स्वातंत्र्य दिन विशेष लेख, शिक्षकांनी मुलांना शिस्त लावावी हे त्यांच कामच आहे मात्र अट्टाहास नसावा ! खरं तर मुलांना जास्त शिस्तीची पाहीजे तेव्हढी गरज नाही, धर्माच्या चालीरीतीत त्याना लहानपणापासुन कोंडुन ठेवू नये !! अंकुश शिंगाडे यांचा "पुन्हा देश स्वतंत्र करावा लागणार नाही" हा लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

स्वातंत्र्यदिन विशेष

पुन्हा एकदा देश स्वतंत्र्य करावा लागणार नाही !

अंकुश शिंगाडे यांजकडून(संस्कार), यां लेखांतील विषय हा लेखकाचे संस्कार लेखमालेतील मनोगत आहे, सर्वच शिक्षकांबद्दल असे मत नाही, प्रासंगिक लिखाण असुन गैरसमज नसावा,                                              लेखक, अंकुश शिंगाडे.

                      शिक्षक शिस्त लावतात की मानसिक त्रास देतात ते आता कळेनासे झालेय.विद्यार्थी शिकला पाहिजे.त्याने ज्ञानाचे बाळकडु प्याले पाहिजे असे आपण म्हणतो.त्याला शिस्तही लागली पाहिजे असेही आपण म्हणतो.पण शिस्त काही दोन मिनिटात लागणारी गोष्ट नाही.शिस्त लावतांना कोणताही त्रास देवु नये.

