ग्रामपंचायतींमधील माहीती संकलनासाठी जिल्हा परिषदेकडून गुगल एक्सलशीटच्या वापरास सुरूवात-राजेंद्र पाटील ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

         नाशिक(७)::-जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाने जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीमधील विविध विषयांची माहिती संकलित करण्यासाठी गुगल एक्सलशीटचा वापर करण्यास सुरवात केली आहे. यासाठी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या विविध विषयांबाबत प्रपत्र तयार करण्यात आले असून प्रत्येक ग्रामपंचायतीमधून सदरची प्रपत्र भरण्यात येणार आहेत. याबाबत आज ग्रामपंचायत विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पाटील यांच्या उपस्थितीत जिल्हा परिषदेच्या रावसाहेब थोरात सभागृहात आज आढावा बैठक घेऊन याबाबत माहिती देण्यात आली. तसेच ग्रामपंचायत विभागाच्या विविध विषयांचा आढावा घेण्यात आला.
       ग्रामपंचायत विभाग हा जिल्हा परिषदेच्या सर्वाधिक महत्वाचा विभाग आहे. सर्व प्रकारच्या योजनाची अंमलबजावणी ग्राम स्तरावर ग्रामसेवकाकडून करण्यात येते. तसेच विविध प्रकारचे अहवाल व माहितीदेखील ग्रामसेवकाकडूनच घेण्यात येते. जिल्हा व तालुकास्तरावर विविध आढावा बैठकींसाठी सदरची माहिती आवश्यक असते. यासाठी ग्रामपंचायत विभागाने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ नरेश गिते यांच्या मार्गदर्शनाखाली माहिती संकलनासाठी विविध विषयांचे प्रपत्र तयार केले आहेत. सदरचे प्रपत्र  गुगल एक्सलशीटवर टाकण्यात आले असून प्रत्येक ग्रामपंचायतीने संगणक परीचालकाच्या मदतीने सदरचे प्रपत्र भरावयाचे आहे. सदरचे प्रपत्र भरल्यावर ग्रामपंचायत तसेच तालुकानिहाय माहिती उपलब्ध होणार असून आढावा घेण्यासाठी तसेच ग्रामपंचायतीमधील कामाची प्रगती कळण्यासाठी याचा उपयोग होणार आहे.
           यामध्ये घरपट्टी, पाणी पट्टी वसूली, किरकोळ मागणी, कर वसूली,  जिल्हा ग्राम निधी /कर्ज,  मासिक सभा, महिला व ग्रामसभा , सदस्य रिक्त पद, नविन निवडणूक माहीती , टि.सी. एल. पाणी पुरवठा स्त्रोत,  लेखापरिक्षण शक पुर्तता, अफरातफर अहवाल, 14 वित्त पंच वार्षिक आराखडा आदि महत्वाच्या विषयांचा समावेश आहे.
          दरम्यान आज घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत आपले सरकार अंतर्गत सुविधा व पेपरलेस काम, लेखापरीक्षण अहवाल आदि विषयांचा आढावा घेण्यात आला. बैठकीस ग्रामपंचायत विभागाचे सहायक गट विकास अधिकारी, आपले सेवा केंद्राचे जिल्हा व्यवस्थापक तसेच तालुक्यातील विस्तार अधिकारी (ग्रामपंचायत), तालुका व्यवस्थापक आदि उपस्थित होते.
---------------------------------------------------
      माहिती मिळणे सुलभ होईल – राजेंद्र पाटील,
           जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ नरेश गिते यांच्या मार्गदर्शनातून जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीची माहिती एकत्रित संकलित करता यावी यासाठी ग्रामपंचायत विभागाकडून गुगल एक्सलशीटचा वापर करण्यात येणार आहे. यासाठी विविध विषयांचे प्रपत्र तयार करण्यात आलेली आहेत. याबाबत तालुका तसेच ग्रामपंचायत स्तरावर सूचना देण्यात आल्या असून सदरचे प्रपत्र भरण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले आहे. पेपरलेस काम व्हावे तसेच विविध विषयांची माहिती तत्काळ उपलब्ध व्हावी यासाठी गुगल एक्सलशीटचा उपयोग होणार असल्याची माहिती ग्रामपंचायत विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद पाटील यांनी सांगितले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

निवडणूक लढवायची तर आधी शपथ घ्यावी लागते !

स्त्री आत्मनिर्भर बनल्यास समाजाचा विकास होईल-पद्मश्री नीलिमा मिश्रा ! गटशिक्षण अधिकारी हेमंत बच्छाव व शिक्षण विस्तार अधिकारी शीतल कोठावदे यांना रोटरी वोकेशनल सर्विस अवार्ड प्रदान !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।