पोस्ट्स

महाराष्ट्रियन विद्यार्थ्यांच्या कोट्यातील जागांच्या अधिवास प्रमाणपत्राद्वारे होतात चोऱ्या ! याबाबत राज्य सरकारने त्वरीत आपले धोरण जाहीर करावे--तुषार जगताप !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
नासिक::-महाराष्ट्रीयन विद्यार्थ्यांच्या कोट्यातील जागांच्या चोऱ्या थांबविण्यासाठी  अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate) मिळण्याबाबतचे धोरण राज्य सरकारने त्वरित जाहीर करावे असे आवाहन तुषार जगताप यांनी केले आहे. महाराष्ट्र राज्याची निर्मिती 1 मे 1960 साली होऊन आजपर्यंत राज्याने अधिवास ठरविणेसाठी स्वतंत्र धोरण घोषित केलेले नाही. त्यामुळे जुन्याच धोरणानुसार अधिवास प्रमाणपत्र देण्यात येते. केवळ 10 वर्षाच्या वास्तव्यावर परराज्यातील लोंकाना राज्यात सद्या अधिवास प्रमाणपत्र देण्यात येते.  अधिवास प्रमाणपत्र देताना नोकरी, शिक्षण, कारावास यांचे वास्तव्य गणले जात नाही. सद्या राज्यात बाहेरुन आलेल्या व्यक्तीचा नोकरीसाठीचा रहिवास सरसकट गणला जाऊन केवळ त्यांनी राज्यात घर खरेदी केले , घराच्या मिळकतीचे कर, लाइटबिल, यासारखे 10 वर्षाचे पुरावे पाहून “त्याना पसंतीनुसार मागणी अधिवास (Domicile By Choice)  प्रमाणपत्र देण्यात येते. या लोंकानी मुळ राज्याचे अधिवास प्रमाणपत्र सोडल्यावाबत कोणतीही खात्री केली जात नाही. -खरेतर असे पसंतीनुसार अधिवास प्रमाणपत्र घेणार्‍या व्यक्तींनी मुळ राज्यातील आपले घर, शेती, ज

गोबर व रूबेला आजार २०२० पर्यंत निर्मुलनाचे केंद्र शासनाचे उद्दीष्ट ! जिल्ह्यात लसीकरण कार्यक्रम राबविणार ! आरोग्य विभागाला जनजाग्रुतीचे डाँ.गिते यांचे निर्देश !!! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!!

इमेज
नाशिक : केंद्र शासनाने सन २०२० पर्यंत गोबर व रुबेला आजाराचे निर्मुलन करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यानुसार नाशिक जिल्ह्यात आरोग्य विभागाच्या वतीने गोबर व रुबेला लसीकरण कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.नरेश गिते यांनी दिली. या मोहिमेत ९ महिने ते १५ वर्ष या वयोगटातील मुलांचे लसीकरण करण्यात येणार आहे. केंद्र शासन गोबर व रुबेला यासाठीची लस विविध राज्यामध्ये नियमित लसीकरण कार्यक्रमात समाविष्ट करीत आहे. त्यानुसार महाराष्ट्रातही नोव्हेंबर महिन्यात लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत नाशिक जिल्ह्यातील ९ महिने ते १५ वर्ष या वयोगटातील मुलांचे लसीकरण केले जाणार आहे. यासाठी २४ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय सुकाणू समितीची सभा आयोजित करण्यात आली असून यामध्ये जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग, महानगरपालिका, नगरपालिका, ग्रामीण रुग्णालय, जागतिक आरोग्य संघटना प्रतिनिधी आदि उपस्थित राहणार आहेत. तसेच २८  ऑगस्ट रोजी जिल्हा परिषदेच्या रावसाहेब थोरात सभागृहात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या

४३ वैद्यकीय अधिकाऱ्यांना पुर्ननियुक्तीचे आदेश तयार करण्याचे आले !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
नाशिक : जिल्हा परिषद नाशिक अंतर्गत आरोग्य विभागात अस्थायी स्वरुपात कार्यरत असलेल्या ४३ वैद्यकीय अधिकाऱ्यांना पुर्नानियुक्ती देण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ नरेश गिते यांनी दिली. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागांतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्रात अस्थायी स्वरुपात वैद्यकीय अधिकारी नियुक्त करण्यात येतात. यातील ४३ वैद्यकीय अधिकाऱ्यांची मुदत संपली होती. सध्या पावसाळा सुरु असल्याने ग्रामीण भागात वैद्यकीय सुविधा पुरविणे गरजेचे असल्याने डॉ गिते यांनी तातडीने निर्णय घेत त्यांना पुर्ननियुक्ती दिली असून आज त्याबाबतचे आदेश तयार करण्यात आले.

धनगर समाजासाठी अभिमानास्पद क्षण-महापौर संगिता खोत ! सविस्तर बातमीसाठी खालील लिकवर क्लिक करा !!

