पोस्ट्स

न्यूज मसालाचा "लोकराजा" दिवाळी विशेषांक २०१९ आता खास आपल्यासाठी pdf मध्ये. वरील लिंक वर क्लिक करा आणि"लोकराजा" दिवाळी विशेषांक वाचण्याचा आनंद घ्या व कमेंट नक्की करा, आपल्या मित्रांना लिंक शेअर करायला विसरू नका !

इमेज
https://drive.google.com/file/d/1_8ifRxV2Vf8JzC0M6dnaNX3XUZSt5Vh8/view?usp=drivesdk न्यूज मसालाचा "लोकराजा" दिवाळी विशेषांक २०१९ आता खास आपल्यासाठी  pdf मध्ये. वरील लिंक वर क्लिक करा आणि"लोकराजा" दिवाळी विशेषांक वाचण्याचा आनंद घ्या  व कमेंट नक्की करा, आपल्या मित्रांना लिंक शेअर करायला विसरू नका !

स्वॅग माझ्या फाट्यावर ! आईच्या गावात बाराच्या भावात ! मती,रूमी, मॅगी या गर्ल्स येताहेत गाणी गात आपल्या भेटीस ! आपली आपल्याच आई वडीलांशी नव्याने ओळख निर्माण होणार काय ? तर २९ नोव्हेंबर ला भेटणार गर्ल्स ना !!!

इमेज
२९ नोव्हेंबरला 'गर्ल्स' येताहेत भेटीला !          'बॉईज' आणि 'बॉईज 2' या दोन्ही चित्रपटांच्या भरघोस यशानंतर विशाल सखाराम देवरुखकर आता घेऊन येत आहेत, मुलींच्या अजब आणि हटके विश्वाची धमाकेदार सफर 'गर्ल्स'च्या रूपात. एव्हरेस्ट एंटरटेनमेंट आणि  कायरा कुमार क्रिएशन प्रस्तुत 'गर्ल्स' हा चित्रपट तरुणींच्या एका अनोख्या जगाची सफर घडवणार आहे.                 मती, रुमी, मॅगी या तीन वेगवेगळ्या वातावरणात वाढलेल्या आणि वेगवेगळ्या व्यक्तिमत्वाच्या मुली त्यांचे दैनंदिन आयुष्य जगत असताना एका वळणावर जेव्हा त्या एकत्र येतात तेव्हा, त्या तिघींची एकमेकींशी होणारी ओळख, आयुष्याकडे बघण्याची नव्याने मिळालेली नजर, नवीन विचार, नातेसंबंध आणि मुख्य म्हणजे त्यांची होणारी घट्ट मैत्री. या गोष्टीवर भाष्य करणारा हा सिनेमा नक्कीच प्रेक्षकांचे पुरेपूर मनोरंजन करणारा आहे. 'दोस्तीत कधी मतलबी व्हायचे नसते, तर त्या दोस्तीचा मतलब शोधायचा असतो'. या संवादातूनच मैत्रीचा खरा अर्थ सांगणाऱ्या या चित्रपटातून माणसाच्या जीवनात असणाऱ्या प्रत्येक नातेसंबंधावर प्रकाश टाकण्यात आला आहे.

आदर्श उपक्रमशील मुख्याध्यापक राज्यस्तरीय पुरस्काराने प्राचार्य के. के. अहिरे यांना गौरविण्यात आले ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
के के अहिरे राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित लखमापूर ता दिंडोरी::- येथील विदयालयाचे प्राचार्य के के आहिरे ह्यांना महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक महामंडळ ह्यांचा राज्यस्तरीय आदर्श उपक्रमशील मुख्याध्यापक म्हणून नुकताच सोलापूर येथे झालेल्या राज्यस्तरीय अधिवेशनात मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला, त्यांनी ग्रामीण भागातील दिंडोरी तालुक्यातील पहिली आय एस ओ शाळा लोकसहभागातून करण्याचा मान पटकावला आहे, शैक्षणिक क्षेत्रातील अनेक उपक्रमात त्यांचा सहभाग असतो, प्रशिक्षणातून तज्ञ मार्गदर्शक, निवडश्रेणी केंद्र संचालक, गणित विषयाचे सातत्याने अध्यापन करीत असून, एसएससी बोर्ड परीक्षक, नियामक म्हणून अनेक वर्षे काम केले आहे, त्यांची दोन पुस्तकेही प्रकाशित झाली असून शैक्षणिक चळवळीत त्यांचे मोठे योगदान आहे, उत्कृष्ट सूत्रसंचालक म्हणून त्यांचा नावलौकिक असून वाचन हा त्यांचा मुख्य छंद आहे, विज्ञान प्रदर्शनातही त्यांचे केलेल्या कार्याला अनेक पुरस्कारांनी ह्यापूर्वी गौरवण्यात आले आहे, विद्यार्थी विकासासाठी शाळेत अनेक उपक्रम राबवले त्यात अप्रगत विद्यार्थी, जी ता

