शिवरायांना श्रद्धास्थानी मानणाऱ्या मनांची कत्तल ! दिर्घकालानंतर उपस्थित होणारा प्रश्र्न "शिवराय कोण होते ?" याचे उत्तर आजच शोधले तर बरे अन्यथा रयतेचे राज्य या संकल्पनेची हत्या केल्याचं पाप ठरेल ! उद्विग्न भावनांचा कल्लोळ सविस्तर वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!सरकारने घुमजाव केले की जनभावनेचा आदर करून निर्णय मागे घेतला ! काहीही असो पण तुर्तास अभिनंदन !
 एका मोठ्या "रयतेचे राज्य संकल्पनेची" हत्या घडण्यापासून बचाव केला तरीही असा अविवेकी विचार आलाच कसा ? यांवर अनेक तीव्र प्रतिक्रिया उमटल्या तशीच एक प्रतिक्रीया "शिवराय कोण होते ?" असा प्रश्न भविष्यात उपस्थित करणारी !!

गडकिल्ले हेरिटेज हॉटेलसाठी की पर्यटन स्थळासाठी !

        चालान वाढविण्याने भडकलेल्या जनतेच्या जखमांची शाई वाळते न वाळते तोच सरकारने गडकिल्ल्यावर हेरिटेज  हॉटेल बांधण्याचा निर्णय घेवून तमाम शिवरायांवर श्रद्धास्थान ठेवणा-या मनाची सरकारने कत्तल केलेली दिसून येत आहे.गडकिल्ले हे शिवरायांच्या राज्यकारभाराचे सत्ताकेंद्र.ज्या राजाने गडकिल्ल्यावरुन तमाम आदिलशाही,निजामशाही आणि मोगलशाहीला आव्हान दिलं,नव्हे तर त्यांची सत्ता उधळून लावली.तसेच याच किल्ल्याच्या आधाराने तमाम आपलं अस्तित्व न समजणा-या लोकांना त्यांच्या अस्तित्वाची जाणीव करुन दिली.आज गडकिल्ले ही वास्तू जरी शोभेची वस्तू वाटत असली तरी त्या ठिकाणी एक एक किल्ला लढवितांना तिथे तमाम मावळ्यांचंच नाही तर बहुजणांचं रक्त साडलेलं आहे.
          शिवरायाच्या जन्मापुर्वी महाराष्ट्रात देशमुख देशपांडे इत्यादी वतनदाराची सत्ता होती.हे देशमुख देशपांडे आदि वतनदार हे महाराष्ट्रातील असून ती आपलीच मंडळी होती.पण ती आपली मंडळी असूनही आपल्याच माणसावर ते जुलूम,जोर जबरदस्ती तसेच अत्याचार करीत असत.भेदभाव तर शिगेला पोहोचलेला होता.अशाअत्याचाराने रयत फार त्रासली होती.हे रयतेचे हाल पाहावेसे वाटत नव्हते.हेच शिवरायांनी बालपणी हेरलं व आपली आई जिजामातेला त्यांनी बालपणापासूनच प्रश्न विचारायला सुरुवात केली.आईने त्यांना राम,लक्ष्मण तसेच अभिमन्यूच्या कथा सांगून स्वतःचे,सर्वांचे राज्य निर्माण करण्याची प्रेरणा दिली.
           शिवरायांना लहानपणीच वाटलं की आपण लढावे.लोकांचेस्वतःचे राज्य निर्माण करावे.ज्या राज्यात कोणी कोणावर जुलूम करणार नाहीत.लोकांना बोलता येईल.आपलं मत मांडता येईल.त्यासाठी ते त्याच लहान वयात डोंगरद-या फिरले.वाटाशोधल्या.सोबती जमवले व त्या सोबत्यांच्या आधाराने शिवरायांनी एक एक किल्ले जिंकत आदिलशाही,निजामशाही व मोगलशाहीशी लढा दिला.हा इतिहास आहे.
         पुरंदरचा किल्ला लढविताना मुरारबाजी,पावनखिंड लढविताना बाजीप्रभू,कोंढाणा लढविताना तानाजी इत्यादी वीर मारले गेले.आणिअफझलखानाशी दोन हात करताना जिवा महालाचा हात तुटला.एवढंच नाही तर आग्र्याच्या कैदेत असताना प्रति शिवाजी बनलेल्या शिवाजीला त्याच्या परीवाराने प्रश्न केला की तुला मरणाचं भय वाटत नाही का?त्यावर शिवाजी बनलेला तो मुस्लीम समुदायातील माणूस हिरोजी फर्जंद म्हणाला,
       "मला मरणाचं भय नाही.उलट अभिमान आहे की मी शिवाजी म्हणून मरणार.हिरोजी म्हणून नाही.तसेच हा इतिहास बनणार."
