"काय झालं कळंना" हे सारे २० जुलैला कळायला हवे ना ? मग बघूयाच !! कथानकाबाबत थोडक्यात माहीतीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

"काय झालं कळंना" २० जुलैला कळलेच पाहीजे !
पहिल्या प्रेमाची अनुभूती कधी स्वर्गसुख तर कधी विरह वेदना देते, या गुतगुंतीच्या विषयाची जाणीव 'श्री धनलक्ष्मी प्रोडक्शन' निर्मित "काय झालं कळंना" या चित्रपटाच्या माध्यमातून २० जुलैला प्रदर्शित सिनेमातून बघायला हवी,
      शरद आणी पल्लवी या दोन प्रेमवीरंची कथा , यांत कुणाचं प्रेम अडचणीचा सामना करतं, कुणाचं सहजतेने यशस्वी होते, कुणाला मिळत नाही अशा अडीच अक्षरी प्रेम ह्या शब्दाला मध्यबिंदू ठेवून कथेची मांडणी करण्यात आली आहे.
     प्रेमासाठी काहीही करण्याची तयारी असणाऱ्या शरद आणी पल्लवी यांच्या आयुष्यांत घडणाऱ्या घटनांनंतर त्यांच्या प्रेमाला काय दिशा मिळते, या वळणात्मक कथेत पुढे काय बघायला मिळेल हे गुलदस्त्यातील रहस्य असुन हा रहस्यमय सिनेमा नसुन प्रेमपट आहे.
        प्रेमातील चांगले वाईट बारकावे दाखवितांना जगण्यातील नवा अर्थ उलगडून दाखविण्याचा प्रयत्न केला आहे,
        गिरिजा प्रभू व स्वप्निल काळे या नुकत्याच बारावी झालेल्या वयात आलेल्या दोघांनी रूपेरी पडद्यावर पदार्पण केले आहे. सोबत अरूण नलावडे, संजय खापरे, वंदना वाकनीस, कल्पना जगताप, श्रद्धा सुर्वे, हेमाली कारेकर, सुयश झुंजुरके, रवी फलटणकर, यांच्या या चित्रपटात भूमिका आहेत,  यांत 'काय झालं कळंना'. 'टकमक टकमक' . ' रूतला काटा' , 'फुटला टाहो', 'चंद्रकोर' . अशी सुमधुर पाच गाणी आहेत. संवाद लेखन राहुल मोरे व सुचिता शब्बीर, न्रुत्य दिग्दर्शन सुचिता शब्बीर व सुजीत कुमार यांच तर छायाचित्रण सुरेश देशमाने यांचं आहे, चित्रपटाच्या कार्यकारी निर्मात्याची जबाबदारी शब्बीर पुनावाला यांनी सांभाळली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

८४ अनुकंपा कर्मचाऱ्यांचे समायोजन !

जागतिक फार्मासिस्ट दिवस विशेष एसएमबीटी फार्मसीच्या विद्यार्थ्यांची ‘अशीही’ सामाजिक बांधिलकी !

विजयादशमीला शिवप्रताप गरूडझेप ! ‘पहिले ते हरिकथा निरुपण, दुसरे ते राजकारण, तिसरे ते सावधपण सर्वाविषयी’ !!