कर्मचाऱ्यांच्या पगाराला आजचा व काहींसाठी उद्याचा मुहूर्त !! दोन विभागांकडून दप्तरदिरंगाईमुळे पगारबीलाला ऊशीर झाल्याची प्राथमिक माहिती !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!!

इमेज
आज होणार मनपा कर्मचाऱ्यांचे पगार ! नासिक (६)::- नोव्हेंबर चे सहा दिवस उलटले तरीही नासिक मनपा कर्मचाऱ्यांचे पगार झाले नाहीत ! मात्र संबंधित विभागाशी संपर्क साधला असता मनपातील दोन विभागांच्या दप्तरदिरंगाईचा फटका कर्मचाऱ्यांच्या पगाराला बसला आहे, वैयक्तिक कर्जाचे हप्ते, वाहन कर्ज, घर कर्जाचे हप्ते यासारख्या वेळीच द्यावयाच्या देण्यांना उशीर झाला असल्याने कर्मचारी वर्गात नाराजी पसरली आहे.       लेखाविभागाने तत्काळ दखल घेत संबंधित दोन्ही विभागाशी रितसर पत्रव्यवहार करून माहिती मागवून घेतली, अखेर आज सायंकाळपर्यंत एसबीआय च्या खात्यांवर पगार वर्ग होणार असून इतर बॅंकांशी बोलणी करून उद्यापर्यंत कर्मचाऱ्यांच्या खात्यात पगाराची रक्कम जमा होऊ शकते.         बायोमेट्रिक पद्धतीने पगारपत्रक तयार केली जातात. सर्व विभागप्रमुखांनी वेळेत हजेरी व रजा माहीती लेखाविभागाला सादर करायला हवी. मात्र दोन विभागांकडून माहिती काल तीन वाजेपर्यंत उपलब्ध करून देण्यात आली नव्हती ती सायंकाळी उशिरा सादर केली. लेखाविभागाने रात्री उशिरापर्यंत काम करत अखेर आज पगार बील बॅंकेत पाठविण्यात येईल अशी माहिती देण्यात आली. यासंदर्भ

ओला दुष्काळ जाहीर करून, शेतमालाची नुकसान भरपाई सह संपूर्ण कर्जमाफी व वीजबिल माफ करावे ! छावा क्रांतीवीर सेनेकडून दोन तास चक्काजाम आंदोलन !! मागण्यांचे निवेदन शासनदरबारी मांडण्याचे तहसीलदार यांचे आश्वासनानंतर आंदोलन स्थगित !!! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!

इमेज
छावा क्रांतीवीर सेनेचे चक्का जाम आंदोलन ! निफाड तहसीलदार यांनी तात्काळ मागण्या शासनदरबारी मांडण्याच्या विनंतीमुळे निवेदन देऊन दोन तासाने आंदोलन स्थगित करण्यात आले. ओला दुष्काळ जाहीर करून, शेतमालाची नुकसान भरपाई सह संपूर्ण कर्जमाफी व वीजबिल माफ करावे .                निफाड (५)::-नाशिक जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करून अतिवृष्टीमुळे  नुकसान झालेल्या पिकांचे तात्काळ पंचनामे करून त्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई व संपूर्ण कर्जमाफी , वीजबिल माफी व  विद्यालयीन , महाविद्यालयीन , उच्च शिक्षण घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षण शुल्क माफ करण्यात यावे. अशी मागणी छावा क्रांतीवीर सेनेच्या वतीने निवेदनाद्वारे देण्यात आली. नाशिक जिल्ह्यासह महाराष्ट्रात सर्वत्र अवकाळी पाऊस झाला असून पाऊस थांबण्याची चिन्हे नाहीत. खरिपाची अपरिमित हानी झाली आहे. पिकांचे नुकसान कोट्यवधी रूपयांच्या घरात आहे. यामध्ये द्राक्ष , सोयाबीन , मका, कापूस , कडधान्ये आदी पिकांना पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे. सतत कोसळणाऱ्या पावसाने सर्वच भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. हजारो एकरावरील द्राक्ष

ए,व्हि.एम नाईंटी फोर व्हाटस्अॅप गृप लवकरच नोंदणीकृत करणार ! समाजाचे आपण देणे लागतो व त्यासाठीचे कर्तव्य निश्र्चित करून साजरा केला स्नेहमेळावा !! हाथ छूटे भी तो, रिश्ते नहीं छोड़ा करते,. वक़्त की शाख़ से, लम्हे नहीं तोड़ा करते !!! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!

