खोटी माहिती सादर केल्यास संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात येणार ! उप अभियंत्यांनी दिलेला अंतराचा दाखला ग्राह्य धरला जाईल !! शिक्षकांच्या आॅनलाईन बदल्यांबाबत डॉ. गितेंचा इशारा !!! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

नाशिक - शासनाच्या निर्देशानुसार यावर्षीही शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या करण्यात येणार असून रिक्त पद आणि सामानिकरणानुसार रिक्त पद च्या आधारे ही प्रक्रिया करण्यात येणार आहे. याबाबत आज जिल्हा परिषदेत गट शिक्षण अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संकेतस्थळावर माहिती भरण्यात आली. गट शिक्षण अधिकारी यांनी सादर केलेली माहिती खोटी असल्यास व त्यामुळे बदल्यांमध्ये प्रश्न निर्माण झाल्यास संबंधीतांवर गुन्हा दाखल करण्याचा इशारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी दिला आहे.
शासनाने जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक, पदवीधर शिक्षक आणि मुख्याध्यापक यांची बदली प्रक्रिया संदर्भात शाळानिहाय रिक्त जागा आणि समानीकरणानुसार रिक्त ठेवायची पदे निश्चित करून घोषित करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार जिल्हा परिषदेमार्फत अंतरजिल्हा बदलीने आलेले, सेवानिवृत्त झालेले, मयत झालेले, तसेच मनपा मालेगात हद्दवाढ झाल्याने रिक्त जागांमध्ये सुधारणा झालेने यानुसार समानीकरणानुसार रिक्त ठेवायची पदे निश्चित करण्याचे निर्देश देण्यात आले होते. तसेच शासन निर्णयानुसार आदिवासी क्षेत्रातील सर्व जागा भरण्याची कार्यवाही करणे आवश्यक असल्याने बिगर आदिवासी भागातील रिक्त जागांची स्थिती तालुकानिहाय व शाळानिहाय समप्रमाणात सुनिश्चित करण्याचेही निर्देश आहेत. सध्यस्थितीत नाशिक जिल्ह्यात आदिवासी व बिगर आदिवासी क्षेत्र मिळून मुख्याध्यापक १६६, पदवीधर प्राथमिक शिक्षक ४३७, प्राथमिक शिक्षक ३८५ याप्रमाणे पदे रिक्त आहेत. त्यानुसार बिगर आदिवासी भागात रिक्त ठेवायची पदे निश्चित करून रिक्त पदे आणि अनिवार्य रिक्त पदे यांच्या याद्या मागवून आज याबाबतची माहिती भरण्यात आली. शिक्षकांच्या बदल्यात विविध प्रश्न निर्माण होत असल्याने सर्व गटशिक्षण अधिकाऱ्यांनी सर्व माहिती अचूक असल्याबाबत खात्री करूनच पुढील कार्यवाही करण्याचे तसेच खोटी माहिती असल्यास व त्यामुळे वाद उद्भवल्यास संबधितांवर कार्यवाही निश्चित करण्याचा लेखी इशारा डॉ नरेश गिते यांनी दिला आहे.
*अंतराबाबत उप अभियंत्यांचा दाखला ग्राह्य धरणार*
सन २०१८ मध्ये झालेल्या शिक्षक बदली प्रक्रियेमध्ये विशेष संवर्ग शिक्षक भाग २ मधून लाभ घेतलेल्या शिक्षकांनी अंतराबाबत सादर केलेल्या दाखल्यांबाबत अनेक तक्रारी व आक्षेप प्राप्त झाले होते. यावर्षी या संवर्गातून अर्ज करणाऱ्या पती-पत्नी या दोघांच्या मुख्यालयातील अंतर हे सर्वात जवळच्या रस्त्याचे ग्राह्य धरण्यात येणार असून सदर रस्ता जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत असेल तर उप अभियंता (इवद) व सार्वजनिक बांधकाम विभागाचा असेल तर तेथील उप अभियंता यांनी निर्गमित केलेला अंतराचा दाखलाच ग्राह्य धरण्यात येणार असून अन्य कोणत्याही प्राधिकरणाने निर्गमित केलेला दाखला ग्राह्य धरण्यात येणार नसल्याचे निर्देश सर्व संबधितांना देण्यात आले आहेत. त्याच प्रमाणे पती –पत्नी या दोघांपैकी एक जोडीदार शासकीय, निमशासकीय व शासनमान्य संस्था यातील कर्मचारी असेल तरच त्यांना विशेष संवर्गातील भाग २ चा लाभ घेता येणार आहे. खाजगी पतसंस्था, विविध कार्यकारी सोसायटी, मजूर सोसायटी, औद्योगिक संस्था शासनमान्य नसल्याने या संस्थामध्ये कार्यरत कर्मचार्यांना याचा लाभ घेता येणार नाही. त्याच प्रमाणे माहिती भरताना जाणीवपूर्वक खोटी व चुकीची माहिती भरल्याचे सिद्ध झाल्यास त्यांचेविरुद्ध शासन परिपत्रकानुसार कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

होय! मी नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती लिना बनसोड(भा.प्र.से.) यांच्याबद्दलच बोलतो आहे, लिहितो आहे.

८४ अनुकंपा कर्मचाऱ्यांचे समायोजन !

आंतर जिल्हा बदलीने जिल्ह्यात शिक्षकांना पदस्थापना ! शून्य शिक्षक शाळांना मिळाले २० शिक्षक !!