      एका शाळेची गोष्ट सांगतो.पंधरा आँगष्टचा कार्यक्रम अगदी आठ दिवसावर येवुन ठेपला होता.मुलांजवळ शालेय गणवेश होता.पण जोडे मोजे नव्हते.तसेच काही मुलींनी रिबीनही बांधलेल्या नव्हत्या.कपाळावर काही मुलींनी टिकल्या लावलेल्या नव्हत्या.तर काही मुलींच्या हातात बांगड्याही नव्हत्या.काहींच्या पायात तर साधी चप्पलही नव्हती.बहुतेक त्यांच्या घरची परिस्थिती बरोबर नसेल कदाचित.त्यामुळे त्यांच्या पायात चप्पल नसेल असेही वाटत होते.
       भारत १९४७ ला स्वातंत्र्य झाला खरा.....आज एवढी वर्ष झाली खरी......पण आजही भारताची परिस्थिती फारशी सुधारलेली नाही.आजही मायबाप काबाडकष्ट करतात.यात कधी त्यांच्या हाताला काम असतं तर कधी काम नसतं.पावसाळ्याचे तर चार महिने उपासतापास भोगतच काढावे लागतात.त्यातच आपली मुले शाळेत गेली पाहिजे.त्यांना कोणी काहीही म्हणु नये.म्हणुन पालकवर्ग आपल्या पाल्यावर अतोनात पैसा खर्च करीत असतात.पण पैसा आहे तोपर्यंत ठीक आहे.पण जिथे साधी वितभर असलेली पोटाची खळगी भरता येत नाही.तिथे शालेय गणवेश,गंध टिकल्या,बांगड्या,रिबीना ह्या गोष्टी पालक कुठून पुर्ण करणार?
         शहरातील मुलांचं ठीक आहे.पण जिथे अति दुर्गम भाग आहे.त्या भागात मात्र हीच परिस्थिती अनुभावयास मिळते.आम्ही शिकलो.मोठे झालो.योगायोगानं नोक-या लागल्या.कोणी डाँक्टर इंजिनियर बनला तर कोणी शिक्षक.कोणी उद्योजक......आम्ही आमची परिस्थिती सुधरवली.पण जे डाँक्टर इंजिनियर शिक्षक बनले खाजगी आस्थापनेत.मला नाही वाटत त्यांनी गरीबी अनुभवली असेल.आजही डाँक्टर इंजिनियर बनतांना लाखो रुपये खर्च करावा लागतो.तो पैसा श्रीमंत पालकच लावु शकतो.खाजगी शाळेतही नोकरी मिळवितांना लाखो रुपये डोनेशन म्हणुन द्यावा लागतो.हाही पैसा श्रीमंत पालकांनीच आपल्या पाल्यांना नोकरीला लावतांना खर्च केलेला असतो.अशावेळी ही शाळेत शिक्षक म्हणुन शिकविणारी मंडळी त्यांनी गरीबी न भोगलेली असल्याने त्यांना गरीबीची जाणीवच नसते.त्यांना मायबापाच्या घरीही गरीबी भोगावी लागली नाही तसेच आता नोकरी लागल्यावरही गरीबी भोगावी लागत नसल्याने गरीबी कशी असते याचा साधा विचारही ते शिक्षक करीत नाही.म्हणुनच ते शिस्त लावतांना रिबीनी,कुंकू बांगड्या जोडे मोजे.पांढरे प्रेस केलेले कपडे याचा अट्टाहास करीत असतात.त्यातच काही मुलांनी पैशाअभावी ह्यापैकी एखादी वस्तु वापरली नसेल तर त्या मुलांना शाळेत मानसिक व शारीरिक त्रास दिला जातो.त्यांना छडीचा वापर बंद केलेला असुनही हातावर छड्या मारल्या जातात.ती निरागस मुले हे शिक्षकांचे मारणे बोलणे आपल्या आईवडीलांना सांगतात,पण ते हतबल असतात.त्यातच घरी विश्वकोटीचं दारिद्य असल्याने व मायबाप घेवुन देवु शकत नसल्याने व शिक्षकांचे सतत त्रास देणे सुरु असल्याने मुले हतबल होवुन आत्महत्या करतात.पण आधीच गरीब असलेली ही पालकमंडळी त्या मृत्युवर न्याय मागु शकत नाही.साधी पेपरला अशी घटना छापुन येत नाही वा पोलिस स्टेशनलाही त्या घटना जात नाहीत आणि एखादी घटना गेलीच पोलिस स्टेशनला तर शालेय प्रशासनातील सर्व घटक हे पुढे होवुन अशा घटना दाबुन टाकतात.ही वास्तविकता आहे.
          सर्व  विद्यार्थी शिकले पाहिजे.ते पुढे गेले पाहिजे म्हणुन सरकारने अलिकडे शिक्षण निःशुल्क केलं.वेगवेगळ्या शिष्यवृत्तीसारख्या योजनाही आणल्या.पण तरीही समाजातुन आजही सर्व विद्यार्थ्यांना शिकता येत नाही.त्याचं कारण एक हेही आहे.
         जो देश स्वातंत्र्य होवुनही आत्मनिर्भर झाला नाही,त्या देशात सर्व विद्यार्थ्यांनी शिकलं पाहिजे हे ठीक आहे.पण शिस्तीच्या नावावर व शिक्षणाच्या नावावर विद्यार्थ्यांची आर्थीक पिळवणुक करणे,त्यांना मानसिक व शारीरिक त्रास देणे.आजही छडीचा वापर करणे.कितपत बरोबर आहे.
         विद्यार्थी शिकतात.त्यांचीही शिकण्याची इच्छा असते.पण त्यांच्या शिक्षणावर मद्याचाही असर होतो.देशात आजही दारुबंदी नाही.घरी त्यांचा बाप मायचे दागीणे चोरुन वा घरचे सामान विकुन कामाला न जाता दारु पितो.आई हतबल.नशिबाला दोष देत देत त्याच्याजवळ दिवस काढीत असते.ती कामाला तर जाते.पण तिच्याजवळ पैसे नसल्याने ती देखील मुलांना चपला कुठून घेवुन देईल?त्यातच जोड्यामोज्याचे दर फार जास्त असतात.
       शिक्षकांना शिस्तच लावायची असेल तर खिचडीसोबत शासनाने रिबीनी,जोडे,मोजे,टिकली वा गंध,तसेच गणवेशही देण्याची गरज आहे.मुलांना आपोआपच शिस्त लावता येईल.पण आजचा आमचा शिक्षक एवढा मतलबी झालाय की तो मिळालेल्या पैशातुन यात्रा करेल.संचालकांना त्याचं घर भरण्यासाठी पैसा देईल.नव्हे तर आपले शौकं पुर्ण करतील.पण ज्या विद्यार्थ्यांवर त्यांचं भविष्य चालतं.ते पगार कमवतात.त्या विद्यार्थ्यांना वरील वस्तुसाठी त्रास देतील.पण त्या वस्तु पुरवणार नाहीत.