इमेज
"ए.व्ही.एम. नाईंटी फोर"  चे गेट टुगेदर उत्साहात संपन्न... निजामपूर : दि.३०::- "हाथ छूटे भी तो रिश्ते नहीं छोड़ा करते वक़्त की शाख़ से लम्हे नहीं तोड़ा करते ..." प्रसिद्ध गीतकार गुलजार यांच्या ओळींप्रमाणे जरी जीवनाच्या वाटा बदलल्या तरी मैत्रीचा धागा तुटू न देता आदर्श विद्या मंदिर, निजामपूर-जैताणे शाळेच्या १९९४ साली दहावीत असलेल्या विद्यार्थ्यांनी 'ए.व्ही.एम. 94' या व्हॉटस्अॅप गृपच्या माध्यमातून एकत्र येत आपले गेट टुगेदर उत्साहात साजरा केले              बालपणापासूनचे वर्गमित्र आपले माध्यमिक शिक्षण पूर्ण करून जीवनाच्या विविध वाटांनी यश मिळवण्यासाठी निघून गेले पण २५ वर्षांनंतर ते पुन्हा 'रौप्यमहोत्सवी स्नेहमेळावा' साजरा करण्यासाठी एकत्र आले, या बॅचमध्ये अनेक जण शिक्षक, डॉक्टर्स , इंजिनिअर्स, फार्मासिस्ट, उद्योजक आणि सामाजिक क्षेत्रात मनापासून काम करणारे तरुण नेतृत्व म्हणून समाजात कार्यरत आहेत. समाज, शाळा, विद्यार्थी आणि मित्रांच्या सुखदुःखात धावून जाण्यासाठी 'ए.व्ही.एम. 94' हा व्हॉटस्अॅप गृप स्थापन करून सर्वजण धनाई पुनाई माता मंदिर परिसर

२१व्या ग्रामीण साहित्य संमेलनाध्यक्षपदी विवेक उगलमुगले यांची सार्थ निवड !! साहीत्य क्षेत्रातील मंडळींकडून अभिनंदनाचा वर्षाव !!! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!

इमेज
२१व्या ग्रामीण साहित्य संमेलनाध्यक्षपदी विवेक उगलमुगले यांची निवड       वाडीवऱ्हे/नाशिक:- इगतपुरी तालुका साहित्य मंडळ आणि महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ आयोजित २१व्या ग्रामीण साहित्य समेंलनाच्या अध्यक्षपदी जेष्ठ  साहित्यिक, समीक्षक आणि कवी विवेक उगलमुगले यांची निवड करण्यात आल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष तथा जेष्ठ ग्रामीण साहित्यिक पुंजाजी मालुंजकर यांनी दिली .       कवी विवेक उगलमुगले यांचे दिवाण्या आणि तोड्या, सायकलवरच्या कविता, प्रिय आईबाबांच्या शोधात, आठवणींची फुले, सांगवेसे वाटते म्हणून, आतला आवाज हे काव्यसंग्रह, शोध माणूसपणाचा हे व्यक्तिचित्रण यांसह दाट सायीचे गाव, हॅपी होम, रोजनिशी एका चिमुरडीची हे बालसाहित्य प्रकाशित आहे. अनेक पुस्तकांना त्यांची प्रस्तावना असून अनेक पुस्तकांवर समीक्षा लिहिली आहे. याप्रसंगी मंडळाचे विश्वस्त ग्रंथमित्र बाळासाहेब पलटणे, रवींद्र पाटील, दत्तात्रेय झनकर, अॅड. ज्ञानेश्वर  गुळवे, अॅड. रतनकुमार इचम, हिरामण शिंदे आदि मान्यवर उपस्थित होते. हे २१वे ग्रामीण साहित्य संमेलन  रविवार दि. २४ नोव्हेंबर २०१९ रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५.४० या वेळेत