१) बांधकामांसाठी प्रोजेक्ट मॅनेजमेंट सिस्टीम (पी.एम एस.) प्रणाली राबविण्यात येणार ! २) शाळा प्रवेशोत्सव सोहळ्याचे आयोजन !! ३) जिल्हयात ग्राम बाल विकास केंद्रे स्थापन करणार !!! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!

बांधकामांसाठी प्रोजेक्ट मॅनेजमेंट सिस्टीम (पी.एम एस.) प्रणाली राबविण्यात येणार
नाशिक – जिल्हा परिषद अंतर्गत सर्व विभागातील बांधकामांसाठी प्रोजेक्ट मॅनेजमेंट सिस्टीम (पी.एम एस.) प्रणाली राबविण्यात येणार असुन १ एप्रिल २०१९ पासून नाशिक जिल्हा परिषद अंतर्गत मंजूर असलेल्या सर्व विभांगांच्या सर्व योजनांची व कामांची देयके प्रोजेक्ट मॅनेजमेंट सिस्टीम मधून अदा करण्यात येणार आहे. याबाबत सर्व संबधित विभागांना सूचना देण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी सर्व दिली.
नाशिक जिल्ह्यात बांधकाम विभाग, लघु पाटबंधरे विभाग तसेच पाणीपुरवठा विभाग येथे प्रायोगिक तत्वावर राबविण्यात येत असलेल्या प्रोजेक्ट मॅनेजमेंट सिस्टीम (पी.एम एस.) प्रणालीमध्ये तांत्रिक दुरुस्ती करुन यापुढे मोजमाप पुस्तिकाही संगणकीकृत पध्दतीनेच करणेबाबत शासनाने मान्यता दिली आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शीतल सांगळे व बांधकाम सभापती मनीषा पवार यांच्या हस्ते मागील वर्षी जिल्ह्यात या उपक्रमास सुरवात झाली होती.
राज्याने या प्रकल्पासाठी प्रायोगिक तत्वावर नाशिक जिल्ह्याची निवड केली होती त्यानुसार जिल्हयात प्रायोगित तत्वावर अंगणवाडींच्या दुरुस्तीची काम करण्यात आली आहे. जिल्ह्यातील बांधकाम विभाग, लघु पाटबंधारे विभाग, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग यातील कार्यकारी अभियंता, उप अभियंता, शाखा अभियंता यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.
हा उपक्रम यशस्वी झाल्यास पेपरलेस कारभार होण्यास मदत होणार असून विविध फाईलींचा प्रवास यामुळे थांबणार असून विनाविलंब देयक अदा करता येणार आहे. शासनाने ग्रामीण पाणी पुरवठा, बांधकाम विभाग व लघु पाटबंधारे विभाग या प्रकल्पांसाठी कामाची मोजमाप पुस्तिका प्रोजेक्ट मॅनेजमेंट सिस्टीममधील संगणीकृत पध्दतीने राबविण्यास मान्यता दिली आहे. या सिस्टीममध्ये कोणत्या अभियंत्याने माहिती भरली त्याची माहिती समाविष्ट करणे, संबंधित अभियंत्याने माहिती भरल्यावर त्याची प्रिंट काढून मोजमाप पुस्तिकेत चिटकविणे, त्यानंतर शाईने प्रिंट आऊटवर चारही बाजुने तिरप्या रेषा मारुन सांक्षाकित करणे, प्रत्येक पानावर अभियंत्याने स्वाक्षरी करणे आदि सुचना देण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे कोणताही बदल करावयाचा झाल्यास तो सर्वप्रथम सिस्टीमवरच करावा शाईने करु नये अशाही सुचना देण्यात आल्या आहेत.
शाळा प्रवेशोत्सव सोहळ्याचे आयोजन
नाशिक : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या वतीने जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद शाळांमध्ये  शाळा प्रवेशोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. याच धर्तीवर दि. ११ ते ३० जून या कालावधीत अंगणवाडीतही प्रवशेात्सव सादर करण्यात येणार आहे.
