नासिक जिल्हा परिषद अभियंता सहकारी पतसंस्थेची सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली ! बातमी मागच्या बातमीसाठी उत्तर महाराष्ट्रातील एकमेव न्यूज पोर्टल www.newsmasala.in - संपादक नरेंद्र पाटील !!! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!

नासिक जिल्हा परिषद अभियंता सहकारी पतसंस्थेची सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली !
      नासिक (१ सप्टे.)::-नासिक जिल्हा परिषद अभियंता सहकारी पतसंस्थेची २१ वी सर्वसाधारण सभा संस्थेचे अध्यक्ष जयराम गोवर्धने यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडली.   
       संस्थेला सन २०१८-१९ या आर्थिक वर्षात कर्जवाटप व खर्च वजा जाता आठ लाख चार हजार रूपयांचा नफा झाला असून लेखापरिक्षणात 'अ' वर्ग मिळाला आहे.   
         आजच्या सभेत संस्थेचे अध्यक्ष जयराम गोवर्धने यांनी उपस्थित सभासदांशी वार्तालाप करताना सांगितले की, संस्था आपलीच समजून तिच्या प्रगतीसाठी मासिक वर्गणी, कल्याण निधी, कर्ज हप्ता दरमहा नियमित भरून सहकार्य करावे,  सभासदांनी कर्जाचा विनियोग स्वतासाठी व कुटुंबियांच्या कल्याणासाठी करावा, सभासदांची गरज लक्षात घेऊन कार्यकारी मंडळ तत्काळ कर्ज मंजूर करून देते. संस्थेच्या विकासासाठी जिप पदाधिकारी, सदस्य, मुख्य कार्यकारी अधिकारी, उप मुख्य कार्यकारी अधिकारी, लेखा व वित्त अधिकारी, सर्व खातेप्रमुख यांचे अनमोल सहकार्य लाभले आहे, विभागीय सहनिबंधक मिलिंद भालेराव, जिल्हा उपनिबंधक श्रीमती ज्योती लाटकर, तालुका उपनिबंधक श्रीमती प्रक्रिया दळणार यांचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले आहे या सर्वांचे आभार मानले. पतसंस्थेचे व्यवस्थापक दिलीप रामचंद्र पाटील यांनी मागील सभेचे इतिवृत्त वाचले व ते सर्वसंमतीने कायम करण्यात आले.
        यावेळी उपाध्यक्षा रुपाली जाधव, सचिव विजयकुमार इंगळे, संचालक राजेंद्र राठोड, नितीन पाटील, नरेंद्र देशमुख, प्रमोद जगळे, हमीद चाॅंद शेख, सुभाष अहीरे, तज्ञ संचालक विजय कानडे, सभासद दिलीप अमृत पाटील, राजेंद्र चव्हाण,  जेष्ठ सभासद सोनवणे दादा आदी उपस्थित होते.
     




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इशरे नाशिक शाखेच्या नवीन कार्यकारिणीने केले पदग्रहण !

"राजकारण गेलं मिशीत" या चित्रपटात उद्धव भयवाळ यांची लावणी !

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।