कार्यारंभ आदेश आता जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर येणार ! ठेकेदार व पुरवठादारांनी कार्यालयांतील कर्मचाऱ्यांकडे जाऊ वा भेटू नये, अडचण असेल तर अधिकाऱ्यांना भेटून तक्रार नोंदवावी !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!
नाशिक – जिल्हा परिषदेच्या विविध विभागांमार्फत देण्यात येणारे कामाचे आदेश आता जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर टाकण्यात येणार असून याबाबतचे आदेश डॉ. नरेश गिते यांनी संबंधित विभागांना दिले आहेत. जिल्हा परिषदेच्या बांधकाम, लघु पाटबंधारे, ग्रामीण पाणीपुरवठा विभागांतर्गत विविध कामे करण्यात येतात. या विविध कामांचे कार्यारंभ आदेश पुरवठाधारकाबरोबरच सर्वसामान्य जनतेला उपलब्ध व्हावेत यासाठी जिल्हा परिषदेच्या zpnashik.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर सर्व आदेश प्रदर्शित करण्यात येणार आहेत. सन २०१७-१८ तसेच २०१८-१९ मधील सर्व कार्यारंभ आदेश टाकण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर कार्यारंभ आदेश नावाने टॅब तयार करण्यात आला असून त्यावर भेट दिल्यास सर्व विभागांमधील कार्यारंभ आदेश पाहता येणार आहेत. त्याचप्रमाणे सर्व पुरवठाधारकांना इ मेल व व्हॉटसअँपव्दारे कार्यारंभ आदेश देण्यात येणार असून यासाठी पुरवठाधारकांनी जिल्हा परिषदेशी संपर्क साधून संबंधित विभागांमध्ये आपली माहिती कळवावी असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी केले आहे. ------