पोस्ट्स

कर्मचाऱ्यांचा एल्गार !मागण्या मान्य न झाल्यास ११ सप्टेंबर पासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय कालच्या एकदिवसीय लाक्षणिक संपात देण्यात आला !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

इमेज
कर्मचाऱ्यांचा एल्गार ! मागण्या मान्य न झाल्यास ११ सप्टेंबर पासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय कालच्या एकदिवसीय लाक्षणिक संपात देण्यात आला !          नासिक (९)::- राज्यातील सर्व शासकीय निमशासकीय शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी   एकदिवसीय लाक्षणिक संप करून शासनाला मागण्यांसाठी जिल्हास्तरावर निवेदने देण्यात आली. कालच्या लाक्षणिक संपात नासिक जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी द्वारसभा घेत सहभागी होत मुख्य कार्यकारी अधिकारी यांना मागण्यांचे निवेदन सादर केले.          पुणे येथे २५ आॅगस्ट रोजी झालेल्या जिल्हा परिषदेच्या अंतर्गत काम करणाऱ्या विविध संवर्गातील संघटनेच्या प्रमुखांची व प्रतिनिधींनी राज्यस्तरीय प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे दुर्लक्ष होत असल्याने नाराजी व्यक्त केली व संघटनांच्या सर्व समावेशक,समान मागण्यांसाठी समन्वय समिती स्थापन केली होती. समितीने घेतलेल्या निर्णयानुसार प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी काल सर्व संघटनांनी एकत्र येऊन लाक्षणिक संप पुकारला यामुळे जिल्हा परिषदेचे कामकाज ठप्प झाले होते.           कर्मचाऱ्यांच्या मागण्यांमध्ये जुनी पेन्शन योजना लागू करा

ट्रोल कशावर केव्हा करायचा ? कुणावर करायचा ? आपली लायकी किती ? सात रूपयांत एक रोटी मिळत नाही तुमच्याकडे !! भारतीय मिडिया व सर्वधर्म समभाव नीतीने चालणारी जनता आजही सभ्यता टिकवून आहे !!! ट्रोल करणाऱ्याला त्याच्याच भाषेत मात्र सभ्यतेत दिलेले उत्तर सविस्तर वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!!

इमेज
भारतीय मिडिया ने व भारतीयांनी आपल्या संस्कृतीचा वारसा जपत जी वाटचाल सुरू ठेवली आहे ती जगाला भुरळ घालणारी ठरत असताना शेजारील देशातील राजकारण्यांनी सडकछाप प्रतिक्रिया नोंदवली तीचे पडसाद "पायावर धोंडा पाडून घेण्यासारखी" बघायला मिळत आहे. भारताची चांद्रयान-२ मोहीम शेवटच्या टप्प्यात पोहचली असताना विक्रम लॅंडर चा बंगळुरूस्थित इस्त्रोच्या लॅबशी संपर्क तुटला मात्र विक्रमला वेगळं करणारे आर्बिटर व्यवस्थित कार्यरत आहे. थोडक्यात भारताची चांद्रयान मोहीम खूप किंवा पूर्णतः अपयशी ठरलेली नाही. यापूर्वी सन २००८ मधील चांद्रयान मोहीम यशस्वी ठरली होती, तीचा उद्देश सफल झाल्यानंतर चंद्रावरील पाणी व इतर माहिती मिळविण्याचे पुढचे पाऊल म्हणून या मोहीमेकडे पाहीले जाते.            शेजारील देश पाकीस्थान आपल्या अकलेचे तारे तोडत आहे, यांत प्रामुख्याने पाकीस्थानचे विज्ञान मंत्री फवाद हुसेन चौधरी आघाडीवर आहेत, ९०० कोटी रुपये खर्च करायची भारताला काय आवश्यकता होती, विरोधी पक्षांनी यांचा जाब पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विचारला पाहिजे, त्यांनी सत्तेतून बाहेर पडावे, असा "मोलाचा" सल्लाही ट्विटरद्वारे

