"टेक केअर गुड नाइट" ! सायबर गुन्हेगाराविरोधात शहरी कुटुंबाचा लढा !! दीनानाथ यांजकडून खास न्यूज मसालाच्या रसिकांसाठी , वाचा खालील लिंकवर क्लिक करून !!!

 

दीनानाथ यांजकडून [ मनोरंजन प्रतिनिधी ]   

‘टेक केअर गुड नाइट’ (टीसीजीएन) ह्या बहुप्रतीक्षित मराठी चित्रपटाचा ट्रेलर मुंबईत प्रदर्शित

३१ ऑगस्ट रोजी संपूर्ण महाराष्ट्रात होणार प्रदर्शित,
            एव्हरेस्ट एंटरटेन्मेंट आणि एस पी एंटरटेन्मेंट यांची प्रस्तुती असलेला नवीन मराठी चित्रपट ‘टेक केअर गुड नाईट’ या चित्रपटाचा ट्रेलर अभिनेता सचिन खेडेकर, महेश मांजरेकर, इरावती हर्षे, आदिनाथ कोठारे आणि पर्णा पेठे या चित्रपटातील कलाकारांच्या प्रमुख उपस्थित  प्रदर्शित करण्यात आला. यावेळी या चित्रपटाचे दिग्दर्शक गिरीश जयंत जोशी हे सुद्धा उपस्थित होते. गिरीश जयंत जोशी यांचे दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटाची निर्मिती हिमांशू केसरी पाटील आणि महेश मांजरेकर यांनी केली असून नरेंद्र भिडे यांनी त्याला संगीत दिले आहे.‘टेक केअर गुड नाईट’ चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात ३१ ऑगस्ट २०१८ रोजी प्रदर्शित होणार आहे.
            या चित्रपटाची कथा ही एका शहरातील कुटुंबाची असून या कुटुंबाने आपले स्थैर्य आणि सन्मान यासाठी एका सायबर गुन्हेगाराविरोधात दिलेला लढा यात रेखाटला गेला आहे. हा लढा देताना  या कुटुंबाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. यातील वडिलांना बदलत्या तंत्रज्ञानाचे धडे घेत तंत्रज्ञानाबद्दलचे त्यांचे अज्ञान दूर करून घ्यावे लागते. आपल्या समुपदेशन कौशल्यावर बसलेली धूळ पुसत त्याचा वापर यातील आईला याकामी करून घ्यावा लागतो. आपल्या आई वडीलांबरोबरचा संवादाचा तुटलेला धागा यातील मुलीला पुन्हा जोडावा लागतो. कथेमध्ये मग या सर्व गोष्टी पुढे येतातच पण त्याचबरोबर आजच्या तंत्रज्ञानाने व्यापलेल्या जीवनशैलीचे अनेक पैलूही उलगडत जातात

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इशरे नाशिक शाखेच्या नवीन कार्यकारिणीने केले पदग्रहण !

"राजकारण गेलं मिशीत" या चित्रपटात उद्धव भयवाळ यांची लावणी !

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।