पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सर्व ग्रामपंचायतींच्या सरपंचांना आवाहन पत्र !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

नाशिक- पावसाळयाच्या पार्श्वभूमीवर देशातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये २० ते ३० जुन या कालावधीत पावसाच्या पाण्याची साठवणुक करण्यासाठी अभियान राबविण्याचे निर्देश केंद्र  शासनाने दिले असून याविषयी आवाहन करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पत्र जिल्हयातील सर्व ग्रामपंचायतींना शासनाकडून प्राप्त झाले आहे. सदर अभियान राबविण्याबाबत तालुकास्तरीय यंत्रणेला निर्देश देण्यात आले असल्याची माहिती माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी दिली.
केंद्र शासनाने दिलेल्या निर्देशानुसार देशातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये पावसाचे पाणी साठवणुकीसाठी अभियान राबविण्यात येणार आहे. यामध्ये श्रमदानातून बांध-बंदिस्ती, नदी व ओढयात चेक डॅक तयार करणे, गाळाचा उपसा करणे, तलावांचे खोलीकरण व सफाई, वृक्षारोपन आदि विविध प्रकारची काम करावयाची आहेत. यासाठी २२ जुन रोजी सर्व ग्रामपंचायतींमध्ये ग्रामसभा घ्यावयाची असून त्यामध्ये पंतप्रधान महोदयांचे पत्र सर्वांना वाचून दाखवायचे आहे. यासाठी केंद्र शासनाकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी याचे मराठी भाषेतील आवाहन पत्र जिल्हाधिकारी कार्यालयास प्राप्त झाले आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीच्या नावाने स्वतंत्र पत्र प्राप्त झाले असून जिल्हा परिषदेमार्फत या पत्रांच्या प्रति सर्व तालुक्यांना देण्यात आल्या आहेत. तालुकास्तरावरुन सर्व ग्रामपंचायतींना या पत्राचे वितरण करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे तालुकास्तरावर पंचायत समितीचे सभापती, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच यांच्या बैठका घेवून अभियानाची माहिती देण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहिती पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे यांनी दिली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

होय! मी नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती लिना बनसोड(भा.प्र.से.) यांच्याबद्दलच बोलतो आहे, लिहितो आहे.

आनंद मेळाव्याच्या माध्यमातून टिळकांचा एकत्रित येण्याचा उद्देश सफल- वरिष्ठ पाेलिस निरीक्षक भालेराव

दातार म्हणजे समाजाला भरभरून देणारे ! कुलसंमेलनात उमटला सार्थ अभिमान !!