गणपती जरुर बसवा, पण सावधगीरी बाळगा - लेखक अंकुश शिंगाडे नागपूर यांच्या संस्कार मालिकेतील लेख खास न्यूज मसालाच्या वाचकांसाठी !! लेखावर एक नजर फिरवून शेअर करायला विसरू नका !!! सविस्तर माहिती साठी खालील लिंकवर क्लिक करा !!!


अंकुश शिंगाडे, नागपूर, यांच्या संस्कार या लेखमालिकेतील १ सप्टे. २०१९ रोजीचा लेख, गणपती बसविणाऱ्यांनी गणपती बसवावा पण सावधगिरी बाळगण्यातील निष्काळजीपणा व होणारे गणेशोत्सवाचे विडंबन याला कोणी जबाबदार आहे असे नाही मात्र सावधगिरी बाळगावी या प्रबोधनत्मक लेखाचा संयमी सूर सर्वांनाच भावेल अशी आशा -संपादक, न्यूज मसाला, नासिक.
गणपती जरुर बसवा.पण सावधगीरी बाळगा
          गणपती बाप्पा मोरया म्हणत आजकाल गणपती बापाची लोकांनी फँशनच निर्माण केली आहे.लोकांना वाटते की गणपती बाप्पाला मांडले आणि दहा दिवस पुजा केली की बस झालं.सा-या समस्या चुटकीसरशी सुटल्या.खरंच सुटतात का समस्या?याचे कारण नाही असंच असेल.पण तरीही आम्ही मांडतो आहोत.त्यासाठी लाखो रुपये खर्च करतो आहोत.का?तर आमच्या सुखासाठी.आमच्या चेह-यावर आनंद झळकावा यासाठी.....क्षणभर का होईना आम्हाला आमचे दुःख विसरता यावे यासाठी.....
      गणपती या दहा दिवसात मातीची मुर्ती जरी असला तरी तो आम्हाला सजीव वाटतो.त्याच्यासाठी मग सर्वच काही करण्याच्या आमच्या कला आम्ही पणास लावतो.वेगवेगळे प्रसाद बनवुन त्याला भोग देतो.तो खात नाही हे माहीत असुनही सारंच काही त्याच्यासाठी....आणि शेवटी दहाव्या दिवशी त्याचा विचार न करता,त्याची इच्छा नसतांनाही त्याला नाल्यात नेवुन टाकतो.हे आमचं कितपत बरोबर आहे?
        गणपती बाप्पा आमच्या श्रद्धेचा विषय असतांना त्याला नाल्यात नेवुन टाकणे आम्ही कसे सहन करतो ही विचार करायला लावणारी बाब आहे.खरं तर विघ्न विनाशक असलेल्या आमच्या गणपती बाप्पाला आम्ही एखादं मंदीर बांधुन आमची श्रद्धा जोपासायला हवी.त्याला सुरक्षीत ठेवायला हवे.त्याची सुरक्षा करायला हवी.
          गणपती हे पुर्वी पाण्यात बुडवीत नसत.त्याचा फार मोठा इतिहास आहे.तो सांगण्याची गरज नाही.घरोघरी गणपती मांडले जात नव्हे तर त्याची विल्हेवाट न लावता घरचा एक सदस्य म्हणुन वर्षभर त्याची पुजा होत असे.एखाद्या वेळी त्याचा एखादा अवयव तुटलाच तर त्याला तुळशीजवळ ठेवुन ती माती तुळशीच्या झाडाला अर्पण करीत असत.त्या मातीत झाडांची वाढ चांगली होते.हा लोकांचा उद्देश असायचा.अलीकडे लक्ष्मीच्या मुर्तीची जशी विल्हेवाट लावली जाते तशी.तसं गणपतीचं केलं जात असे.
         कालांतरानं आम्ही शिकलो.सवरलो.मोठे झालो.आमच्या भावना मोठ्या झाल्या.त्याबरोबर आमच्यात स्वार्थ शिरला.आमचा स्वार्थही मोठा झाला.चक्क यात आम्ही गणपतीबाप्पालाच पैसे कमविण्याचं साधन बनवलं.मग वेगवेगळ्या स्पर्धा घेवु लागलो.त्याचे शुल्कही ठरवु लागलो आणि अमाप पैसा गोळा करुन ती रक्कम वाटुन स्वतःचा चरितार्थ चालवु लागलो.काही लोकं तर भरमसाठ वर्गणी गोळा करु लागले. खर्च करुन जी रक्कम उरेल.ती रक्कम सर्व सदस्य मंडळी एकमेकात वाटुन घेवु लागले किंवा त्या रकमेतुन दारु सुद्धा पिवु लागले ही वास्तविकता कित्येक ठिकाणी अनुभवायला मिळाली.