शिवरायांना श्रद्धास्थानी मानणाऱ्या मनांची कत्तल ! दिर्घकालानंतर उपस्थित होणारा प्रश्र्न "शिवराय कोण होते ?" याचे उत्तर आजच शोधले तर बरे अन्यथा रयतेचे राज्य या संकल्पनेची हत्या केल्याचं पाप ठरेल ! उद्विग्न भावनांचा कल्लोळ सविस्तर वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
सरकारने घुमजाव केले की जनभावनेचा आदर करून निर्णय मागे घेतला ! काहीही असो पण तुर्तास अभिनंदन !  एका मोठ्या "रयतेचे राज्य संकल्पनेची" हत्या घडण्यापासून बचाव केला तरीही असा अविवेकी विचार आलाच कसा ? यांवर अनेक तीव्र प्रतिक्रिया उमटल्या तशीच एक प्रतिक्रीया "शिवराय कोण होते ?" असा प्रश्न भविष्यात उपस्थित करणारी !! गडकिल्ले हेरिटेज हॉटेलसाठी की पर्यटन स्थळासाठी !         चालान वाढविण्याने भडकलेल्या जनतेच्या जखमांची शाई वाळते न वाळते तोच सरकारने गडकिल्ल्यावर हेरिटेज  हॉटेल बांधण्याचा निर्णय घेवून तमाम शिवरायांवर श्रद्धास्थान ठेवणा-या मनाची सरकारने कत्तल केलेली दिसून येत  आहे.गडकिल्ले  हे शिवरायांच्या राज्यकारभाराचे  सत्ताकेंद्र.ज्या  राजाने गडकिल्ल्यावरुन तमाम आदिलशाही,निजामशाही आणि मोगलशाहीला आव्हान दिलं,नव्हे तर त्यांची सत्ता उधळून  लावली.तसेच  याच किल्ल्याच्या आधाराने तमाम आपलं अस्तित्व न समजणा-या लोकांना त्यांच्या अस्तित्वाची जाणीव करुन  दिली.आज  गडकिल्ले ही वास्तू जरी शोभेची वस्तू वाटत असली तरी त्या ठिकाणी एक एक किल्ला लढवितांना तिथे तमाम मावळ्यांचंच

आज विजयकुमार हळदे यांचा वाढदिवस ! यांना शुभेच्छा कोणत्या द्याव्या ? जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
पाच सप्टेंबर-शिक्षक दिन पाच सप्टेंबर-वाढदिवस ? विजयकुमार हळदे यांचा आज वाढदिवस ! शिक्षक दिनाच्या शिक्षण क्षेत्रातील सर्व ज्ञात-अज्ञात देश, समाज घडविण्यासाठी कटीबद्ध असलेल्या मान्यवर विभूतींना न्यूज मसाला परीवाराकडून हार्दिक शुभेच्छा !! अशाच एका शिक्षक नसलेल्या मात्र शिक्षकांइतकेच प्रभावी कार्य करणारे नासिक जिल्हा परिषदेतील कक्ष अधिकारी, जिल्हा परिषद व सरकारी कर्मचारी बॅंकेचे अध्यक्ष, कर्मचारी संघटना नेते विजयकुमार हळदे यांना वाढदिवसाच्या अनंत कोटी हार्दिक शुभेच्छा !! शिक्षकी पेशा अंगीकारलेले शिक्षकांना शुभेच्छा आहेतच मात्र विजयकुमार हळदे यांचेही कार्य जिल्हा परिषद व सरकारी कर्मचारी यांना मार्गदर्शक ठरते, त्यांचे विचार व कार्य करण्याची पद्धत ही इतरांसाठी सदैव एका गुरुस्थानी मानते, संघटन व सर्वांना सोबत घेऊन जाण्याची त्यांची शैली, निवडणूक संपली की पुन्हा सर्वांशी मिळून मिसळून काम करण्याची पद्धत यामुळे ते राज्यस्तरीय नेते म्हणून गणले जातात , अशा व्यक्ती जर समाजात , प्रशासनात, राजकारणात असतील तर त्याही शिक्षकांप्रमाणे असतात किंबहुना द्रोणाचार्य हेच फक्त गुरु नाहीत तर त्यांचा पुतळाही एक

गणपती जरुर बसवा, पण सावधगीरी बाळगा - लेखक अंकुश शिंगाडे नागपूर यांच्या संस्कार मालिकेतील लेख खास न्यूज मसालाच्या वाचकांसाठी !! लेखावर एक नजर फिरवून शेअर करायला विसरू नका !!! सविस्तर माहिती साठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
अंकुश शिंगाडे, नागपूर, यांच्या संस्कार या लेखमालिकेतील १ सप्टे. २०१९ रोजीचा लेख, गणपती बसविणाऱ्यांनी गणपती बसवावा पण सावधगिरी बाळगण्यातील निष्काळजीपणा व होणारे गणेशोत्सवाचे विडंबन याला कोणी जबाबदार आहे असे नाही मात्र सावधगिरी बाळगावी या प्रबोधनत्मक लेखाचा संयमी सूर सर्वांनाच भावेल अशी आशा -संपादक, न्यूज मसाला, नासिक. गणपती जरुर बसवा.पण सावधगीरी बाळगा           गणपती बाप्पा मोरया म्हणत आजकाल गणपती बापाची लोकांनी फँशनच निर्माण केली आहे.लोकांना वाटते की गणपती बाप्पाला मांडले आणि दहा दिवस पुजा केली की बस झालं.सा-या समस्या चुटकीसरशी सुटल्या.खरंच सुटतात का समस्या?याचे कारण नाही असंच असेल.पण तरीही आम्ही मांडतो आहोत.त्यासाठी लाखो रुपये खर्च करतो आहोत.का?तर आमच्या सुखासाठी.आमच्या चेह-यावर आनंद झळकावा यासाठी.....क्षणभर का होईना आम्हाला आमचे दुःख विसरता यावे यासाठी.....       गणपती या दहा दिवसात मातीची मुर्ती जरी असला तरी तो आम्हाला सजीव वाटतो.त्याच्यासाठी मग सर्वच काही करण्याच्या आमच्या कला आम्ही पणास लावतो.वेगवेगळे प्रसाद बनवुन त्याला भोग देतो.तो खात नाही हे माहीत असुनही सारंच काही त्या