१७ जून पासून शैक्षणिक वर्षास सुरवात होत असून जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या वतीने जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद शाळांमध्ये प्रवेशोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. ११ ते ३० जून या कालावधीत ६ ते १४ वयोगटातील सर्व मुलांना शाळेत दाखल करण्यासाठी पटनोंदणी पंधरवडा राबविण्यात येत आहे. शाळा व अंगणवाडी प्रवेशोस्तव राबविण्याबाबत  जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ नरेश गिते यांनी गट विकास अधिकारी, गट शिक्षण अधिकारी, बाल विकास प्रकल्प अधिकारी यांची बैठक घेवून याबाबत विविध सूचना केल्या.
शाळा व अंगणवाडी प्रवेशोस्तवासाठी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष  शितळ सांगळे, शिक्षण व बाधकाम सभापती यतींद्र पगार, महिला व बालविकास विभागाच्या सभापती अपर्णा खोसकर यांच्यासह सर्व पदाधिकारी व जिल्हा परिषद सदस्यांना आमंत्रित करण्यात येणार असुन त्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात येणार आहे. प्रवेशोस्तवासाठी जिल्हा परिषदेच्या सर्व खातेप्रमुखांना तालुक्यांचे वाटप करण्यात आले आहे.
जिल्हयात ग्राम बा विकास केंद्रे स्थापन करणार !
नाशिक - कुपोषणमुक्त महाराष्ट्रासाठी राज्य सरकारच्या धोरणानुसार ० ते ६ वयोगटातील तीव्र कुपोषित बालकांसाठी  नाशिक जिल्ह्यात यावर्षीही ग्राम बाल विकास केंद्रे स्थापन करण्यात येणार असून या केंद्रांमार्फत बालकांना अतिरिक्त आहार पुरवठा, वैद्यकीय देखरेख, पालकांचे पोषणविषयक समुपदेशन या पायाभूत गोष्टींवर भर देण्यात येणार आहे. यासाठी पुन्हा नव्याने बालकांचे सर्वेक्षण करण्यात येणार असून बालविकास व आरोग्य विभागाला याबाबतच्या सुचना देण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ नरेश गिते यांनी दिली.
जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शितल सांगळे, उपाध्यक्षा नयना गावित यांच्यासह जिल्हा परिषदेचे सर्व पदाधिकारी तसेच जिल्हा परिषदेचे सदस्यांच्या सहकार्याने जिल्हयात पुन्हा कुपोषण निर्मुलनासाठी काम करण्यात येणार आहे. मागील वर्षी जिल्ह्यातील सर्व तालुका आरोग्य अधिकारी, बाल विकास प्रकल्प अधिकारी, अंगणवाडी पर्यवेक्षिका यांच्यामार्फत तालुका व प्राथमिक स्तरावरील आशा कार्यकर्ती, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका, आरोग्य सेवक यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.
ग्राम बाल विकास केंद्र स्थापन करण्यासाठी पहिल्या टप्यात उपकेंद्रनिहाय बालकांच्या तपासणीचे नियोजन करण्यात येणार असून ० ते ६ वयोगटांतील सर्व बालकांची वजन, उंची, दंडघेर, पायावरील सूज या निकषावर पडताळणी करण्यात येऊन त्यामध्ये तीव्र कुपोषित आढळून येणाऱ्या बालकांना ग्राम बाल विकास केंद्रात प्रवेश देण्यात येणार आहे.
यासाठी बालकांचे सर्वेक्षण करून सर्वेक्षित सर्व बालकांची १०० टक्के वजन घेण्यात येणार आहे. यामधून जी बालके तीव्र कुपोषित असतील अशा बालकांसाठी बाल उपचार केंद्र, राष्ट्रीय पुनर्वसन केंद्र व ग्राम बाल विकास केंद्र या माध्यमातून उपचार, पोषक आहार व आवश्यक सेवा सुविधा पुरविण्यात येणार आहे. सदर बालकांच्या पालकांना गृहभेटीद्वारे पोषण आहाराबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे ग्रामपंचायतीच्या वतीने तयार करण्यात येणाऱ्या ग्रामपंचायत विकास आराखड्यात महिला व बालविकासासाठी असलेल्या निधितून आहारावर खर्च करण्यात येणार आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इशरे नाशिक शाखेच्या नवीन कार्यकारिणीने केले पदग्रहण !

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।

सहाय्यक प्रशासन अधिकारी पदावर अनिल गिते व अनिल सानप यांना पदोन्नती !