         आज हिरोजी फर्जंद व त्याचा सहकारी मदारी मेहतर,बाजीप्रभू,मुरारबाजी,तानाजी शिवरायांसाठी लढले.प्राणाचीबाजीही लावली.आज ते जिवंत नाहीत.पण त्यांच्या रक्ताने माखलेला रक्तरंजित इतिहास आज किल्ल्यावर आहे.आज किल्ल्यावर मोगलांचे राज्य नाही.किल्ले पडक्या अवस्थेत आहेत.तरीही लोकं या किल्ल्यावर जातात.त्या रक्त सांडलेल्या मातीवर डोकं टेकवतात.कोणी अश्रुही ढाळतात तर कोणी ती माती आपल्या कपाळावर लावतात.गदगदझाल्यासारखं वाटतं.तसेच हे किल्ले पाहून अनुभवून काहीतरी करण्याची प्रेरणा मिळते.ते किल्ले आज ऐतिहासीक ठेवा म्हणून जोपासायला हवेत.तसेच त्यांच्या स्मृतीही ऐतिहासिक स्मृती म्हणून जपायला हव्यात.कारण ते किल्ले म्हणजे आपल्याच महाराष्ट्रातील बहुजन लोकंच नाही,तर तमाम सर्वच लोकांच्या बलिदानाची आठवण आहे.पण अलिकडे या किल्ल्यांना प्रेमी युगलांनी सडवलंय.याकिल्ल्यावर प्रेमी प्रेमीका अश्लिलतेचा नाच करतात नव्हे तर आता आमचं सरकार या किल्ल्यावर हेरिटेज हॉटेल उभारणार आहे.मग या हॉटेलात उघडपणे कैबरे डान्स आणि इतर बरंच काही.जेआदिलशाही,निजामशाही व मोगलशाही दरबारात चालायचं तेच आता पुन्हा सुरु करण्याचा सरकारचा निर्णय अत्यंत घृणास्पद व चुकीचा आहे.त्यांच्या या निर्णयाने जणू आज आदिलशाही,निजामशाही व मोगलशाही आल्यासारखं वाटते.सरकारने हा निर्णय मागे घ्यावा.कारणतमाम मराठा बहुजनच नाही तर महाराष्ट्रात राहणा-या तसेच महाराष्ट्रातील लोकांशी नाळ जुळलेली असणा-या तमाम भारत वासी तसेच जागतिक लोकांच्या भावना या किल्ल्याशी जुळलेल्या आहेत.ज्या शिवरायांची इंग्रज,डच पोर्तुगीजांना भीती वाटायची.ज्याइंग्रजांच्या राज्यात कधीच सुर्य बुडाला नाही,त्या इंग्रजांना शिवरायांच्या जन्मापर्यंत या महाराष्ट्रावर साम्राज्य निर्माण करता आलं नाही.त्याचशिवरायांच्या मावळ्याच्या बलिदानातून साकारलेल्या किल्ल्यावर आज हेरिटेज हॉटेल उभारुन सरकार काय साध्य करणार आहेत.ते कळायला जागा नाही.
         इंदू मिलची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकराची वास्तू पाडणं,दिल्लीतील तुघलकाबाद मधील संत रविदासाचं मंदीर पाडणं आणि आता कालपरवाचा ऐतिहासिक गडकिल्ल्यावर हेरिटेज हॉटेल उभारणं........खरंच सरकारच्या या निर्णयावर विचार करावेसे वाटते.तिनशे सत्तर,पसतीस अ तिहेरी तलाक,चांद्रयान अशाप्रकारचे सरकारचे काही काही निर्णय खरंच चांगले आहेत.पण टिव्हीच्या कार्यक्रमाचे शुल्क,मोबाईल चे वर्षभर पुरणारे पैसे,नोटबंदी,जी एस टी,चालान शुल्क वाढ आणि आता ऐतिहासिक किल्ल्यावर हेरिटेज हॉटेल निर्मीती ह्या गोष्टी असं दाखवितात की हे सरकार आमचं स्वतःचं,लोकशाही पद्धतीनं निवडून आलेलं आहे की युद्ध जिंकून पुढं आलेलं आहे ते कळायला जागा नाही.शिवरायांनीही स्वराज्याचं जे स्वप्न पाहिलं होतं,त्या स्वप्नाला साकार करण्यासाठी शिवरायांनी आपल्या मावळ्यासह बलिदान दिलं.ते स्वप्न साकार करणारं हो सरकार दिसत नाही.तर त्यांच्या स्वप्नांची राखरांगोळी होतांना दिसत आहे.खरंच कधीकधी वाटतं की हे सरकार तुघलकी तर सरकार नसावं.
         महत्वाचं सांगायचं झाल्यास गडकिल्ले हे हेरिटेज हॉटेलसाठी की ऐतिहासिक पर्यटन स्थळासाठी तेच कळेनासे झाले आहे.खरंच हॉटेल उभारल्यावर हा ऐतिहासिक पर्यटनाचा दर्जा राहील का?की या हेरिटेज हॉटेल निर्मीती नंतर या ऐतिहासीक स्थळाची हत्या होईल?तसेच हे किल्ले म्हणजे शिवरायांच्या मावळ्यांच्या बलिदानाचे केंद्रबिंदु होते.हेपुढल्या पिढीला कळेल का?हे हेरिटेज हॉटेल उघडल्याच्या दिर्घ कालावधीनंतर शिवराय तरी कोण होते हे पुढच्या पिढीला कळेल का?ही देखील गंभीर बाब विचार करायला लावणारी आहे.याचा सरकारने विचार करावा.जेणेकरून निर्णय घ्यायला समस्या निर्माण होणार नाहीत.

       अंकुश शिंगाडे, नागपूर

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

होय! मी नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती लिना बनसोड(भा.प्र.से.) यांच्याबद्दलच बोलतो आहे, लिहितो आहे.

आनंद मेळाव्याच्या माध्यमातून टिळकांचा एकत्रित येण्याचा उद्देश सफल- वरिष्ठ पाेलिस निरीक्षक भालेराव

दातार म्हणजे समाजाला भरभरून देणारे ! कुलसंमेलनात उमटला सार्थ अभिमान !!