भारतीय आयुर्विमा महामंडळाचा ६३ वा वर्धापन दिनानिमीत्त १ ते ७ सप्टेंबर २०१९ दरम्यान एलआयसी सप्ताहाचे आयोजन ! कर्मचारी व विमाधारकांनी या सप्ताहाचा लाभ घ्यावा - वरिष्ठ विभागीय व्यवस्थापक तुलसीदास गडपायले !!! बातमी मागच्या बातमीसाठी उत्तर महाराष्ट्रातील एकमेव न्यूज पोर्टल www.newsmasala.in. संपादक नरेंद्र पाटील ,!!! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!

इमेज
भारतीय आयुर्विमा महामंडळाचा ६३ वा वर्धापन दिन -१ सप्टेंबर २०१९          नासिक (३१)::-भारतीय आयुर्विमा महामंडळ ६३ वा वर्धापन दिन दिनांक १ सप्टेंबर २०१९ रोजी साजरा करीत आहे. १ ते ७ सप्टे. २०१९ या दरम्यान आयुर्विमा महामंडळाच्या सर्व कार्यालयांमध्ये "एलआयसी सप्ताह' साजरा केला जाणार आहे. या कालावधीमध्ये कर्मचार्यासाठी तसेच पॉलिसी धारकांसाठी विविध उपक्रम हाती घेतले जातील, अनेक सामाजिक व लोकोपयोगी उपक्रम, जसे की गरजूंना लागणाऱ्या वस्तूंचे वाटप, वृक्षलागवड, आरोग्य शिबिर इ. या दरम्यान राबविले जातील.           सप्टेंबर १९५६ रोजी त्यावेळेस कार्यरत असलेल्या २४५ खासगी विमा कंपन्यांचे विलीनीकरण करून संसदेच्या एका कायद्यानुसार भारतीय आयुर्विमा महामंडळाची स्थापना करण्यात आली. गेल्या ६३ वर्षांच्या प्रवासात भारतीय आयुर्विमा महामंडळ प्रत्येक वर्षागणिक अधिकाधिक जोमाने वृद्धिंगत झालेले आहे आणि आज विविध कसोट्यांवर या देशातील क्रमांक एकची वित्तसंस्था ठरलेली आहे. भारतीय आयुर्विमा महामंडळाने दावे निकाली काढण्याच्या आपल्या अनुकरणीय विक्रमाने कोट्यावधी भारतीयांचा विश्वास संपादन केला आहे. भारतीय आय

नासिक जिल्हा परिषद अभियंता सहकारी पतसंस्थेची सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली ! बातमी मागच्या बातमीसाठी उत्तर महाराष्ट्रातील एकमेव न्यूज पोर्टल www.newsmasala.in - संपादक नरेंद्र पाटील !!! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!

इमेज
नासिक जिल्हा परिषद अभियंता सहकारी पतसंस्थेची सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली !       नासिक (१ सप्टे.)::-नासिक जिल्हा परिषद अभियंता सहकारी पतसंस्थेची २१ वी सर्वसाधारण सभा संस्थेचे अध्यक्ष जयराम गोवर्धने यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडली.           संस्थेला सन २०१८-१९ या आर्थिक वर्षात कर्जवाटप व खर्च वजा जाता आठ लाख चार हजार रूपयांचा नफा झाला असून लेखापरिक्षणात 'अ' वर्ग मिळाला आहे.             आजच्या सभेत संस्थेचे अध्यक्ष जयराम गोवर्धने यांनी उपस्थित सभासदांशी वार्तालाप करताना सांगितले की, संस्था आपलीच समजून तिच्या प्रगतीसाठी मासिक वर्गणी, कल्याण निधी, कर्ज हप्ता दरमहा नियमित भरून सहकार्य करावे,  सभासदांनी कर्जाचा विनियोग स्वतासाठी व कुटुंबियांच्या कल्याणासाठी करावा, सभासदांची गरज लक्षात घेऊन कार्यकारी मंडळ तत्काळ कर्ज मंजूर करून देते. संस्थेच्या विकासासाठी जिप पदाधिकारी, सदस्य, मुख्य कार्यकारी अधिकारी, उप मुख्य कार्यकारी अधिकारी, लेखा व वित्त अधिकारी, सर्व खातेप्रमुख यांचे अनमोल सहकार्य लाभले आहे, विभागीय सहनिबंधक मिलिंद भालेराव, जिल्हा उपनिबंधक श्रीमती ज्यो