कर्मचाऱ्यांच्या पगाराला आजचा व काहींसाठी उद्याचा मुहूर्त !! दोन विभागांकडून दप्तरदिरंगाईमुळे पगारबीलाला ऊशीर झाल्याची प्राथमिक माहिती !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!!

आज होणार मनपा कर्मचाऱ्यांचे पगार !
नासिक (६)::- नोव्हेंबर चे सहा दिवस उलटले तरीही नासिक मनपा कर्मचाऱ्यांचे पगार झाले नाहीत ! मात्र संबंधित विभागाशी संपर्क साधला असता मनपातील दोन विभागांच्या दप्तरदिरंगाईचा फटका कर्मचाऱ्यांच्या पगाराला बसला आहे, वैयक्तिक कर्जाचे हप्ते, वाहन कर्ज, घर कर्जाचे हप्ते यासारख्या वेळीच द्यावयाच्या देण्यांना उशीर झाला असल्याने कर्मचारी वर्गात नाराजी पसरली आहे.
      लेखाविभागाने तत्काळ दखल घेत संबंधित दोन्ही विभागाशी रितसर पत्रव्यवहार करून माहिती मागवून घेतली, अखेर आज सायंकाळपर्यंत एसबीआय च्या खात्यांवर पगार वर्ग होणार असून इतर बॅंकांशी बोलणी करून उद्यापर्यंत कर्मचाऱ्यांच्या खात्यात पगाराची रक्कम जमा होऊ शकते.
        बायोमेट्रिक पद्धतीने पगारपत्रक तयार केली जातात. सर्व विभागप्रमुखांनी वेळेत हजेरी व रजा माहीती लेखाविभागाला सादर करायला हवी. मात्र दोन विभागांकडून माहिती काल तीन वाजेपर्यंत उपलब्ध करून देण्यात आली नव्हती ती सायंकाळी उशिरा सादर केली. लेखाविभागाने रात्री उशिरापर्यंत काम करत अखेर आज पगार बील बॅंकेत पाठविण्यात येईल अशी माहिती देण्यात आली. यासंदर्भात ज्या दोन विभागांकडून माहिती उपलब्ध झाली नव्हती त्यांना लेखा विभागाने नियमानुसार पत्र पाठवून झालेल्या विलंबाबाबत विचारणा केली असल्याचे सांगण्यात आले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अद्वितीय शास्त्रज्ञ तथा विसाव्या शतकातील महान शास्त्रज्ञ : सर आयझॅक न्यूटन. ४ जानेवारी जयंतीनिमित्त त्यांच्या कार्याचा घेतलेला थोडक्यात आढावा वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

सेवानिवृत्त होत असणाऱ्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकाच्या पत्नीचे त्यांच्या आयुष्य भरातील चढ उतार तसेच जडणघडणा विषयीचा लेखाजोखा स्वरूपात मनोगत.... पत्थर खाकर भी खडे रहे! वो लहू बनकर अडे रहे ! जब दुनिया जश्न मनाती है ! तब पुलिस फर्जं निभाती है ! सविस्तर मनोगत वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

मूर्तिकार कारागीरांसाठी कौशल्य विकास आणि उद्योग मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न !