असलेल्या‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेने आजवर संभाजी महाराजांच्या जीवनावरील महत्त्वाच्या घडामोडींसोबतच बारीकसारीक प्रसंगांवर प्रकाश टाकत खरा इतिहास सादर करण्याचं काम केलं आहे. यात काही नावीन्यपूर्ण वाटाव्यात अशा घटनांचा उलगडाही प्रेक्षकांना होतो आहे. यात आता संभाजी महाराजांच्या जीवनातील महत्त्वाचं समजल्या जाणाऱ्या एका प्रकरणाचा छडा लवकरच लागणार आहे. हे प्रकरण आहे संभाजीराजे आणि दिलेर खान...           संभाजी महाराजांचं दिलेर खानाकडे जाणं याबाबत इतिहासकारांनी अनेक मतमतांतरं मांडली आहेत. वेगवेगळ्या नाटक, कादंबऱ्यांमधून वेगवेगळं चित्र रंगवण्यात आलं आहे. अनेकांना वाटतं की शिवाजी महाराजांवर चिडून संभाजीराजे गेले होते... काहींनी लिहिलंय की स्वत:चं कर्तृत्व सिद्ध करायला गेले... मला इथे संधी मिळत नाही, तर तिथे जाऊन कर्तृत्व गाजवतो. एकूण संभाजीराजांचं बंड अशा पद्धतीने या घटनेकडे पाहिलं गेलं आहे. यामुळे त्यावेळी नेमकं काय घडलं याबाबत विविध विचार आहेत. असं असताना ‘स्वराज्

हिमांशू राय, भैय्युजी महाराज यांच्या आत्महत्या आणी नासिक शहरांतील गेल्या सहा महिन्यातील आत्महत्या !!! धकाधकीच्या जीवनांत थोडा वेळ काढून विचार करायला हवा !! आज लिंक वर क्लिक करा म्हणणार नाही,,,,,पण. सामाजिक दायित्वापोटी लिंक शेअर करा, कमेंट मध्ये अभिप्राय नोंदवा !!

इमेज
आत्महत्यांचे शहर म्हणून नासिक बदनाम व्हायला लागले आहे, की इतर ठिकाणांचीही अशीच परिस्थिती आहे ? जगांत आत्महत्यांचे वेगवेगळे प्रकार आहेत, फास घेणे, जलसमाधी घेणे, उडी घेणे, औषध घेणे, अग्निकाष्ठ घेणे, व अलीकडच्या काळात वाहनाखाली उडी मारून, बंदुकीची गोळी झाडून घेणे इ.           मात्र जीवन संपविणे हे निषेधार्हच मानायला हवे,  पुरातन काळापासुन आत्महत्या करणे याबाबत मतमतांतरे आहेत, काही धर्म समर्थन करतात तर काही धर्म निषेधात्मक पवित्रा घेतात, मुसलमान निषिद्ध मानतात त्यामुळे जगांत सर्वात कमी प्रमाण (अगदीच नगण्य) आढळून येते, त्याखालोखाल बौद्ध धर्मिंयामध्ये ही "अहिंसा परमोधर्म" या तत्वानुसारच्या शिकवणुकीमुळे प्रमाण कमी आहे, मात्र इतर धर्मिंयांमध्ये आत्महत्येचे प्रमाण अधिक आढळून येते.(हिंदू व ख्रिश्चनांमधील काही गटांत अधिक प्रमाण जागतिक पातळीवर नोंदविले गेले आहे, )           काही दिवसांपूर्वी आयएएस अधिकारी हिमांशु राय व राष्ट्रसंत भैय्युजी महाराज यांनी केलेला देहत्याग....... (आत्महत्या म्हणण्याचे धाडस होत नाही पण समर्थन ही करत नाही).         एक पोलीस प्रशासनातील कायद्याचं ज्ञान असलेल्