इमेज
सांगली::-सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेत प्रथमच धनगर समाजाची एक कर्तुत्ववान महिला सौ. संगिता खोत या महापौरपदी विराजमान झाल्या आहेत. भारतीय लोकशाहीचा हा विजय असुन या प्रणालीला आणखी बळकटी प्राप्त झाली आहे असे मत सौ. खोत यांनी महापौर पदावर विराजमान झाल्यानंतर व्यक्त केले. ही घटना खरोखर धनगर समाज बंधू - भगिनींसाठी अभिमानास्पद आहे. समस्त सांगली कुपवाड व मिरज मधील धनगर मतदारांचे कौतुक करतांनाच इतर समाजांतील मतदारांनीही  तब्बल १३ नगरसेवक धनगर समाजाचे निवडून आणले त्यांचेही आभार मानावे तितके कमीच आहेत.       ही लोकशाही प्रक्रीयेची खरी ताकद मतदारांनी दाखवून  दिली हा माझ्यासाठी व धनगर समाजासाठी अभिमानास्पद क्षण असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

अजित वाडेकर-परदेशांत प्रथमच कसोटी मालिका जिंकून देणारे नेत्रुत्व काळाच्या पडद्याआड,,

इमेज
माजी क्रिकेटर अजित वाडेकर यांचं निधन ! माजी भारतीय क्रिकेटर अजित वाडेकर यांचं वयाच्या ७७ व्या वर्षी मुंबईतील जसलोक इस्पितळात निधन झाले, १९७१ ला वेस्ट इंडीज व इंग्लंड दौऱ्यात कसोटी मालिका जिंकुन देणारे पहिले कर्णधार, त्यांच्या नेत्रुत्वात प्रथमच परदेशातील धांवपट्टीवर भारताला कसोटी मालिका जिंकण्याचा मान प्राप्त झाला होता,

स्वातंत्र्य दिन विशेष लेख, शिक्षकांनी मुलांना शिस्त लावावी हे त्यांच कामच आहे मात्र अट्टाहास नसावा ! खरं तर मुलांना जास्त शिस्तीची पाहीजे तेव्हढी गरज नाही, धर्माच्या चालीरीतीत त्याना लहानपणापासुन कोंडुन ठेवू नये !! अंकुश शिंगाडे यांचा "पुन्हा देश स्वतंत्र करावा लागणार नाही" हा लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
स्वातंत्र्यदिन विशेष पुन्हा एकदा देश स्वतंत्र्य करावा लागणार नाही ! अंकुश शिंगाडे यांजकडून(संस्कार), यां लेखांतील विषय हा लेखकाचे संस्कार लेखमालेतील मनोगत आहे, सर्वच शिक्षकांबद्दल असे मत नाही, प्रासंगिक लिखाण असुन गैरसमज नसावा,                                              लेखक, अंकुश शिंगाडे.                       शिक्षक शिस्त लावतात की मानसिक त्रास देतात ते आता कळेनासे झालेय.विद्यार्थी शिकला पाहिजे.त्याने ज्ञानाचे बाळकडु प्याले पाहिजे असे आपण म्हणतो.त्याला शिस्तही लागली पाहिजे असेही आपण म्हणतो.पण शिस्त काही दोन मिनिटात लागणारी गोष्ट नाही.शिस्त लावतांना कोणताही त्रास देवु नये.       एका शाळेची गोष्ट सांगतो.पंधरा आँगष्टचा कार्यक्रम अगदी आठ दिवसावर येवुन ठेपला होता.मुलांजवळ शालेय गणवेश होता.पण जोडे मोजे नव्हते.तसेच काही मुलींनी रिबीनही बांधलेल्या नव्हत्या.कपाळावर काही मुलींनी टिकल्या लावलेल्या नव्हत्या.तर काही मुलींच्या हातात बांगड्याही नव्हत्या.काहींच्या पायात तर साधी चप्पलही नव्हती.बहुतेक त्यांच्या घरची परिस्थिती बरोबर नसेल कदाचित.त्यामुळे त्यांच्या पायात चप्पल नसेल असेही वाटत होते.

"टेक केअर गुड नाइट" ! सायबर गुन्हेगाराविरोधात शहरी कुटुंबाचा लढा !! दीनानाथ यांजकडून खास न्यूज मसालाच्या रसिकांसाठी , वाचा खालील लिंकवर क्लिक करून !!!

इमेज
  दीनानाथ यांजकडून [ मनोरंजन प्रतिनिधी ]    ‘टेक केअर गुड नाइट’ (टीसीजीएन) ह्या बहुप्रतीक्षित मराठी चित्रपटाचा ट्रेलर मुंबईत प्रदर्शित ३१ ऑगस्ट रोजी संपूर्ण महाराष्ट्रात होणार प्रदर्शित ,             एव्हरेस्ट एंटरटेन्मेंट आणि एस पी एंटरटेन्मेंट यांची प्रस्तुती असलेला नवीन मराठी चित्रपट ‘टेक केअर गुड नाईट’ या चित्रपटाचा ट्रेलर अभिनेता सचिन खेडेकर, महेश मांजरेकर, इरावती हर्षे, आदिनाथ कोठारे आणि पर्णा पेठे या चित्रपटातील कलाकारांच्या प्रमुख उपस्थित  प्रदर्शित करण्यात आला. यावेळी या चित्रपटाचे दिग्दर्शक गिरीश जयंत जोशी हे सुद्धा उपस्थित होते. गिरीश जयंत जोशी यांचे दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटाची निर्मिती हिमांशू केसरी पाटील आणि महेश मांजरेकर यांनी केली असून नरेंद्र भिडे यांनी त्याला संगीत दिले आहे.‘टेक केअर गुड नाईट’ चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात ३१ ऑगस्ट २०१८ रोजी प्रदर्शित होणार आहे.             या चित्रपटाची कथा ही एका शहरातील कुटुंबाची असून या कुटुंबाने आपले स्थैर्य आणि सन्मान यासाठी एका सायबर गुन्हेगाराविरोधात दिलेला लढा यात रेखाटला गेला आहे. हा लढा देताना  या कुटुंबाला अनेक समस