मुलांमधील कलागुणांना इकोफ्रेंडलीची सांगड ! अठरा वर्ष बंद कारखाण्याचे दरवाजे कला प्रदर्शनासाठी खुले !! नानासाहेब शेंडकरांच्या "उत्सवी" च्या इकोफ्रेंडली गणेश मखरांचे भव्य प्रदर्शन नगर व मुंबई नंतर सर्व शहरांमध्ये करण्याचे आयोजन !!! एकवेळ भेट देण्याचे आयोजकांकडून आवाहन !!!! गणेश भक्तांनी सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!!
१८ वर्षे बंद कारखान्याचे दरवाजे कला प्रदर्शनासाठी खुले! ‘ उत्सवी ’च्या विविध इकोफ्रेंडली मखरांचे भव्य प्रदर्शन! मुलांमधल्या कलागुणांना इकोफ्रेंडली सांगड! कलेला प्रोत्साहन देण्यासाठी नानासाहेब शेंडरांचे पुढचे पाऊल! नगर व मुंबईत प्रदर्शन सुरु! लवकरच इतर शहरांमध्येही प्रदर्शने भरणार! नानासाहेब शेंडकरांनी अहमदनगर जिल्ह्यातल्या‘लोणी-मावळा’ गावातील थर्माकोल मखर निर्मितीच्या कारखान्याला १८ वर्षांपूर्वी कायमचे टाळे ठोकले होते, पण आता या वास्तूमध्ये त्यांनीच निर्माण केलेल्या नव्या युगाची साथ करणाऱ्या भव्य इकोफ्रेंडली मखरांचे कलाप्रदर्शन विद्यार्थी व कलाप्रेमींसाठी त्यांच्या ‘उत्सवी’संस्थेने भरविले आहे. या प्रदर्शनात मांडलेल्या सर्व कलाकृती शुद्ध ‘इको फ्रेंडली’असून संपूर्ण जगाला भेडसावणाऱ्या पर्यावरणाचा प्रश्न कायमस्वरूपी निकालात काढण्याच्या उद्देशाने शालेय जीवनापासुन मुलांमध्ये हे बीज रुजावे तसेच त्यांच्यातील कलागुणांना वाव मिळावा या उदात्त हेतूने नानासाहेब शेंडकरांनी ही वास्तूप्रदर्शनाच्या निमित्ताने खुली केली आहे. कागदी पुठ्ठ्यांपासून निर्मिती के