        हे भरपुर ठिकाणी आजही घडत आहे.एकंदरीत सांगायचे झाल्यास गणपती बाप्पाच्या नावावर आम्ही तमाशा ऊभा केला आहे.गणपती बाप्पा बनवितांना कुंभार समाजाचे योगदान अनन्य साधारण आहे.त्या समाजातील बहुतेक जणांना काम मिळतं.त्यांचं पोटही भरत असतं नव्हे तर या गणपती उत्सवाच्या निमित्याने भरपुर लोकं आपले पोट भरीत असतात.पण त्याबरोबर गणपती बाप्पाच्या नावावर आजही ग्रामीण भागात तमाशाचे फड रंगतात.ते पाहायला गावातील तरुण तरुणी आवडीने जात असतात.त्यात स्रियांच्या वेशभुषेत पुरुष मंडळी नाचत असतात.एकमेकांना चिमटे काढत असतात.हे कलाकारांच्या कलात्मकतेचं प्रदर्शन जरी असलं आणि त्याची मजा गावातील लोकांना जरी येत असली तरी या तरुण तरुणींना बिघडविण्याच्या गोष्टी आज होत चाललेल्या आहेत.अर्थात गणपतीबाप्पाच्या नावावर हे सारं खपविणा-या गोष्टी आज घडत आहेत.एवढेच नाही तर आजतरी या गणपती बाप्पाच्या दर्शनाला येणारी तरुण मुले मुली आपल्या आईवडीलांना विचारुन येतातच असे नाही.मित्रांसोबत दोन दिवसासाठी फिरायला जात आहो असा बहाना करुन ही तरुण तरुणी दर्शनाच्या नावावर आजही येतात आणि दर्शन घेण्याऐवजी रुम करुन मादकतेचा आनंद घेत असतात.हे दृश्य मात्र आपला गणपती बाप्पा नाईलाजानं सहन करीत असतो.
        या सर्व गोष्टीचा विचार करण्याची आजतरी गरज आहे.गणपतीबाप्पाला बसवा.कामगारांना काम मिळु द्या.त्यांचेही पोट भरु द्या.बसवण्याला मनाई नाही.पण त्यांचे नावावर व्यापार करु नये.अश्लीलतेचं प्रदर्शन करु नये.देणगीच्या नावावर कोणावर बळजबरी करु नये वा कोणाला मुर्ख बनवु नये.
       गणपतीला विद्येची देवता समजतात.त्याचे स्थान अबाधीत राहु द्यावे.त्याच्या परिसरात घाण करु नये.तरुण तरुणींनी दर्शनाला अवश्य जावे.पण आपल्या आईवडीलांसोबत.उत्सव साजरा करायला.उत्सव साजरा केलाच पाहिजे.पण केवळ अंगप्रदर्शन करुन हातात हात ठेवुन स्वतःचे गणपतीबाप्पासोबत सेल्फी काढुन स्वतःचा जीव धोक्यात घालु नये.
       गणपती विसर्जनाच्या वेळी नेहमी बातम्या येतात.गणपती शिरवतांना अमुक अमुक मरण पावले.असे व्हायला नको.गणपती शिरवावा.पण सावधानता बाळगायला हवी ना.पण आम्ही आईवडीलांना न जुमानणारी मुले.खरंच सेल्फी काढायला घाबरु!कधीच नाही.मग गणपती बाप्पा सोबतीला आहे असा विचार करुन आम्ही सावधगीरी न बाळगता गणपती शिरवतो.त्यात चुकीनं स्वतःच मरतो.मात्र मायबाप बिचा-या गणपतीला दोष देतात.त्यात मातीच्या त्या गणपतीचा कोणता दोष?तो स्वतःची इच्छा नसतांनाही स्वतःचा जीव वाचवु शकत नाही.तो तुमचा जीव कसा वाचविणार!म्हणुन गणपती बाप्पाला जरुर बसवा.पण थोडी का होईना सावधानता जरुर बाळगा.त्यातच तुमचाच फायदा आहे.खबरदारी घ्या,जेणेकरुन कोणत्या ब-यावाईटपणाचे तुमच्या गणपती बाप्पावर लांछन लागायला नको.
      अंकुश शिंगाडे
नागपुर,. (संस्कार लेखमालिकेतील १ सप्टे. चा लेख)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

होय! मी नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती लिना बनसोड(भा.प्र.से.) यांच्याबद्दलच बोलतो आहे, लिहितो आहे.

आनंद मेळाव्याच्या माध्यमातून टिळकांचा एकत्रित येण्याचा उद्देश सफल- वरिष्ठ पाेलिस निरीक्षक भालेराव

दातार म्हणजे समाजाला भरभरून देणारे ! कुलसंमेलनात उमटला सार्थ अभिमान !!