कर्मचाऱ्यांचा एल्गार !मागण्या मान्य न झाल्यास ११ सप्टेंबर पासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय कालच्या एकदिवसीय लाक्षणिक संपात देण्यात आला !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

कर्मचाऱ्यांचा एल्गार !
मागण्या मान्य न झाल्यास ११ सप्टेंबर पासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय कालच्या एकदिवसीय लाक्षणिक संपात देण्यात आला !
         नासिक (९)::- राज्यातील सर्व शासकीय निमशासकीय शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी   एकदिवसीय लाक्षणिक संप करून शासनाला मागण्यांसाठी जिल्हास्तरावर निवेदने देण्यात आली. कालच्या लाक्षणिक संपात नासिक जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी द्वारसभा घेत सहभागी होत मुख्य कार्यकारी अधिकारी यांना मागण्यांचे निवेदन सादर केले.
         पुणे येथे २५ आॅगस्ट रोजी झालेल्या जिल्हा परिषदेच्या अंतर्गत काम करणाऱ्या विविध संवर्गातील संघटनेच्या प्रमुखांची व प्रतिनिधींनी राज्यस्तरीय प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे दुर्लक्ष होत असल्याने नाराजी व्यक्त केली व संघटनांच्या सर्व समावेशक,समान मागण्यांसाठी समन्वय समिती स्थापन केली होती. समितीने घेतलेल्या निर्णयानुसार प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी काल सर्व संघटनांनी एकत्र येऊन लाक्षणिक संप पुकारला यामुळे जिल्हा परिषदेचे कामकाज ठप्प झाले होते.
          कर्मचाऱ्यांच्या मागण्यांमध्ये जुनी पेन्शन योजना लागू करावी, वेतनत्रृटी दूर करणे, खाजगीकरण कंत्राटीकरण धोरण रद्द करुन कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करणे, केंद्राप्रमाणे भरते मिळणे, लिपीक संवर्गातील ग्रेड वेतन सुधारणा,समान काम-समान वेतन व पदोन्नतीचे टप्पे करणे, केंद्राप्रमाणे महीला कर्मचाऱ्यांना प्रसूती-बालसंगोपन रजा व सवलती देण्यात याव्यात, अनुकंपा भरती तत्काळ व विनाअट करावी, शिक्षकांना अशैक्षणिक कामे देऊ नये, आरोग्य सेवेचे खाजगीकरण बंद करावे, तसेच १० जुन व १५ जुलै रोजी सादर केलेल्या मागण्यांवर तत्काळ कार्यवाही करावी यासह इतरही मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
         ५ सप्टेंबर पासून कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून काम केले मात्र शासनाने त्याची दखल घेतली नाही म्हणून कालचा एकदिवसीय लाक्षणिक संप पुकारला. लाक्षणिक संपाचीही दखल घेतली नाही तर दि. ११ सप्टेबर पासून राज्यातील सर्व शासकीय, निमशासकीय शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बेमुदत संपावर जातील असा इशारा देण्यात आला आहे.
           खालील संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या सह्या असलेले निवेदन देण्यात आले. महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद लिपिक वर्गीय कर्मचारी संघटनेचे विजयकुमार हळदे, अनिल गिते, शितल शिंदे, महेंद्र पवार, सचिन विंचूरकर, प्रमोद निरगुडे, महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद लेखा कर्मचारी संघटनेचे चंद्रशेखर फसाळे, राजेश ठाकूर, दिनकर सांगळे, महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद आरोग्य संघटनेचे राजेंद्र बैरागी, अबू शेख, दिपक अहीरे, महाराष्ट्र राज्य शासकीय निमशासकीय लिपिक संवर्गीय हक्क परिषदेचे निलेश देशमुख, विश्र्वास कचरे, महाराष्ट्र राज्य चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटनेचे विलास शिंदे, वारे, वाडेकर, महाराष्ट्र राज्य औषध निर्माण अधिकारी संघटनेचे फैय्याज खान, हेमंत राजभोज, सचिन अत्रे, महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद आरोग्य कर्मचारी संघटनेचे विजय सोपे, सुभाष कंकरेज, अशोक पगार, बाळासाहेब कोठुळे, महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी संघटनेचे उदय लोखंडे, आर.पी.अहीरे, महाराष्ट्र राज्य प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी संघटनेचे मधुकर आढाव, महाराष्ट्र राज्य विस्तार अधिकारी (सांख्यिकी) संघटनेचे पदाधिकारी,
यावेळी जिल्हा परिषदेचे कर्मचारी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड युके कडून उपजिल्हाधिकारी अंजली धानोरकर सन्मानित !

अनंत कान्हेरे मैदान विकसित तरी समस्या कायम ! आयुक्तांना निवेदन !

सहाय्यक प्रशासन अधिकारी पदावर अनिल गिते व अनिल सानप यांना पदोन्नती !