        मुले जेव्हा वयात येतात.तेव्हा त्यांच्यात आपोआपच शिस्त लागते.ती शिस्त कोणी लावावी लागत नाही.बाजुची मुले परिसरातील मुले,महाविद्यालयातील मुले ह्या घटकांना जेव्हा ही मोठी झालेली मुले जेव्हा पाहतात.तेव्हा मात्र त्यांच्या स्वतःच्या राहणीमानाबद्दल वैषम्य वाटतं.ती आपोआपच स्वतःला सुधारणेच्या कक्षेत आणतात.
       शिक्षकांनी शिस्त लावावी.ते त्यांचं कामच आहे.पण त्यासाठी आपल्या विद्यार्थ्यांना अट्टाहास करायला नको.त्यांनी गंध बांगड्या,जोडे मोजे ही काहीही करुन वापरलीच पाहिजे यासाठी बंधन करु नये.त्यासाठी छडीचा वापरही करु नये वा धाक देवु नये.तर या विद्यार्थ्यांना हळुवार प्रेमाने समजुन सांगावे.प्रेमानं तर जग जिंकता येतं.ही मुले का बरं नाही सुधारणार!पण त्यासाठी वेळ द्यायला हवा ना.ती परिस्थीतीही पाहायला हवी की नाही. परिवर्तन काही एका दिवसात होणार नाही.होत नाही.अन् परिवर्तनच एका क्षणात हवं तर त्याप्रकारची शासनानं सोय करावी वा साधनं उपलब्ध करुन द्यावीत.रोज रोज शाळेत उशिरा येणारा मुलगा त्याला दररोज उशिर होतो हे आपल्याला दिसते.पण बाप मरुन गेल्यानंतर आई अंथरुणाशी खिळलेली असतांना घरातील सारी कामं करुन,आईला घास भरपुर तो शाळेत येतो.त्यामुळं त्याला उशिर होतो.या गोष्टी आम्ही समजुनच घेत नाही.खरं तर या गोष्टी समजण्यासाठी शिक्षकांनाच समुपदेशनाची गरज आहे.त्याशिवाय खरे विद्यार्थी घडणार नाही.घडविता येणार नाही.भारत स्वातंत्र्य झाला तरीही........
         प्रत्येक देशाचं भवितव्य या वर्गखोल्यातुन घडते.सर्वच श्रीमंताची मुलं ही डाँक्टर इंजिनियर बनतीलच असे नाही.एखाद्या शाळेत न जाणा-या गरीबांचीही मुले काहीतरी विलक्षण करुन जातात.मायकेल फँरेडे,लुई पाश्चर,थाँमस अल्वा एडीशन हे त्यापैकीच.ते कोणत्या शाळेत गेले शेवटपर्यंत.पण अनुभवाच्या जोरावर त्यांनी असं संशोधन केलं की ते आजही आठवतात.त्यांना काय शिस्तीची गरज होती!त्यांच्या आईवडीलांनी त्यांना शिस्त लावली होती!नाही.असे जर असते तर स्वतःचं नुकसान करु नये हे सर्वांना समजते.पण तरीही दिव्याचा शोध लावण्यासाठी एडीशनने आपल्या घरच्या उभ्या धानाच्या गंजीलाच आग लावली होती.बापाने त्यावर घरातुन हाकलुन दिल्यावरही एडीशनने आपला छंद बंद केला नाही उलट रेल्वे डब्यात वास्तव्य करीत असतांना वर्तमानपत्र विकुन पोट भरीत असतांना विजेच्या दिव्याच्या अट्टाहासाने पिवळा फाँस्फरस डब्यात सांडुन रेल्वेला आग लागली होती.
       रेल्वे आपली असुन ज्वालाग्राही पदार्थ नेवु नये.गुटखा खावु नये,दारु पिवु नये.ह्या वाईट सवयी.चांगल्या सवयी नाहीत.ह्या गोष्टी मुलांमध्ये बालपणापासुन मायबाप, परिसर,तसेच शिक्षकही बिंबवीत असतात.पण मोठे झाल्यावर त्या पुड्यांवर कँन्सर होतो हे लिहिलेले असतांनाही मुले गुटखा खातातच.
        खरं तर मुलांना शिस्तीची पाहिजे तेवढी गरज नाही.धर्माच्या चालीरितीत त्यांना लहाणपणापासुनच कोंडुन ठेवु नये.त्यांनाही परिवर्तनाच्या कक्षेत येवु द्यावे.टिकल्या लावणे,रिबीन बांधणे ह्या परिवर्तन तोडणा-या गोष्टी.तर केसांना वलय देणे,टिकल्या न लावणे ह्या परिवर्तन वादी गोष्टी.आज जमाना बदललाय.पाश्चात्यांचं अनुकरण करण्याचा काळ.चांगलं दिसलं पाहिजे म्हणुन ह्या गोष्टीचा अट्टाहास.पण ज्यांच्याजवळ जवळ म्हणुन पैसा काहीच नाही त्यांचं काय?म्हणुन काय त्या मुलांना चोप द्यावा?ह्या गोष्टी कोणालाच पटत नाही.हवं तर मुलांना शिकवितांना त्यांच्या छंदाची प्रशंसा करा.मग पाहा त्या अळीचं किती सुंदर फुलपाखरु कसे बनतेय ते.......
          आम्ही जिथे दप्तराचं ओझं कमी करु शकत नाही तिथे काय त्यांना शिस्त लावणार! खरं तर आम्हाला शिकवायला त्रास वाटतो.म्हणुन आम्ही घरचा अभ्यास देवुन त्या विद्यार्थ्यात गोंधळ निर्माण करतो.त्याला बळीचा बकरा बनवतो.हे बरोबर नाही.विद्यार्थी हाही एक दीवाच आहे.कोणाच्या पोटचा गोळा.......त्याचा प्राणच.पण काय करता..त्या बाळाचं कधीकधी नशिबच फुटकं असतं.कधीकधी हाच बाप दारुसाठी सख्ख्या मुलीलाही विकुन टाकतो.असा आमचा समाज.याचा शिक्षकांनी तरी विचार करावा.विद्यार्थ्यांना शिस्त लावतांना त्रास देण्याची गरज नाही.हळुवार फुंकर मारायची गरज आहे.जेणेकरुन त्याची तर प्रगती होईल.देशाचाही विकास व्हायला वेळ लागणार नाही आणि पुन्हा एकदा देश स्वतंत्र्य करावा लागणार नाही.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

होय! मी नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती लिना बनसोड(भा.प्र.से.) यांच्याबद्दलच बोलतो आहे, लिहितो आहे.

८४ अनुकंपा कर्मचाऱ्यांचे समायोजन !

समग्र वारली चित्रसृष्टी प्रकल्पालासर्वतोपरी सहकार्य -ना. डॉ. गावित