मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत ९ कोटी २२ लाखाची कामे मंजूर !!! लवकरच निविदा काढून कामांना सुरूवात !!! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!



छगन भुजबळ यांच्या प्रयत्नामुळे...
 

      मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून येवला मतदार संघातील कामे मंजूर !


         नाशिक, येवला, दि.३ जुलै:- माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नातून मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा १ मधून येवला तालुक्यातील प्ररामा २ अंगणगाव ते चिचोंडी - साताळी भिंगारे-मुखेड ते तालुका बॉर्डर इतर जिल्हा मार्ग क्र.१२ व प्ररामा ८ बाभूळगाव खु. ते नांदूर धामोडे-कुसमाडी-न्यायगव्हाण इतर जिल्हा मार्ग क्र.१६ या दोन रस्त्यांची दर्जोन्नती करण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे.
            राज्यातील वाड्या-वस्त्यांना जोडणाऱ्या रस्त्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ करण्यासह सध्या असलेल्या रस्त्यांचा दर्जा वाढविण्यासाठी मोठ्या प्रमाणात कामे करणे आवश्यक असल्याने प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या धर्तीवर राज्यात मुख्यमंत्री ग्रामसडक योजना राबविली जात आहे. छगन भुजबळ यांच्या प्रयत्नामुळे मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा १  मधून येवला मतदारसंघासाठी रु. ९ कोटी ७७ लक्षच्या दोन रस्त्यांच्या दर्जोन्नतीला मंजुरी मिळाली आहे.
         सदर मंजूर झालेल्या रस्त्यांमध्ये येवला तालुक्यातील प्ररामा २ अंगणगाव ते चिचोंडी-साताळी भिंगारे-मुखेड ते तालुका बॉर्डर इतर जिल्हा मार्ग क्र. १२ या रस्त्यासाठी ७ कोटी तर प्ररामा ८ बाभूळगाव खु. ते नांदूर धामोडे-कुसमाडी-न्यायगव्हाण इतर जिल्हा मार्ग क्र.१६ या दोन रस्त्यांसाठी २ कोटी ६ लक्ष रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. असा एकूण ९ कोटी २२ लक्ष रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. या रस्त्यांची दर्जोन्नती पूर्ण झाल्यानंतर पुढील ५ वर्ष नियमित देखभाल व दुरुस्ती करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून येवला मतदार संघात मंजूर झालेल्या रस्त्यांच्या कामाची निविदा प्रक्रिया करून लवकरच कामांना सुरुवात होणार आहे.  

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इशरे नाशिक शाखेच्या नवीन कार्यकारिणीने केले पदग्रहण !

"राजकारण गेलं मिशीत" या चित्रपटात उद्धव भयवाळ यांची लावणी !

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।